शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

मोहजाबंदी वनपरिक्षेत्राला भेट-शैक्षणिक उपक्रम*


रिसोड प्रतिनिधी 
महेंद्रकुमार महाजन 
२५/नोव्हेंबर

मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे.निसर्गाला जखमी करुन मानवाला कसे काय जगता येईल?निसर्गावर प्रेम करा.त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहकार्य करा.अन्यथा पृथ्वीवर माणूसच उरणार नाही.आज हे फक्त पुस्तकात किंवा वृत्तपञातच वाचायला मिळते
                           पण आज निसर्गाचे रक्षण मानवाच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे.विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्व पटवुन देण्यासाठी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील वर्ग ११वी व १२ वी कला शाखेतील विद्यार्थ्याचे २५ नोव्हेंबर रोजी मोहजाबंदी वनपरिक्षेत्राला एक दिवशीय भेटीचे आयोजन करण्यात आले.
                   यावेळी वन क्षेत्रास जातानां प्राचार्य डि.एन.अघडते सर,पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर उपस्थित होते.तयारीसाठी श्री.कैलास शर्मा व श्री.गजानन पुरी व मुळे मामा यांनी मदत केली.
         मोहजाबंदी वनपरिक्षेत्र भेटीचे आयोजन प्रा.शरदचंद्र टेमधरे,प्रा.समाधान गायकवाड,प्रा.रमेश टाक व कला शाखेचे विद्यार्थी यांनी केले.जवळपास १०ते१२ कि.मी.चा पायी प्रवास करुन निसर्गाची विविध माहीती जाणुन घेतली.निसर्गरम्य वातावरणात असलेले पंचक्रोशीतील आराध्य दैवत परमपुज्य बाळु मामा यांचे दर्शन घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतला.भोजनानंतर कु.जया गिरी,कु.रुपाली थोरात व प्रा.समाधान गायकवाड यांनी गित गायन करुन मनोरजंन केले.त्यानंतर प्रा.टेमधरे,प्रा.गायकवाड व प्रा.टाक यांनी निसर्गाविषयी माहीती देऊन निसर्ग वाचविण्यासाठी सामुहीक शपथ घेण्यात आली.
          निसर्गरम्य आनंदमय वातावरणात निसर्गरम्य वातावरणातुन विद्यार्थ्याची बाहेर येण्याची इच्छा नसतानां सुध्दा परतीचा प्रवास सुखरुप झाला.शैक्षणिक क्षेत्रामधील प्रत्यक्ष भेटीचा उपक्रम अनेकदा दुर्लक्षित होतानां दिसत असतानां श्री.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप   येथील शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

महेंद्रकुमार महाजन जैन 
रिसोड प्रतिनिधी  9960292121

मंगरुळपीर मानोरा चौकात बाजारदिवशी चक्काजाम ट्राफिक पोलिस वाहतूक सूरळीत करन्यात असमर्थ?



अतिक्रमणामुळे वाहतुकीचा होत आहे खेळखंडोबा

वाहतुक सुरळीत करन्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देन्याची गरज

जय गिरी-प्रतिनिधी मंगरुळपीर

दर शनिवारी मंगरुळपीर येथे आठवडी बाजार भरतो परंतु या बाजाराच्या ठिकाणच्या मानोरा चौकात वाहतूकीचा खेळखंडोबा नेहमीच बघायला मिळत असुन ट्राफिक पोलिस कर्तव्य बजावन्यात असमर्थ तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत असल्याने मंगरुळपीर शहरातील अस्ताव्यस्त दिवसेदिवस होत चाललेली वाहतुक सुरळीत करन्यासाठी आता वरिष्ठांनीच लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अनेक खेड्यातील लोक मंगरुळपीर येथे शनिवार रोजी भरत असलेल्या आठवडी बाजारात बाजारासाठी तर दुकानदार व्यवसायासाठी येत असतात.हा बाजार मानोरा चौकालगत असलेल्या ठिकाणी भरतो.परंंतु या चौकात या बाजाराचे दिवशी अनेकदा चक्काजाम होत असतो आणी वाहनधारक तासभर तरी अडकुन पडन्याचा प्रकार नेहमीच होतो.यामुळे किरकोळ अपघात आणी वाहतूकीवरुन वादही नेहमीच होतात.परंतु ईथे तैनात वाहतुक पोलिस कधी दिसत नसल्यांची अनेकांची ओरड आहे.ट्राफिक पोलिस फक्त आॅटोवाल्याकडुन हप्ते जमा करन्यातच व्यस्त असतात अशी दबक्या आवाजात सर्वञ चर्चा होत होती.दि.२५ च्या आठवडी बाजाराच्या दिवशी तब्बल तासभर मानोरा चौकात वाहतूक जाम झाली होती आणी वाहनधारक या ट्राफिकमधे अडकुन पडले होते.पण ट्राफिक पोलिस येथे तैनात नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा झाला होता.ही वाहतूक नेहमीच जाम होन्याचे मुख्य कारण अनेक व्यापारी आपली दुकाने मानोरा चौकात अगदी रोडपर्यत लावतात त्यामुळे ही वाहतुक जाम होत असल्याचे चिञ आहे पण हे अतिक्रण काढन्याचे धाडक सबंधित प्रशासन का करत नाही हा प्रश्न अनूत्तरीतच राहत आहे.आता हा दर आठवड्याला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावन्यासाठी वरिष्ठांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.पोलिस विभागानेही फक्त हप्ते न घेता आपले कर्तव्य चोखपणे बजावावे अशी चर्चा होत आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

जय गिरी,प्रतिनिधी मंगरुळपीर

मंगरुळपीर येथील मंगलधाम येथे भरदिवसा ३लाखांची चोरी



चोरांना शोधन्याचे पोलिसांपुढे आव्हान

तालुक्यात चोरिंच्या घटनेत वाढ,प्रशासन सुस्त?

जय गिरी,प्रतिनिधी मंगरुळपीर 
मंगरुळपीर-येथील मंगलधाम येथे पोलिसांच्या नाकावर टिच्चुन दिवसाढवळ्या डाॅ.देविदास खांडे यांच्या घरी आज दुपारी चार वाजताच्या सुमारास मागच्या गल्ली तुन घुसुन वरच्या मजल्या वरील दोन्ही बेडरूम चे कपाट फोडून रोख रक्कम व दागिने पकडून जवळपास 3 लाख रुपये लूटले
सुन व सासु खालील घरात बसून होते. सुनेला वरच्या घरातून आवाज आला तर ती वरच्या मजल्यावर   गेली असता आवाज बंद झाला. तिला वाटले मांजर असेल म्हणून ती परत आली.
प्राप्त माहिती नुसार त्या वेळेस 4 व्यक्ति तिथे घुटमलत असल्याचे सांगितले जाते.तिथे असलेल्या हनुमान मंदिरा समोरिल सर्विस  गल्लीतुन घुसुन हा दरोडा टाकन्यात आला.ही चोरी दिवसाढवळ्या झाल्याने पोलिसापुढे आव्हान ऊभे ठाकले असुन अशा चोरिच्या घटनेमधे वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.आज दुपारी संत बिरबलनाथ मंदिराजवळुन एकाची दुचाकी चोरीला गेल्याची माहीती मिळाली असुन अशा चोरांच्या मुसक्या आवळन्याची गरज निर्माण झाली आहे.घटनेची माहीती पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणी घटनास्थळाचा पंचनामा केला.पुढील तपास ठाणेदार यांचे मार्गदर्शनात पोलिस तपास करत आहे.

जय गिरी,मंगरुळपीर

राज्य पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनीचे उद्या उद्घाटन*



पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळासम्राट टाइम्स लाईव्ह

 राज्यातील पत्रकारांना स्वयंभु बनविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे उद्घाटन सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी दिली.हा सोहळा सोमवारी 27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्वे रोड येथील सिध्दार्थ हॉल येथे जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, राज्याचे महसुलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व जेष्ठ पत्रकार विजय बावीस्कर, प्रमुख पाहुणे संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी जर्नालिझम कोर्सच्या उद्घाटनचा शुभारंभ होवून पत्रकारांचा यथोचित सत्कार सोहळा, पुरस्कार वितरण सोहळा व नवीन पदाधिकार्‍यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.यावेळी पत्रकारीता क्षेत्रातील अनिलजी भापकर औरंगाबाद, प्रा. सी. एन. चौधरी जळगाव, आशिष घुमे वरोरा जि. चंद्रपुर, सोमनाथ काळे संगमनेर तसेच शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे संतोष लक्ष्मण सदगीर अहमदनगर, प्रा. आनंद सुराणा बुलढाणा, उत्कृष्ट अभियंता त्र्यंबक लक्ष्मण राऊत अहमदनगर आदिंना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.म. रा. मराठी पत्रकार संघाचे वृत्तवाहीनी संघाचे अध्यक्ष मनिष केत, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, प्रदेश उपाध्यक्ष रणधीर कांबळे, विजय वाघमारे, राकेश टोळये, विजय वर्पे, सोमनाथ देशकर, ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, कुंदन जाधव, प्रदेश सरचिटणीस सुशील कुलकर्णी, कोकण विभागीय अध्यक्ष उपेंद्र बोर्‍हाडे, विदर्भ प्रमुख ईश्‍वरसिंग ठाकुर, नागपूर विभागप्रमुख व्यंकटेश दुधमवार, खानदेश विभागप्रमुख किशोर रायसाखडा, अमरावती विभागप्रमुख बाळासाहेब देशमुख, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हरिष यमगर, दिपक कांबळे, सुभाष डोके, सुरेखा खानोरे, मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी यावेळी राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे जर्नालिस्ट कोर्सेसचा शुभारंभ पार पडणार आहे. तसेच राज्यातील नवीन निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. तरी या सोहळयास सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष किरण जोशी आदींनी केले आहे.सम्राट टाइम्स लाईव्ह

मंगरूलपीर में ईद मिलादुन्नबी मिरवणूक की परवानगी दी जाये-जन सत्याग्रह संगठन*


जन सत्याग्रह संगठन अकोला इकाई ने गृह राज्य मंत्री डॉ रणजीत पाटिल के जनसंपर्क कार्यालय में निवेदन सौंपा निवेदन है मांग की गई है कि मंगरूलपीर में जश्ने ईद मिलादुन्नबी के दिन मिरवणूक की परवानगी दी जाये। निवेदन में आगे बताया गया कि मंगरूलपीर में हर साल दारुल उलूम कादरिया कलंदरिया में जश्ने ईद मिलादुन्नबी बड़ी धूमधाम से मनाया जाता है और पिछले 5 सालों से दारुल उलूम कादरिया कलंदरिया स्थानिक मंगरूलपीर पुलिस प्रशासन से मिरवणूक की परवानगी मांग रहा है। लेकिन मंगरूलपीर में कभी मिरवणूक ना निकलने के कारण स्थानिक पुलिस स्टेशन परवानगी नहीं दे रहा है। जन सत्याग्रह संगठन गृह राज्य मंत्री डॉ रणजीत रंजीत पाटिल से गुहार लगाई है कि मंगरूलपीर में इस वर्ष से जश्ने ईद मिलादुन्नबी निकालने की परवानगी दें। हांलाकि दारुल उलूम कादरिया कलंदरिया मिरवणूक की पूरी जिम्मेदारी अपने ऊपर लेने को तैयार है जश्ने ईद मिलादुन्नबी की मिरवणूक की पूरी पूरी शांति के साथ करने को तैयार है। जिसकी जानकारी दारुल उलूम कादरिया कलंदरिया के पास मौजूद है और उन्होंने इस की तैयारी और उसके रूट की पूरी पूरी जानकारी मंगरूलपीर पुलिस प्रशासन को दे दी है। निवेदन देते समय अकोला महानगर अध्यक्ष शेख आजम, स्वप्निल मादले, तौसीफ अहमद मोंटू , मिर्जा इमरान बेग ,मुदस्सिर कुरैशी ,इमरान उददीन प्रमोद इंगले ,शेख अशफाक, शेख जुबेर इब्राहीम रजा, वसीम रजा, जावेद अहेमद, इकबाल इनामदार, मोहसीन खान, मोहम्मद राशिद, इस्माईल खान, आदि मान्यवर उपस्थित थे। 
इस तरहा निवेदन की एक प्रत जिल्हा अधीकारी साहेब वाशिम 
जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम तथा ठाणेदार पोलीस स्टेशन मंगरुलपीर को दि गई.

सम्राट टाईम्स लाईव्ह

उकळी पेन ग्रामपंचायत चे स्वच्छताग्रूह घाणेरड्या अवस्थेत...॥


उकळीपेन :- येथील ग्रामपंचायत चे स्वच्छताग्रूह घाणेरड्या अवस्थेत पडले असून , त्याला कोणत्याही प्रकारचे कुंपण तर सोडाच अगदी  वापरासाठी पाण्याची पण व्यवस्था नाही आहे.
स्वच्छताग्रूहाची पाहणी करण्यात आली असता तिथे एका संडास रूम नेहमीसाठीच कुलुप लावून शोभेची वस्तु म्हणून उभी असून..बाथरूम चा वापर हा बाथरूम मध्ये कमी आणि ग्रामपंचायत च्या भिंतीवरच जास्त होतो आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे गावच्या महत्वाच्या ठिकाणी असून तिथेच उत्तरेस  सामान्य रुग्णालय उपकेंद्र आहे तर पूर्वेस जिल्हा परिषद शाळा आहे , दक्षिणेस सार्वजनिक गणेश उत्सव मंडल च ठिकाण आहे...नेहमीच गजबजून राहत असलेल्या या ठिकाणी वस्ती असून जेंव्हा लोक..बाथरूम साठी ग्रामपंचायत च्या बाथरूम चा वापर करतात तेंव्हा स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वारंवार ग्रामपंचायत कडे तक्रार करूनही काय करायच ते करा अशी दमदाटी ग्रामपंचायत प्रतिनिधि करीत असल्याचे माहिती आहे ,
तसेच सदर ग्रामपंचायतचे हे घाण पाणी जिल्हा परिषद शाळेत सोडलेले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होत असलेलं हे अक्षम्य दुर्लक्षच म्हणाव लागेल !
एकीकडे शासन हागणदारीमुक्त गाव मोहीम राबवून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता मोहीम राबवत असताना ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत आहे.
तरी सम्बन्धीत शासकीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी , व प्रतिनिधिनी  लक्ष घालुन शोभेची वस्तु बनून दुर्गन्धीचे  साम्राज्य पसरत असलेल्या या प्रकारास आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सम्राट टाईम्स  
सुरेश इंगोले 
8830966982

पिंप्रीची शाळा घाणीच्या विळख्यात


गुड मॉर्निग पथक गायब
प्रभाकर नाईकवाडे
वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री सरहद या गावातील जिल्हा परिषद शाळा घाणीच्या विळख्यात सापडली असून स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे .
एकीकडे स्वच्छतेचा संदेश दिल्या जात आहे जिल्हा हागणदरी मुखी कडे वाटचाल करीत असल्याचा फार्स निर्माण केल्या जात आहे तर दुसरी कडे संपूर्ण गाव घाणीख्या विळख्यात सापडले आहे अजूनही ग्रामीण भागात गुड मॉर्निग पथकाचे दुर्लक्ष होत आहे शासनाने गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी अनेक योजना आणि पथके स्थापन केली त्यासाठीच कर्मचाऱ्याना पगार दिल्या जात आहे मात्र गुड मॉर्निग पथक निव्वळ गाडीतून फिरण्यात मश्गुल आहे थातूर मातुर कार्यवाही करत गुड मॉर्निग पथक कार्यवाहीचा फार मोठा आन आणत आहे रिसोड तालुक्यात गुड मॉर्निग पथक नावालाच आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे पिंपरी सरहद येथे जिल्हा परिषद शाळा घाणीने माखली असल्याने विध्यार्थ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे  शौचालयाची दुर्दशा झाली आहे शाळेत पाणीच नसल्याने कर्मचाऱ्यासह विध्यार्थ्याना उघड्यावर  शोचास जावे लागत आहे स्वच्छता गृहात घाणच घाण साचल्याने सर्वत्र दुर्गंध पसरला आहे शालेय पोषण आहार घाणीत शिजविल्या जात असल्याने विध्यार्थ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शिक्षकावर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे

प्रभाकर नाईकवाडे

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

ट्रक च्या धडकेने हनुमान मंदिर जमीनदोस्त


सम्राट टाइम्स लाईव्ह
औरंगाबाद नागपूर राष्ट्रीय  महामार्गावरील मसोला फाट्यावर ट्रक क्रमांक  एम एच 20 इ जि - 9241 ने  हनुमान मंदिराला धडक दिल्याने  झालेल्या अपघातात मंदिर जमीनदोस्त झाल्याची घटना आज पहाटे 5 :30 वाजताच्या सुमारास घडली 
औरंगाबाद कडुन कांद्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने  कारंजा कडे जात असताना    तर्हाळा जवळच्या मसोला फाट्यावर असलेल्या हनुमान मंदिराला धडकला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने मंदिर  जमीनदोस्त झाले .  आज शनिवार हनुमानाचा दिवस असल्याने  भाविक भक्तांच्या च्या भावना  दुखाविल्या  गेल्या .भाविक भक्त गोळा झाले होते व ट्रक मालकानी नवीन हनुमान  मंदिर उभारून द्यावे अशी मागणी  ऊपस्थीत हनुमान भक्तांनी केली आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

विर भगतसिंग विद्यार्थीं परिषद जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न .



सम्राट टाइम्स लाईव्ह

मराठा सेवा संघ प्राणित वि.भ.वि.प ची वाशिम कार्यकारिणीची आढावा बैठक वाशिम येथील स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात पार पडली. कार्यक्रमाला  संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर,वि.भ.वि.प प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी, विदभ कार्याध्यक्ष नारायण शिंदे,जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष गणेशजी आढाव ,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष  वाशिम  राजू कोंघे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते  आदींची उपस्थित  होती .या वेळी विध्यार्थी नेते गणेश आढाव यांनी अमरावती उपकेंद्राच्या प्रश्नावर बोलतानी  आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने वेग वेगळ्या स्वरूपात आतापर्यंत निवेदन ,धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने   आतापर्यंत करण्यात आले आहेत . आतातरी लोकप्रतिनिधीनी या बाबत पाठपुरावा होऊन सुद्धा निर्णय घेतलेले नाहीत. अश्या लोकप्रतिनिधी लवकरात लवकर योग्य निर्णय घेत हा प्रश्न लवकर विधानसभेत मांडून वाशिम ला न्याय मिळवून द्यावा .अन्यथा पुढील आंदोलन साठी ऱ्यांनी तयार राहवे. या प्रसंगी अजून गजानन भोयर,भागवत मापारी ,नारायण शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पोहचवुन प्रत्येक तालुकास्तरावर}तालुकाध्यक्ष निवड झाली अशी दांडगा विस्तार असणारी वीर भागतसिंह विध्यार्थी परिषद ही एकमेव विध्यार्थी संघटना असावी.हीच वि.भ.वि.प ची भरीव कामगिरी मनता येईल.गाव ,खेडे ,शहरी भाग व त्यापासून प्रत्येक कॉलेज पर्यंत पोहचण्याचा आमचा मानस असल्याचं  प्रतिपादन या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी केले . विविध मुद्द्यांवर एसटी महामंडळ च्या पासेस व गाड्या, महा डी. बी.टी स्कॉलरशिप ,चिडीमारी , म्हविध्यालयीन निवडणूका ,अँटी रॅगिंग या बद्दल चर्चा व निर्णय घेन्यात आले . या वेळी नवीन जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली . जिल्हा सचिव प्रवीण गोटे , जिल्हाउपाध्यक्ष गोपाल कोंघे , जिल्हाउपाध्यक्ष रुपेश बाजड, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल शिंदे, कोष्याध्यक्ष संतोष कोल्हे , जिल्हा संघटक मंगेश शिंदे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख गनेश गोटे, जिल्हा प्रवक्ता अर्जून सुर्वे , जिल्हा मार्गदर्शक योगेश लांडकर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश देशमुख, अंकुश मापारी, संदीप खंदारे ,तालुकाध्यक्ष} रिसोड ऋषिकेश देशमुख,वाशिम योगेश खोडके ,मालेगाव किसनराव शिंदे,मनोरा प्रणव ठाकरे,मंगरूळपिर योगेश लुंगे, कारंजा वैभव भिवरकर,वाशीम शहराध्यक्ष निलेश वानखेडे या सर्वांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. सूत्र संचालन मंगेश शिंदे , प्रास्ताविक देवा बर्डे तर आभार प्रदर्शन योगेश खोडके यांनी केले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

लाच स्वीकारताना लिपिकासह एकास एसीबी ने रंगेहात पकडले


सम्राट टाइम लाईव्ह
वाशिम जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गोविंद श्रीराम टाले वय 51 वर्ष आणि खाजगी इसम शेख इरफान शेख मेहबूब वय 26 वर्ष रा वाशिम या दोघांनी शिक्षण विभागाचीजाहिरातीला परवानगी दिली किंवा नाही याबाबत लेखी खुलासा देण्यासाठी 5000 रुपये लाच स्वीकारताना एसीबी ने त्यांना आज रंगेहात पकडले
तक्रारदाराने दि 23 नोव्हेंबला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दिली की तक्रारदार हे सेवादास शिक्षण संस्था पाळोदि अंतर्गत वसंतराव नाईक माध्यमिक विध्यालाय पाळोदि येथे वरिष्ठ लिपिक व संचालक आहेत सादर संस्थेत पद भरती बाबत माजी सदस्याने जाहिरात दिली सादर जाहिराती  समंधणे तक्रारदार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक वाशिम यांना भेटून माजी सदस्याने  बोगस जाहिरात दिल्याबद्दल सांगितले त्या जाहिरातीस शिक्षण विभागाकडून मान्यता दिली का याबाबत शिक्षण विभाग माध्यमिक यांना लेखी अर्ज देऊन लेखी खुलासा मागितला शिक्षणाधिकारी यांनी  वरिष्ठ लिपिक गोविंद टाले यांना भेटण्याचे सांगितले लेखी खुलासा देण्याबाबत टाले यांनी 5000 रुपयांची मागणी केली  लाच लुचपत विभागाने पडताळणी केली असत गोविंद टाले यांनी 23 नोव्हेंबर रोजी पंचसमक्ष लाचेची मागणी केलीत्यावरून 24 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला  टाले बाबू यांनी लाच रक्कम आरोपी खासगी इसम शेख इरफान शेख मेहबूब यांचेकडे देण्यास सांगितले  लाच स्वीकारताना दिघासना रंगेहात पकडण्यात आले  दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलुस स्टेशनला लाच लीचपत प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम चे अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नाशिककर ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व पोलीस उप अधीक्षक आर व्ही गांगुर्डे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बिहाडे ,यांनी केली 
सम्राट टाइम्स लाईव्ह

कार्ली येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार


दामोदर जोंधलेकर

  • वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कार्ली गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला  धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली

कार्ली येथील राजू संदानशिव वर वय 45 वर्ष हे कारंजा येथून कार्ली गावाकडे दुचाकी क्रमांक  Mh
29 k 3568 ने जात असताना अज्ञान वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना घटनेची माहिती देऊनही पोलीस रात्री 9 वाजेपर्यंत घटनास्थळावर पोहचले नसल्याने पोलिसां विषयी संताप व्यक्त केल्या जात आहे 
दामोदर  जोंधलेकर कारंजा

मालेगाव येथे पाणी टंचाई बैठक


दि.२४/११/२०१७ रोज शुक्रवारला मालेगाव येथे
मा आ अमितभाऊ झनक साहेब यांच्या अध्यक्षते खाली मालेगाव तालुका पाणी टंचाई बैठक बोलावण्यात आली होती या बैठकित साहेबांनी पाणी टंचाई वर मात करण्या साठी अधिकाऱ्यांना तातडीने उपाय योजना करण्याचे सांगितले या बैठकिला तहसीलदार  श्री वजिरे साहेब बि डी ओ श्री कोटकार साहेब ,जि प सभापती पानुबाई जाधव , जी प सभापती यमुनाबाई जाधव,जि प सभापती, विश्वनाथ सानप ,पं स सभापती गवईताई जि प सदस्य रत्नप्रभाताई घुगे, पं स सदस्य गजाननराव शिंदे,पं स सदस्य शिवाजी बकाल तालुक्यातील सरपंच व सचिव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते
सतीश गाभणे
9511420333

पुणे येथे विनोद तायडे यांच्या सत्काराचे आयोजन



सम्राट टाइम्स लाईव्ह

वाशीम :वाशिम जिल्ह्यातील झुंजार पत्रकार विनोद तायडे यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मराठी  पत्रकार संघाने घेतली. त्यांची संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विनोद तायडे यांनी जबाबदारी स्विकारत  वाशिम जिल्ह्यात  महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघाचे मजबूत संघटन उभे केले. विनोद तायडे यांच्या कार्याची दखल वरिष्ठ पदाधिकाऱ्यानी घेत दि २७ नोव्हेंबरला पुणे येथे आयोजित विशेष समारंभात  यांच्या  सत्काराचे  आयोजन करण्यात आले आहे .या विशेष  सोहळ्याला राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर, माजी वनमंत्री पतंगराव कदम, राज्याध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.  मान्यवरांच्या हस्ते विनोद तायडे यांचा सत्कार होणार  असल्याचे पत्र  संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे पाठविले यांनी पाठविले  आहे .विनोद तायडे यांच्या सत्काराने पत्रकार संघात नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

पोलिसांनीच आरोपीस पळून जाण्यास केली मदत.


मालेगाव तालुक्यातील घटना
आरोपिला पळुन जान्यास मदत करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हे दाखल

वाशिम-पोलीस कस्टडी मध्ये असलेल्या आरोपीस पळून जाण्यास मदत केल्या मुळे दोन पोलीस शिपाई व इतर एका इसमा विरुद्ध वाशिम पोलीस स्टेशन मध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी टाकळी येथील 379 कलमान्वये चोरीच्या आरोपातिल गणेश सखाराम बांगर राहणार मालेगाव हा बत्तीस वर्षीय आरोपी दिनांक 23 नोव्हेंबर 2017 रोजी पोलीस कस्टडी मध्ये होता व त्याला कारागृहात नेण्याची जवाबदारी पोलीस शिपाई शिवाजी माणिक केंद्रे व विजय लक्ष्मण ढोरे यांच्यावर होती. आरोपीला कारागृहात नेत असतांना आरोपी पोलिसांच्या व गोभनी येथील दिलीप दिनकर हारकर या इसमाच्या मदतीने पळून गेला आहे. आरोपीला वेळेत कारागृहात दाखल न करता रखवालीतून पळून जाऊ दिले व त्यास पळून जाण्यास हेतु परस्पर पणे मदत करून कायदेशीर कर्तव्य टाळून आरोपीस पळून लावल्यामुळे पोलीस शिपाई शिवाजी माणिक केंद्रे, विजय लक्ष्मण ढोरे या पोलीस शिपायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपीस पळून जाण्यास स्प्लेन्डर एन एक्स जी दुचाकी क्रमांक mh 37 D 8272 क्रमांकाची गाडी पुरविल्या मुळे गोभनी येथील दिलीप दिनकर हारकर यांच्यावर वाशिम पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार बाबाराव राठोड यांच्या फिर्यादी वरून कलम 221, 222, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ची शपथ घेऊन कर्तव्य करणारे पोलीस कर्मचारी आरोपीस पळून जाण्यास मदत करू शकतात का ? या पोलिसांवर कोणाचा दबाव तर नव्हता? पळून जाण्यास मदत करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. याचा सुगावा घेणे गरजेचे आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार हे करत आहेत.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बोरकर तर उपसभापती पदी सौ.पाचरणे बिनविरोध*


     
रिसोड प्रतिनिधी
 महेंद्रकुमार महाजन  

 रिसोड कृषी उत्पनं बाजार समितीच्या सभापती पदी लोकनेते अनंतरावजी देशमुख यांचे कट्टर समर्थक भगवानराव बोरकर यांची तर  उपसभापती पदी माजी  आमदार विजयराव जाधव यांचे कट्टर समर्थक राहुल पचारणे यांच्या मातोश्री  सौ.पुष्पाताई पाचरने यांची बिनविरोध निवड झाली.गजानन पचारणे यांनी राजीनामा दिल्यामुळे सभापती कोण होणार हा चर्चेचा विषय झाला होता.निवडीचा आनंदोत्सव   मा.भाऊसाहेब यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या परिसरात करण्यात आला. नवनिर्वाचिताचा सत्कार करताना माजी खासदार अनंतराव देशमुख व माजी आमदार विजयराव जाधव व युवा नेते अँड.नकुलदादा देशमुख,डॉ अरुण देशमुख,विनोद जोगदंड,जी प सदस्य सुभाष बोरकर,माजी पं स सभापती सुभाष खरात,बाळासाहेब खरात, गजानन पचारणे,राहुल पचारणे सह आघाडीतील नेते, पदाधिकारी सर्व संचालक व अँड.नकुलदादा देशमुख मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 

महेंद्रकुमार महाजन रिसोड प्रतिनिधी 
9960292121

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

बोंडअळीमुळे शेतक-यांच्या कापसाचे मोठे नुकसान



पंचनामा करण्याची शेतकर्‍यांची मागणी

मंगरुळपीर-शेतक-यासाठी पांढरे सोने म्हणून प्रचलित असलेल्या कापसाच्या पीकावार बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळमंगरुळपीर तालुक्यातील कापुस ऊत्पादक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेआहे.म्हणून शासनाने कापसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे.बीटि कापसाच्या बनावट वानामुळे मोठ्या प्रमाणावर बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला आहे.शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.म्हणून शासनाने शेतक-यांच्या कापसाच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

घरकुल लाभार्याना जागा उपलब्ध करुन देण्याची सौ.जयमाला पाटिल यांची मागणी

विठोली  ग्राम पंचायत येथे प्रधानमंत्री आवास ओजना अर्तर्गत प्राधान्य आधी नुसार सान लोकाना लाभ देण्याचा अशांक मिळाला आहे परतू प्रधानमंत्री आवास योजनेयत यादी मध्ये नावे समविष्ठ असलेल्या लाभार्च कडे स्वतहच्या मालकीच्या जागा नाहीत परंतु ज्य लोकांकडे स्वमालकीच्या जागा नाहीत त्या सर्व राजस्थानी जागा उपलब्ध करूण देणे ग्राम पंचायत ची  जबाबदारी आहेत तरिही या सर्व लाभार्थाना ग्राम पंचायत कडुन जागा देण्यात याव्यात व त्या लाभार्थीना स्वत:च्या मालकीचे आठ देण्यात यावेत त्यांच्या घरकुलाचे कामे तात्काळ मार्गी लावण्यात यावे अशी मागणी प.स.सदस्य सौ.जयमाला पाटिल यानी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

मुगसीराम उपाध्ये विठोली मो.९९२१९४३३२१

संविधान दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आहावान



 कारंजा -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  व संविधान निर्माण समिति चे अध्यक्ष डा बाबासाहेब  आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले डा बाबासाहेब आंबेडकरांनी सतत 2 वर्ष 11 महीने 18 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिति केली डा बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अमलात आले भारत सरकार ने डा बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्ष निमित्त 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिवस म्हणून साजरा केला परंतु आंबेडकरवादी जनता ही दशका पासून 26 नोव्हेंबर हां दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आहे डा बाबासाहेब यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 30 वाजता स्थानीय डा बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारिप बहुजन महासंघच्या वतीने संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संविधान दिवस कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,नगर परिषद् पदाधिकारी,नगरसेवक व आंबेडकरवादी विचारसरणीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी संविधान दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी तसेच भारिप युवक कारंजा तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर यानी केले आहे.    

प्रतिनिधी - विनोद नंदागवळी, कारंजा (लाड) 9673954516

धर्म जोडण्याची भाषा करतो, तोडण्याची नाही- श्रवण मुनीश्रीं विशेषसागरजी



महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 

रिसोड - सेनगांव शहरातील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मदिरात दि.२२ नोव्हेंबर बुधवार रोजी धर्मसभेमध्ये प.पु.राष्ट्रसंत गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी महाराजांचे सुयोग्य शिष्य प.पु.श्रवण मुनीश्री विशेषसागरजी महाराज यांनी जे श्रोते उपस्थित आहेत आणि मुनी धर्माला मानतात व त्यांची पुजा अर्चा करतात. मुनीधर्माला माना,मुनींची भक्ती करा परंतु जे मुनी समाजाला तोडण्याची,समाजात फुट पाडण्याची भाषा करीत असतील तर त्यांचे विचार लक्षात ठेवु नये असे यावेळी उदगार काढले.
सेनगांव येथील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदीर येथे आयोजीत धर्मसभेला संबोधीत करतांना बोलत होते.यावेळी जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मुनीश्रीं पुढे बोलतांना म्हणाले की, जैन दर्शनास सम्यदर्शनला 'आईची उपमा दिली आहे, ज्या प्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलाची रक्षा करते; मुलाची प्रगती पाहते त्याच प्रकारे 'सम्यदर्शन' आपल्या आराधकांची प्रगती करते. सम्यदर्शन जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. आज समाजामध्ये अशा व्यक्तींची आवश्यकता आहे जो कैची नव्हे तर सुईचे काम करेल, समाजाला तोडण्याची नव्हे तर, जोडण्याची वृत्ती बाळगेल. धर्म जोडणे शिकवितो तोडणे नाही. भगवान महावीरांनी 'जिओ और जिने दो' चा नारा देत आपले जिवन व्यतीत केले. त्याच उक्तीस धरुन आज समाजामध्ये "मिलो और मिलने दो, जुडो और जुडने दो" या उद्धोताने समाज जोडणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य समजावे. "जैसा खावे अन्न वैसा होवे मन". "खानपान शुध्द, तो खानदान शुध्द" धर्मसभेनंतर मुनीश्रींच्या मंगल सानिध्यात 'णमोकार पैतीसी विधान' दि.२४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता येथील १००८ महावीर दिगंबर जैन मंदिरात जैन बांधवांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जैन मंदीर विश्वस्त समिती कडुन करण्यात आले आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन 
रिसोड प्रतिनिधी 
9960292121

सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन .... कुषि अधिकारी शरद घुगे



 ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत : आदिवासी उपयोजना : 

महेंद्रकुमार महाजन
 रिसोड प्रतिनिधी 

रिसोड  - आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात लाभार्थींना सिंचन विहिरींचा लाभ दिला जाणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन रिसोड पंचायत समितीचे कृषी अधिकारी (विघयो) शरद घुगे  यांनी बुधवारी केले.
आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी आदिवासी उपयोजना या घटकांतर्गत सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. रिसोड  तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील या अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत कागदपत्रांसह रिसोड पंचायत समिती कृषी विभाग येथे सादर करणे आवश्यक आहे. रिसोड  तालुकातील
आदिवासी शेतकऱ्यांनी क्षेत्रांअतर्गत अर्ज भरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले.  आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत रिसोड तालुका  येत नसून क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना अंतर्गत रिसोड  येते. यापूर्वी कुणी चुकीने अर्ज केले असल्यास पुन्हा सुधारणा करून क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना अंतर्गत अर्ज भरून प्रत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले. संबंधित लाभार्थीला ‘कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहेत. सातबारा, आठ अ, जातीचा दाखला, दारिद्ररेषेचे कार्ड, जातपडताळणी प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार क्रमांक, विहिर नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची प्रक्रिया आॅनलाईन करावी लागणार आहे. आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन शरद घुगे रिसोड कुषि अधिकारी 
यांनी केले.

महेंद्रकुमार महाजन 
रिसोड प्रतिनिधी 
9960292121

गुड मॉर्निग पथक की नक्षलवादी ?


👉 👉 महिलेचा गाडीत बसण्यास नकार


सम्राट टाइम्स लाईव्ह
देशाच्या पंतप्रधानांनी  हातात झाडू घेतला आणि देश स्वच्छतेकडे  सरसावला!. महाराष्ट्रात गाव हागणदारीमुक्तीचे वारे जोरात  वाहू लागले. गुड मॉर्निग पथके स्थापन करण्यात आली. भल्या  पहाटे  5 वाजतापासूनच हागरदरी धुंडाळू लागले . उघड्यावर शौच करणारे अंतर्वस्त्र घेऊन पळू लागले. जनतेची दाणादाण उडाली. पथकाला मजा  येऊ लागली. जनतेची मानसिकता बदलण्यासाठी गावात कलापथके जनजागृती करू लागली. काही जिल्हे ,तालुके ,नगर परिषद, हागणदारी मुक्त घोषित होऊ झाली. सेलिब्रिटी शौचालय बांधण्याचा संदेश जाहिरातीतून देऊ लागले. करोडो रुपये स्वच्छता संदेशावर खर्च होऊ लागले. वरिष्ठ पातळीवर कडक कायदे झाले .रेशन पासून दाखल्यापर्यंत बंदी घालण्याची भाषा होऊ लागली. काही ठिकाणी गुड मॉर्निग  पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले.  मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे महिलांनी गुड मॉर्निग पथकावर गुन्हे दाखल केले आणि जिल्ह्यात गुड मॉर्निग मोहीम थंडावली. काही दिवसांपासून पुन्हा गुड मॉर्निग पथके  कार्यन्वित झाली .
मालेगाव तालुक्यातील  किन्हीराजा येथे दि 22 नोव्हेबरला भल्या पहाटे 5 वाजता पाणी  व स्वच्छता मिशनची गाडी दाखल झाली  आणि उघड्यावर शौच करणाऱ्याची पळापळ झाली.  पथकासोबत गावातील सरपंच, सदस्य ,पोलीस पाटील,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ,ग्रा स्व. समिती अध्यक्ष, महिला कर्मचारी नसताना महिलांना उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडण्यात आले महिलांना गाडीत बसण्याचे सांगनारे आपण कोण? कोठून आले? गुंड की नक्षलवादी? म्हणत वाहनात बसण्यास महिलांनी  नकार दिला .गावातील कोण तुमच्यासोबत आहेत. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा म्हणत एक महिला पथकातील  महिला कर्मचाऱ्यावर खेसकली . मागील गुन्हे नोंद होण्याचा अनुभव पाठीशी असल्याने पथकाने काढता पाय घेतला उघड्यावर शोच करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या  10 लोटाबहाद्दराना किन्हीराजा पोलीस चौकीत आणण्यात आले दंड भरा अन्यथा पोलीस कार्यवाहिला सामोरे जा म्हणत गुड मॉर्निग पथकाने एक दिवसाची मुदत दिली. केवळ एकाने दंडाचा भरणा केला उर्वरित 9 लोटा बहाद्दर तटस्थ आहेत.  30 तासांचा कालावधी उलटला आहे . गुड मॉर्निग पथक आता काय कार्यवाही करणार याकडे सर्व गावाचे लक्ष लागले आहे  तर पथकांनी पकडलेल्या महिलेने विचारलेला प्रश्न ग्रामस्थ महीलांना महत्वाचा असल्याचे म्हणत इतर महिलांनी त्या महिलेला साथ दिली .उदया अपहरण करणारे गुंड, नक्षलवादी गावात येऊन महिलांना लक्ष करतील महिलांची अब्रू जाईल त्यामुळे पथकासोबत  गावातील राजकीय पदाधिकाऱ्यासह कर्मचारी ,महिला असायला पाहिजे असा महिलांचा सूर निघाला...

सम्राट टाइम्स लाईव्ह

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

बकरीसह गोऱ्हा बिबट्याने केला फस्त किन्हीराजा वर्तुळात बिबट्याची दहशत


सम्राट टाईम्स 

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा वर्तुळात  बिबट्याने एकाच आठवड्यात बकरिसह  गोऱ्हा फस्त केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे  कवरदरी येथील विक्रम तुळशीराम माघाडे यांची बकरी बिबट्याने 4 दिवसांपूर्वीच खाल्ली तोच दि 22 नोव्हेंबरला किन्हीराजा येथील शेतकरी  अशोकराव नालिंदे यांच्या   गोऱ्हाचा  सांगाडा जंगलात आढळून आला. बिबट्यानेच शिकार केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. किन्हीराजा वर्तुळाला लागूनच काटेपूर्ण अभयारण्य आहे यात बिबट्याचे प्रमाण जास्त आहे. महान  धरण परिसरात बिबट्याचा वावर आहे .अभयारन्यामुळे बिबट्या लोकांच्या नजरेस पडत आहे .शेतकऱ्यांची  जनावरे मारली जात असल्याने सर्वत्र  दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह 

गुलाबी बोंड आळीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार अर्थसहाय्य द्या !



– अन्यथा तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेड चा इशारा

  श्रीक्षेत्र माहूर : -कार्तिक बेहेरे

     गुलाबी बोंड आळीने कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यास सांगून वेळ मारून नेत अर्थसहाय्य देण्याचा शासनाचा डाव हा पिक विमा, कर्जमाफी व इतर योजना प्रमाणेच तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरल्या नंतरही परिणाम मात्र यथातथा असून शासकीय यंत्रणे मार्फतच सर्वेक्षण करून गुलाबी बोंडआळी बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३० हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका संभाजी ब्रिगेड व सकल शेतकरी बांधवांच्या वतीने संभाजी ब्रिगेड प्रवक्ते जयकुमार अडकीने, शिवशंकर थोटे , राजकिरण देशमुख यांनी दिला आहे.
     आदिवासी व नक्षलप्रवण माहूर तालुक्यात मुग उडीद पिकाचे बियाणे पण उगवले पण सडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्या नंतर सोयाबीन या नगदी पिकावर शेतकऱ्याची मदार असतांना ते एकरी ७५ किलो उत्पादित झाल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. कापसाचा पहिला वेचा परतीच्या पावसाने भिजवून नासवला असल्याने त्या मालाची काढणावळ सुद्धा शेतकऱ्यांना घरातून भरावी लागली. दुसरा वेचा बोंड अळीने खावून टाकला असून बोगस बियाण्यांमुळे शेतात आता पऱ्हाटीच्या काड्या उभ्या असून अनेक शेतकऱ्यांनी एकरी १ व्किंटल उत्पादन घेऊन नाईलाजाने उभ्या पिकावर गाढवाचा नांगर फिरवला आहे. तरीही माहूरचे कार्यालयाला सदैव दांडी मारणारे दांडीबहाद्दर तालुका कृषी अधिकारी नांदेड वरूनच बोगस जलयुक्त शिवार कामाची बिले काढण्यात मग्न असून त्यांच्या कार्यालयात दोन चतुर्थश्रेणी व ४ तृतीय श्रेणी कर्मचारी अभ्यागत शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.  माहूर तालुक्यात २२ हजार ६२१ हेक्टर कापूस पेरा असून गुलाबी बोंड अळीने तब्बल ७ कोटीचे नुकसान केले असून अधिकारी व पदाधिकारी गुलाबी थंडीत रजई घेऊन स्वर्गसुखाचा आनंद उपभोगत असून शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.


               एवढी भीषण परिस्थिती असून आणेवारी काढणारे महसूल प्रशासन व कृषी विभाग कुंभकर्णी झोपेत असून नुकतेच प्रशासनाच्या वतीने बोंडआळीच्या प्रादुर्भावाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी  लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले असून त्यामध्ये तत्वतः व निकष अशा शब्दछलाशी साधर्म्य असणाऱ्या अनेक जाचक अटी व शर्थी टाकून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. याबाबीस माहूर तालुका संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध असून शासन स्तरावर नुकसानीचे सर्वेक्षण करून तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य देण्यात यावे अशी आग्रही मागणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रु.अनुदान देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

तूरडाळ चोरीला स्वस्त तांदूळ पडून


संजय डोंगरे 
स्वस्त तांदूळ सोडून चोरांनी तूरडाळीसह इतर  माल  चोरून नेल्याची घटना जाभरून जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत दि 22 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता उघडकीस आली  
वाशिम तालुक्यातील  जाभरून जहागीर जिल्हा परिषद शाळा उघडण्यासाठी 
दि 22 नोव्हेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षक आले  तेव्हा  स्वयंपाकगृहाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास  आले.  शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकगृहात  ठेवण्यात आलेले  दीड  क्विंटल तांदूळ सोडून चोरांनी तूरडाळ,,मुंगडाळ,मटकी चवळी,वाटाणा,मोहरी,मिरची पावडर,गरम मसाला,सोयाबीन तेल,जिर हळद आदी हजारो रुपयाच्या  मालावर  हात साफ केला मात्र स्वस्त तांदुळाचा एक दानाही चोरांनी न नेल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात  आहे  चिमुकल्याच्या तोंडचा घास चोरणाऱ्या क्रुर चोराविषयी संताप व्यक्त केल्या जात आहे घटनेची तक्रार अनसिंग पोलीस स्टेशनला नोंदविण्याची  प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत 
संजय डोंगरे 
जांभरून जहागीर
9922649578

शेतकऱ्याची आत्महत्त्या


दामोदर जोंधलेकर
वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खानापूर(बा) गावातील शेतकरी उत्तमराव तुळशीराम कडू या 55 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दुकानात गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली 
खानापूर(बा) येथे मृतक शेतकरी उत्तमराव  कडू यांची 2 एकर शेती आहे उदरनिर्वाह करण्यासाठी छोटेशे किराणा दुकान आहे सतत ची नापिकी दुष्काळग्रस्त परिस्थितीने कडू यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला  किराणा  दुकान चालत नसल्याने पत्नीसह मुलगा मोलमजुरी करून संसाराला हातभार लावायचे.  आज सकाळी पत्नी व मुलगा मोलमजुरी ला गेले असताना  कडू यांनी कर्जाला कंटाळून  दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मृतकाच्या मुलाने दिली .घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रेताचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहेत

दामोदर जोंधलेकर कारंजा

वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद जिल्हा आढावा बैठक शुक्रवारी



सम्राट टाइम्स लाईव्ह
युवकांचा बुलंद आवाज ,निर्भीड विध्यार्थी नेतृत्व निर्माण करून चुकीच्या गोष्टी वर प्रतिकार करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन 24 नोव्हेंबर शुक्रवार रोजी   दुपारी 1 वाजता मराठा सेवा संघाच्या स्थानिक कार्यालयात वाशिम येथे करण्यात आले आहे

बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा ,नवीन कार्यकारणी घटित करण्यात येणार ,अमरावती विद्यापीठाच्या वाशिम उपकेंद्रा बद्दल पुढील आंदोलनाची दिशा, एस. टी. महामंडळ बाबत ,अश्या अनेक गोष्टीवर निर्णय घेन्यात येणार आहेत
बैठकीला प्रमुख उपस्तिथी म्हणून  वि.भ.वि.प चे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी ,विदर्भ कार्याध्यक्ष नारायण शिंदे,जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख हे राहतील.तरी सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते व विद्यार्थी मंडळी नि या बैठकीला उपासतिथ राहावे असे आवाहन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वाशिम चे जिल्हा सचिव प्रवीण गोटे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

हिंदुस्थानावर हिंदूंचा हक्क तेवढाच मुस्लिमांचा- आमदार शर्मा


सम्राट टाइम्स लाईव्ह
 देशाची फाळणी झाल्यावर  जे मुस्लिम पाकिस्थानात  गेले ते पाकिस्थानी झाले जे मुस्लिम हिंदुस्थानात राहले ते आपलेच आहेत.  रिसोड मतदार संघात भारतीय जनता  पक्षाचा आमदार  निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी  संघटित राहणे गरजेचे आहे   हिंदुस्थानावर हिंदूंचा हक्क तेवढाच मुस्लिमांचा असल्याचे वक्तव्य   रिसोड मतदार संघाचे पालक आमदार गोवर्धन शर्मा यांनी मेडशी येथे आयोजित भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठकीत केले .
अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्यावर भारतीय जनता  पक्षाने रिसोड विधानसभा मतदार संघाची  पालक आमदार म्हणून जवाबदारी सोपविली. जवाबदारी स्वीकारतात त्यांनी रिसोड विधानसभा  मतदार संघाचे प्रवेशदवार असलेल्या मेडशी गावाला भेट दिली त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
मुकुंदराव मेडशिकर यांच्या निवास स्थानी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंदराव मेडशिकर यांची उपस्थिती होती   कार्यक्रमाला तानाजी पाटील,,गोपाल पाटील राऊत,मोहन बळी, रणजित मेडशिकर मारोतराव लादे,नितीन काळे ,संदीप पिंपळकर दीपक आसरकर संतोष घुगे , प्रियाताई पाठक, सरपंच रेखा मेटांगे,महेश धाबे,अमोल माकोडे  आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी  मुकुंदराव मेडशिकर,मारोतराव लादे,गोपाल पाटील राऊत ,तानाजी पाटील,,रणजित मेडशिकर,प्रियाताई पाठक यांची भाषणे झालीत कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली . सूत्रसंचालन मोहन बळी  तर आभार रणजित मेडशिकर यांनी मानले 
सम्राट टाइम्स लाईव्ह

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

मेडशी येथे पुलात ट्रक कोसळला



प्रवीण घुगे 
अकोला -हैद्राबाद  राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी येथे लेंडीच्या पुलात सफरचंद फळाने भरलेला ट्रक कोसळल्याची घटना आज सकाळी 5 वाजता च्या सुमारास घडली. ट्रक चालक गंभीर जखमी तर वाहक किरकोळ जखमी झाला . जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे रूग्नालयात हलविण्यात  आले आहे .  काश्मीर येथून सफरचंद फळाने भरलेला ट्रक  क्रमांक R J 14 G G-7699  आंध्रप्रदेशाकडे जात असताना आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास मेडशी येथील लेंडीच्या पुलात कोसळला अपघात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर वाहक किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती पोलिसाला मिळताच जमादार तिखिले आणि पोलीस कर्मचारी विलास गायकवाड घटनास्थळी पोहचले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर  प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग असताना या महामार्गावर खडेच खड्डे पडले आहेत .बऱ्याच ठिकाणी पुलाला सरक्षण कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे .मेडशी येथील लेंडीच्या पुलाच्या बाजूला लोकवस्ती बआहे पुलाला कठडे नसल्याने याठिकाणी बऱ्याच अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही शासन प्रशासन कुंभाकर्णी झोपेत आहे. लेंडीच्या पुलाला त्वरित संरक्षण कठडे बसविण्याची मागणी मेडशी ग्रामस्थांनी केली आहे 

प्रवीण घुगे मेडशी
9921444908

धुम्रपान विरोधी कायद्याची खुलेआम पायमल्ली....!



श्रीक्षेञ माहुर : - कार्तिक बेहेरे

     शासकिय निमशासकीय कार्यालयात खुले आम तंबाखु,गुटखा,खर्रा खात आसल्याचे तसेच सिगारेटचा धुवा उडवत असल्याचे निदर्शनास येत असुन धुम्रपान विरोधी कायद्याची खुलेआम पायमल्ली होत आहे.
    कार्यालयातुन गुटखा,खर्रा खावुन थुकणारे ब्रिस्टालचा धुवा उडवणारे कर्मचारी मस्तमाल होउन मजे घेत आसतात. ह्या कर्मचाऱ्यावर कोणाचाही धाक नसल्याने नियमाचे उल्लंघन केल्या जात आहे.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे.त्यावर दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल असे निर्देश आसतांना सुध्दा कायद्याची पायमल्ली करण्याचे काम कर्मचारी वर्गाकडुन होत असल्याने कायद्याचा फज्जा उडवल्या जात आहे.तर संपूर्ण कार्यालय मागे नसल्याचे बोलल्या जात आहे.
तर संपुर्ण कार्यालयात थुंकी,सिगारेटचे धुर खऱ्याच्या, गुटख्याच्या पिचकाऱ्याची निशानी, शासकिय सौचालयामध्ये सिगारेट चे तुकडे पहाव्यास मिळत आहे.सर्व सामान्य नागरिकांना धुम्रपान करणे,गुटखा,खर्रा सेवन करणे हा कायद्याने गुन्हा आहे.कायद्याचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई नक्कीच होईल आसे संदेश बँनर जागोजागी लावले गेले असलेतरी कायदा तयार करणारे कर्मचारीच जर कायदा जुमानत नसतील तर या सर्व सामान्य नागरिकांवर कोण कार्यवाही करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

धार्मिक परंपरांना फाटा देत अंधश्रद्धा निर्मूलन व सत्कार कर्यक्रम संपन्न



कारंजा:-ग्राम बेलखेड येथील कॉ. रामेश्वर डोईफोडे यांच्या चवथ्या स्मृती दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना फाटा देत त्यांच्या कुटुंबीयानी अंधश्रद्धा निर्मूलन व सैनिक पालकांचा सत्कार कार्यक्रम दि. १९/११/२०१७ ला ग्राम बेलखेड येथे घडवून  आणला. सदर कार्यक्रमात अनिसचे  राज्य संघटक दिलीप सोळंके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर त्यांचे सोबत अंनिसचे यवतमाळ जिल्हा संघटक बंडू बोरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अंबादास खडसे, जिल्हा संघटक विजय भड , राम  नाखले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर उपस्थित होते. 
कामठा बेलखेड ह्या दोन्ही गावातील सैन्य व पोलीस मध्ये मुले पाठविणाऱ्या पालकांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात दिलीप सोळंके अनेक बदमाश बुवा बाबांचे उदाहरण देत घटक व कालबाह्य धार्मिक रूढी, प्रथा यामुळे समाजाचे कसे शोषण होते त्याबद्दल प्रात्यक्षिकासह आपल्या विनोदी शैलीत प्रबोधन केले. त्या प्रसंगी गजानन अमदाबादकर , अंबादास डोईफोडे , बंडू बोरकर, यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली. यावेळी मंचावर पोलीस पाटील शंकर मोरे , चेतना अध्यापक विद्यालय वर्धा येथील प्राचार्य पंकज मुनेश्वर, युवा रूरल नागपूर चे देवराज पाटील, बाबारावजी घन, बाबाराव वानखडे आणि  आदी. उपस्थित होते . 
कार्यक्रमाचे आयोजन डोईफोडे परिवार व क्रांती रूरल डेव्हलपमेंट असोसिएशन, बेलखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर डोईफोडे यांनी व आभार प्रदर्शन कु. दीपाली डोईफोडे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आकाश पवार, आशिष धोंगडे, विशाल ठाकरे, अजय सुलताने, सचिन चांदुरकर, अक्षय जवंजाळ, निलेश डोईफोडे, महेश पारडे, जयश्री घन , सचिन पवार, प्रवीण वानखडे, भूषण साखरे, योगेश गंगोले, गोपाळ डोईफोडे, पवन वानखडे, व रोशन वानखडे आदीनी परिश्रम घेतले. तर बेलखेड कामठा येथील ग्रामस्थ तथा  महिला भगिनी यांनी प्रबोधनाचा आस्वाद घेत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

संस्कार व आध्यात्मिक केंद्राकरीता चार एकर जमिन देणार सोमाणी परिवाराचा निर्णय


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : राष्ट्रीय युवा पुरस्काराने भारत सरकार व्दारा पुरस्कृत सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी आध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकर यांना नागपूर येथील आश्रमामध्ये बहुचर्चित गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंदलेले व नुकतेच प्रकाशित झालेले क्रांतीकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे कडवे प्रवचन भाग नऊ हे पुस्तक भेट देवून त्यांचा आशिर्वाद घेतला.
    तदनंतर क्रीडा संकुल येथे आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यक्रमात मेळघाट येथे 20 वर्षापासून आदीवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तु, धान्य, आपादग्रस्तांना मदत, निराधारांना आधार, व्यसनमुक्ती, अवयवदान अभियान, नेत्रदान, रक्तदान, बेटी बचाव बेटी पढाव समवेत विविध सामाजीक कार्य करणारे तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा मंचावर श्रीश्री रविशंकरजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
चार एकर जमीन दान देणार
    जिल्हयातील धनज बु. येथील रहिवासी सोमाणी परिवाराची वाशीम जिल्हयातील भामदेवी येथे वडीलोपार्जित जमीन आहे. सदर गाव हे मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतले असून या गावात विकासाच्या विविध योजना, प्रकल्प सुरु आहेत. आज बालकांना संस्कार व परिवारांना आध्यात्मिक ज्ञान जरुरी असल्याने भामदेवी येथील चार एकर जमीन श्रीश्री रविशंकरजी यांना संस्कार व आध्यात्मिक केंद्राकरीता देण्याचा निर्णय समाजसेवी पुनमचंद सोमाणी, सौ. स्नेहलता सोमाणी, राजेश सोमाणी, निलेश सोमाणी, शाम सोमाणी यांनी घेतला आहे. बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे शिक्षक डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव देण्यात येणार असून या केंद्राच्या भूमिपुजनाला श्रीश्री रविशंकर यांना भामदेवी येथे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भामदेवी येथे जागृत माता जगदंबा देवस्थानही आहे. जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हींगच्या संस्कार व आध्यात्मिक केंद्राच्या निर्मितीकरीता सोमाणी परिवाराने पुढाकार घेतला असून त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

श्री क्षेत्र शेगाव येथे लिंगायत समाजाचा भव्य वधु-वर परिचय मेळावा


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - विदर्भ लिंगायत संंघटन समितीच्या वतीने विदर्भात प्रथमच श्री क्षेत्र शेगाव येथे येत्या 25 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस लिंगायत समाजाचे महासंमेलन व भव्यदिव्य स्वरुपात उपवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कायर्र्क्रमास जिल्हयातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विरशैव लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष काशीनाथआप्पा लाव्हरे यांनी केले आहे.
    शेगाव येथील खामगाव रोडवरील हॉटेल श्रीकृष्णा कॉटेजमध्ये आयोजीत या  महासंमेलनाचे उद्घाटन शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. यावेळी धर्मगुरु श्री ष.ब्र. 108 वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी साखरखेर्डा यांची आशिर्वादपर उपस्थिती राहील. तसेच चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, मुर्तीजापुरचे आमदार हरिष पिंपळे, चिखलीच्या नगराध्यक्षा सौ. सुप्रियाताई बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभेल. याच दिवशी दुपारी 3 वाजता वधु-वर परिचय मेळावा उद्घाटन समारंभास कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंंडकर हे उपस्थित  राहून वधु-वर परिचय मेळावा पुस्तिकेचे विमोचन करतील. रविवार, 26 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता वधु-वर परिचय मेळाव्याला सुरुवात होवून सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाची सांगता होईल. या दोन्ही दिवशी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच वधु-वर परिचयासाठी ज्या उमेदवारांनी नोंदणी अर्ज भरले आहेत त्यांनी 25 तारखेला सकाळी 9 वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक असून त्याशिवाय त्यांच्या निवासाची व्यवस्था होणार नाही. असेही लाव्हरे यांनी कळविले आहे.
    विरशैव युवक युवतींनी या महासंमेलनात उपस्थित राहून सर्व बाबतीत योगदान द्यावे. भविष्यात विरशैव समाजाची सर्व भिस्त नविन पिढीवर आहे. विरशैव लिंगायत समाजाला परत प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे काम त्यांना करावयाचे आहे. या संमेलनातून त्यांनी नवीन उर्जा प्राप्त करुन घ्यावी व महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान सर्व जगात पसरवावे व आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून द्यावे असे आवाहन लाव्हरे यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

सोनार समाजाचा राज्यव्यापी वधु-वर पालक परिचय महामेळावा


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : सर्व शाखीय सोनार समाजाची सामाजीक संघटना असलेल्या सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने येत्या रविवार, 26 नोव्हेंबर रोजी परभणी येथे सोनार समाजाचा राज्यव्यापी समाज मेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जिल्हयातील सोनार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष  तथा भाजपा शहर सरचिटणीस कैलास मुगवनकर यांनी केले आहे.
    परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंती ना. बबनराव लोणीकर हे करतील. तर अध्यक्षस्थान भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे भुषवितील. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील आजी माजी आमदार, खासदार व जेष्ठ मान्यवरांची उपस्थिती राहील. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, दिप प्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार सोहळा, प्रास्ताविक भाषणानंतर समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी कार्यक्रमामध्ये समाजातील जेष्ठ समाजसेवक यांना समाज कार्याचा गौरव म्हणून त्यांना समाज महर्षी, समाज रत्न, समाजभुषण, समाजसेवक, समाजमित्र आदी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या राज्यव्यापी महामेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याला जिल्हयातील समाजबांधवांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, प्रदेश अध्यक्ष विलास भांबुर्डेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मधुकरराव टाक, उपाध्यक्ष दिलीप नागरे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत टाक, प्रदेश संघटक बजरंग खर्जुले व वाशीम जिल्हाध्यक्ष तथा भाजपा शहर सरचिटणीस कैलास मुगवनकर यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील समस्या दुर करा अभाविपचे समाजकल्याण विभागाला निवेदन


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : सामाजीक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या स्थानिक रेल्वे गेट जवळील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील समस्या दुर करुन विद्यार्थ्याना सुविधा देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 20 नोव्हेंबर रोजी जि.प. समाजकल्याण  अधिकार्‍यांना निवेदन देवून करण्यात आली.
    निवेदनात नमूद केले आहे की, शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्याना अनेक समस्या गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत आहेत. पलंग तुटक्या अवस्थेत आहेत. वसतीगृहातील पंखे नादुरुस्त आहेत. शौचालय व बाथरुममध्ये विजेची व्यवस्था नाही. सफाई कामगारांकडून स्वच्छतेची काळजी घेतल्या जात नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता केल्या जात नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यासाठी भोजन व्यवस्थेमध्ये नियम पाळल्या जात नाहीत. नियमानुसार त्यांना जेवण दिले जात नसून ठरविलेल्या मेनुनुसार जेवण न देता निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात आहे. या सर्व समस्यांमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनात अडथळा निर्माण होत आहे. येत्या दहा दिवसात वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या दुर न झाल्यास अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 
    निवेदन देतांना अभाविपचे नगरमंत्री जगदीश इंगोले, जिल्हा संयोजक ऋषांत कोरान्ने, शिवम कदम, अजय बोरकर, दिनेश चव्हाण, यशवंत काळे, सौरभ नानवटे, यशवंत काळे, साहील डवरे, श्रीवेद केळकर, चिन्मस लक्रस, ऋषीकेश पंडीत, मनोज अवचार, विठ्ठल उगले, अभिनंदन जाधव, दिलीप राठोड, धीरज धांडेे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्राट टाइम्स लाईव्ह

किन्हीराजा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दुसर्यांदा सुनील गोदमले


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम जिह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती च्या अध्यक्षपदासाठी गोंधळा च्या वातावरणात  निवडणूक झाली निवडणुकीत 99 मते घेऊन  दुसर्यांदा  सुनील गोदमले विजयी झाले तर  त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश ठाकरे पराभूत झाले  ठाकरे यांना 85 मते पडली
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा मोठी समजल्या जाणारी ग्रामपंचायत आहे  येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या 15  आहे गाव पूर्वीपासून  वादग्रस्त  आहे येथे कधी काय घडेल याचा नेम नाही गावात तंटा मुक्त समिती अध्यक्ष बदल आणि निवडणुकीचे  वारे बऱ्याच महिन्यापासून वाहने सुरू होते अध्यक्ष सुनील गोदमले यांना काही लोकांचा विरोध होता 2 व 13 ऑक्टोबर ला ग्रामसभा रद्द झाल्याने काही लोकांच्या मनसुभ्यावर पाणी फेरल्या गेले
अखेर 21 नोव्हेंबर ला महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी  ग्रामसभा सरपंच सौ वेणूताई जामकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत च्या गोपिनाथ मुंडे सभागृहात आयोजित करण्यात आली तंटा मुक्त समिती अध्यक्षपदासाठी 8 उमेदवार इच्छुक असल्याने गोंधळ उडाला 8 उमेदवार तटस्थ असल्याने आवाजी मतदान घेण्याचे ठरविण्यात आले 6 सदस्यांनी माघार घेतल्याने सुनील गोदमले आणि सुरेश ठाकरे यांच्या सरळ लढत होऊन सुनील गोदमले दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाड़े यांनी काम पाहिले सभेला ग्रामपंचायत सरपंच वेणूताई जामकर  ,उपसरपंच संजय डिवरे ,सदस्य, कर्मचाऱ्यांसह  ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती तर जऊळका ठाणेदार शेख यांनी चोख  पोलीस बंदोमस्त  ठेवला होता. 

महादेव हरणे
सम्राट टाइम्स लाईव

बेंबळा येथे कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव तर्फे गरोदर महिलाकरीता एकदीवशिय कार्यशाऴा संपन्न.


कामरगाव - येथून जवळ असलेल्या बेंबऴा येथे कला व विज्ञान महाविद्यालय  कामरगाव तर्फे  गरोदर महिलाकरीता एकदीवशिय कार्यशाऴेचे आयोजन दी . 20/11/2017, ला जि, प , प्रा. शाळा बेंबळा. येथे करण्यात आले होते . तरी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मनुन उपस्थीत लाभलेले ग्रा. रुग्णालय कामरगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ . राठोड सर उपस्थित होते .तसेच कला व विज्ञान महाविद्यालय  कामरगावचे प्रा. सिद्धार्थ वाठोडे सर ,  प्रा. अर्चना बजाज मँडम .उपस्थित होते व गावातील मुख्याध्यापक अघडते सर , पोहरे मँडम , सिंधूताई काळेकर इ ,  गावातील प्रमुख उपस्थिती होती, त्याच बरोबर राठोड सर यांनी पौष्टिक आहाराचे महत्व समजाउन सांगितले.गर्भारपणात स्त्रीयांनी चौकस आहार घ्यावा हा सल्ला तर सार्‍याच जणींना ठाउक असतो मात्र गर्भारपणात नेमके कोणते पदार्थ कटाक्षाने टाळावेत हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.गर्भारपणात स्त्रीला तिच्यासोबात तिच्या कुशीत वाढणाऱ्या बाळाचीही काळजी घेण्याची गरज असते अशावेळी योग्य आहार व पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. मग या काळात नियमित आहारात असलेले काही पदार्थ टाळणे गरजेचे आहे ते कोणते ते पहा 
साखर 
साखर हा तुमच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. साखरेमुळे शरीराला ग्लुकोजचा पुरवठा होतो ज्यामुळे शरीराला काम करण्याची उर्जा मिळते. हीच साखर गर्भारपणात काबूत ठेवणे फार गरजेचे आहे. साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे गर्भारपणातील मधुमेहाचा त्रास संभावू शकतो , तसेच बाळातही काही दोष निर्माण होऊ शकतात . तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असल्यास आहारात गुळाचा वापर करा. गूळ तुम्हाला नैसर्गिक स्वरूपातील साखर पुरवते.
मीठ
गर्भवती स्त्री व वाढणारा गर्भ या दोघांनाही मिठाची नितांत गरज असते , मात्र त्याचे कमी जास्त प्रमाण दोघांनाही घातक आहे. अतिरक्त मिठाच्या सेवनाने स्त्रीच्या हातापायांवर, पोटावर सूज येते. तर बाळाच्या किडनीच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच लोणची, पापड, मसाले हे पदार्थ कितीही चविष्ट वाटले तरी त्यांचा कमी वापर करणेच हितावह आहे.
तांदूळ 
तांदूळ (भात) शरीराला कर्बोदकांचा पुरवठा करीत असला तरी गर्भवती स्त्रियांनी तांदळाचा समावेश टाळावा . विशेषतः या काळात जर तुमच्या रक्तातील साखर वाढली असल्यास तांदूळ तुम्हास हितावह नाही. तसेच तांदळातून खूप कॅलरीज शरीरास मिळतात परिणामी योग्य व्यायाम न केल्यास तुमचे वजन वाढू शकते. तांदूळ व्यर्ज करण्यापेक्षा तुम्ही लाल तांदुळाचा समावेश करू शकता .

पश्चराइज न केलेले दुध 
गर्भारपणात ग्लासभर दुध पिणे तुम्हाला पूरक कॅल्शियम देते परंतु ते दुध पश्चराइज केलेले असावे. कच्च दुध किंवा पश्चराइज न केलेले दुध गर्भारपणात पिऊ नये. यामुळे त्यातील जीवाणू तुमच्यावर घातक असतात . अशा तऱ्हेने विविध प्रश्नाचा खुलासा करून राठोड सरांनी महिलांना मार्गदर्शन केले .व कार्यक्रमाचे सूत्रसंनचालंन विशाल ठाकरे यांनी केले .

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

श्रेयासाठी घाईने हागणदारीमुक्त घोषित माहुर तालुक्यातील अनेक गावात शौचालयाची कामे अपूर्ण

 स्वच्छ भारत मिशनवर प्रश्नचिन्ह ?

 श्रेयासाठी घाईने हागणदारीमुक्त घोषित  माहुर तालुक्यातील अनेक गावात शौचालयाची कामे अपूर्ण

तपासणी समिती स्थापन करून तालुक्यात दौरा करून वास्तव उजेडात आणणार !  सुदर्शन नाईक
—————————————————

श्रीक्षेञ माहुर : - कार्तिक बेहेरे

             माहुर तालुक्यातील अनेक गावात  ग्रामस्थ अजुनही रस्त्याच्या कडेला शौचास बसत असल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या हाती टमरेल कायम असल्याचे चिञ सर्वञ दिसत आहे.नुकतेच माहूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा प्रशासन स्तरावरून करण्यात आली असून अत्र, तत्र सर्वत्र अनेक गावात उघड्यावर शौचास जाणे काही थांबलेले दिसत नसून त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत मिशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने आम्हीच मोठे विकास पुरुष असल्याचा दावा करणारे विद्यमान लोकप्रतिनिधी आगामी निवडणुकीत श्रेय मिळून लाभ  घेण्यासाठी घाईगडबडीनेच अनेक समस्या कायमच असतांना सत्तेच्या जोरावर जाहीर करून घेत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रकार करत असून. या सर्व बाबीचा विविध सामाजिक संघटना व इच्छुक पत्रकार मंडळीचा समावेश असणारी राजकारण विरहीत समिती स्थापन करून माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून “दुध का दुध, अन पाणी का पाणी”  करून वास्तव जनतेसमोर आणणार असल्याचा मनोदय शिवसेना तालुका संघटक तथा बंजारा तांडाचे उपसरपंच युवा नेते सुदर्शन नाईक यांनी दै. आदर्श गावकरीशी बोलतांना व्यक्त केला आहे.
     यापूर्वीच्या सरकारने राबविलेले स्वच्छ भारत अभियानामध्ये विद्यमान सरकारने त्यांच्यापण काही संकल्पना घुसवून हे अभियान सलग केले व “ स्वच्छ भारत स्वस्थ भारत” चा नारा देत प्रधानमंत्री ना. नरेंद्र भाई मोदीजीनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रशासनाच्या शिलेदारांना सक्त ताकीद देऊन स्वच्छ भारत निर्माण झाला पाहिजे असा आग्रह धरला व  ग्रामिण भागातील ग्रामस्यांचे आरोग्य चांगले रहावे,त्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारांची लागण होऊ नये,व परिसरात  घाणीचे साम्राज्य पसरु नये यासाठी शासनाने करोडो  रुपये खर्च करुन योजना राबवली त्या पैकी निर्मल भारत अभियान गावागावत राबविल्या जाते. पण गावात स्वच्छ परिसरच दिसत नसल्याने ही योजना कुठे राबविली जाते हे  गुलदस्त्यातच आहे.
     अनेक गावात शौचालय नसल्याने पुरुष व महिला वर्ग रस्त्यावर बसत असल्याने रोगराई पसरत आहे.यावरुन ग्रामिण भागात ही योजना कशी राबविली जाते हे या वरुन दिसुन येते.महिला वर्गाना शौचास जाण्या करीता मोठी कसरत करावी लागते. शासन एकीकडे प्रत्येकांच्या घरी शौचालय व्हावे गाव हागणदारी मुक्त व्हावे यासाठी विषेश प्रयत्न करीत नविन योजना राबविते  ,माञ  प्रशासनातील काही प्रशासप्रिय अधिकारी  व लोकप्रतिनिधीची मर्जी राखण्याच्या व त्यांच्या  श्रेय लाटण्याच्या  लढाईत या योजनेची फलश्रुती ही कुठेच दिसत नाही. तालुक्यात बरेच गाव निर्मल ग्राम म्हणुन निवडले व तेथे ही योजना राबविली माञ त्या गावातील परिस्थिती जैसे थे आहे महिलांना शौचास जाण्यासाठी केव्हा अंधार पडेल  याची प्रतिक्षा करावी लागते ही बाब सर्वासाठी अपमानस्पद आहे. तरीही या कडे अनेक कुटुंब जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
     शौचालय बांधण्याकरिता येणाऱ्या  अनुदानातुन अनेक ठिकाणी शौचालय पुर्ण होत नाही तर नागरिकांना कर्ज काढून भरती करावी लागत असल्याची  ग्रामस्थ ओरड करतात.शासनाच्या वतीने मिळणाऱ्या इंदीरा आवास योजनेत घर व शौचालय बांधण्याची अट आहे.परंतु या योजनेचा निधी हा अभियंता वा अधिकारी आपल्याच मर्जीने लाभर्थाना वाटप करतात आणि पुर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्याना उर्वरीत अनुदानासाठी पंचायत समितीला जावुन पायपीट करावी लागते माञ तरीही अधिकारी लक्ष द्यायला तयार नसतात आणि या योजनेत लाभार्थी पाञ ठरला तरी अधिकारी व ग्रा.प.चे सदस्य धनादेश काढण्यासाठी चिरीमीरी मिळते का हेच पाहतात. या मुळे योजना कोणतीही असो हा व्यवस्थित पणे राबवित नसल्याने त्याचा लाभ हा नागरिकांना होतांना दिसत नाही.उसनवार पैसे काडुन शौचालयाचे काम केले तरी वेगवेगळी कारणे समोर करीत अधिकारी हे नागरिकांना नाहक ञास देतात.अनेकाकडे शौचालय बांधुन असतांना त्याचा वापर करीत नसल्याने निर्मल भारत योजनेचा माहुर तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसुन येत असल्याने याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी असून आता तपास समिती स्थापन करून वास्तव स्थिती जाणून घेणार व जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असून तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या गावातील वस्तुस्थिती ची माहिती दिल्यास त्याचा निश्चितच पाठलाग करणार असल्याचेही शेवटी नाईक यांनी सांगितले.  

रोजगार मेळाव्यातून २४४ उमेदवारांची निवड



     वाशिम येथे रोजगार मेळावा  

सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २४४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

यावेळी मोतोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. नारायण गोटे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अ. सं. ठाकरे, प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकमध्ये श्री. ठाकरे म्हणाले, बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून घेऊन युवकांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावावा. डॉ. गोटे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यामध्ये औरंगाबाद येथील लॉकसेफ मल्टीसर्व्हीसेस प्रा. लि., धूत ट्रान्समिशन, पुणे येथील एस. आय. एस. इंडिया प्रा. लि., नागपूर येथील नवभारत फर्टिलायझर्स प्रा. लि. आणि वाशिम येथील एस.आय.सी. कार्यालय आदी उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी ७२२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. यापैकी २४४ उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. भोळसे यांनी तर आभार प्रदर्शन डी. ई. वावगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सम्राट टाइम्स लाईव्ह

बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे...... - नायमुर्ती पनाड.



मंगरूळपीर :- 
विधी सेवा प्राधिकरण सप्ताहा निमित्त दिवानी न्यायालय, मंगरूळपीर यांचेवतीने स्थानिक मंगलधाम परिसरातील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेत आयोजित बालदिनाचे कार्यक्रमात तालूका विधी सेवा समिती चे अध्यक्ष, तथा  दिवानी न्यायालय कनिष्ट स्तर चे  न्यायाधिश पनाड यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालूका विधी सेवा समिती चे अध्यक्ष, तथा  दिवानी न्यायालय कनिष्ट स्तर चे  न्यायाधिश मा. पनाड साहेब हे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून वकील संघाचे तालूकाध्यक्ष अॅड. एन्. एम्. मूळे, अॅड. संतोष सरकाळे, महात्मा फूले शिक्षण व क्रिडा प्रसारक संस्थेचे अध्यक्ष हिरामण इंगोले, सचिव संतोष शेटे, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. प्रतिमा डवले, सावंत, देशमूख, हे होते. 
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महान विज्ञाननिष्ट, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन, हारार्पण करण्यात आले. यावेळी शाळेचे वतीने मान्यवरांचे पूष्पगूच्छ देवून स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अॅड. संतोष सरकाळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली. 
तर तालूका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. एन्. एम्. मूळे यांनी 'न्याय सर्वांसाठी' या भुमिकेतून निर्मात विधी सेवा प्राधिकरण, रचना,कार्य, त्यामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, इ. बाबत माहिती दिली. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष, तालूका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर चे मा. न्यायाधिश पनाड साहेब यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष हिरामण इंगोले हे दोन्ही डोळ्यांनी अंध, अपंग, निराधार, निराश्रित, अशिक्षित असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले व गोरगरीबांच्या मुलांकरीता त्यांचेच वस्तीत शाळा काढली ही फार मोठे कार्य आहे, असे सांगत यांचे अभिनंदन केले. व सोबत शासनाने विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती व त्याची प्रभावी अंमलबजावणी करून सामाण्य, शोषित, पिडित, अनाथ, गरीबांना मोफत न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली. बालकांना विविध हक्क व अधिकार दिलेले आहेत त्यांचे रक्षण झाले पाहिजे. बालकांचे शोषण बंद झालेच पाहिजे. बालमजूरी, बालकामगार, बालकांवर होणारे शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार मूक्त समाज घडविणे, हे आपले प्रथम कर्तव्य मानून त्याविरोधात कायद्यासोबतच मानसिकता बनवूया. 'से नो टू चाईल्ड व्हायलन्स' असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचलन शिक्षक निलेश मिसाळ यांनी तर आभार शिक्षक योगेश गवई यांनी मानले.
यावेळी, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट्स् व चाॅकलेट्स् चा खाऊ वाटप करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेचे कु. प्रतिमा डवले (मूख्याध्यापिका), शिक्षक योगेश गवई, महादेव ससाने, श्रीकृष्ण दबडे,गजानन उखळकर, विनोद मूसळे, सतिश सरोदे, आणि निलेश मिसाळ यांसोबत विधी सेवा समिती, तालूका विधीज्ञ संघ, मंगरूळपीर दिवाणी न्यायालयाचे कर्मचारी सावंत, देशमूख, वर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

सम्राट टाईम्स लाईव्ह

सिंदखेड येथील पोलीस ठाण्याची ईमारत जीर्ण अवस्थेत....




सिंदखेड येथील पोलीस स्टेशन वाईबाजार येथे स्थलांतर करण्याची मागणी...


वाई बाजार...कार्तिक बेहेरे


माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याची ईमारत सन १९१८ मध्ये निजामशाही च्या काळात बांधण्यात आलेली आहे. ९९ वर्षापूर्वीची ही ईमारत आता जिर्ण झाली असुन या ईमारतीचे छञ पावसाळ्यात नेहमी गळते.ईतर वेळी या छताचे पाेपडे,मातीचे गोळे खाली पडतात,या ईमारतीत केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या वाई बा.येथील मोकळ्या जागेत सिंदखेड पोलीस स्टेशनचे स्थांलातर करण्याची आमजनतेत मागणी होत आहे.

 पावसाळ्याच्या दिवसात पोलीसांव्दारे छतावर मेनकापड टाकुन पाणी गळण्या पासुन रोखण्याचे केवीलवाने प्रयत्न केले जातात,तरीही ठिकठिकानी पाणी गळतेच या ईमरतीत अनेक ईलेक्टाँनिक जसे संगणक,सी.सी.टीव्ही यंञणा,मालखाना,बंदुकासह विविध महत्वाचे दस्तावेज आहेत,हे साहीत्य सुरक्षित ठेवण्यास पोलीसांना बरीच कसरत करावी लागते.वर्षातुन दोनदा जिल्हा पोलीस अधिक्षक आणि इतर अधिकार्याकडुन पोलीस ठाण्याचे निरक्षण होते,त्यांनाही या बाबतची माहिती वेळोवेळी देण्यात आली आहे.तसेच पोलीस ठाण्या कडुन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला वेळीवेळी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.तेथुन ही या बाबत कारवाई सुरु आहे,

त्याच प्रमाने येथील पोलीस कर्मचार्याना येथे निवासाची व्यवस्था नाही,जे निवासस्थाने होते ते सर्व भुईसपाट झाले आहे,या कर्मचार्यांना ईतरञ भाड्याच्या खोल्या करुन राहण्याची वेळ आलेली आहे,तसेच या ठिकाणी तिव्र पाणी टंचाई असुन कर्मचार्यांना फ्लोराईड युक्त पाणी पिऊन आपली जवाबदारी पार पाडावी लागत आहे.तसेच या ठाण्या अंतर्गत ५२ गावे येत असुन  परिसरात कुठला अनुचीत प्रकार घडला तर खराब रस्त्यामुळे  घटनास्थळी पोलीसांना पोहचण्यास विलंब होतो,अशा अनेक अडचणीचा सामना येथील पोलीस कर्मचार्यांना करावा लागत  आसुन वरिष्ठांनी या कडे लक्ष देवुन येथील पोलीस स्टेशन ५२ गावाचा परिसराती केंन्द् बिंन्दु आसलेल्या वाई बाजार येथील नक्षल चळवळीच्या  काळात या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस चौकी निर्माण केली होती. ती जागा आजमितीस पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असुन सिंदखेड येथील पोलीस स्टेशन वाई बाजार येथे स्थलांतर करण्यात यावी,किंव्हा पोलीस दुरक्षञ तरी या ठिकाणी स्थापणा करावी,अशी मागणी सुज्ञ नागरिकातुन होत आहे.