शुक्रवार, ४ मे, २०१८

सुषमा ताई अंधारे यांचे वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वाशीम मध्ये निषेध




वाशीम /प्रतिनिधी

 फुले शाहू आंबेडकर विचार धारेची बुलंद तोफ :प्रा. सुषमा ताई अंधारे यांचे  इंदूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा  डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने जाहीर निषेध नोंदवला आहे हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले आहे 
प्रा अंधारे इंदोर येथून व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परत येत असताना अनोळखी नंबर असलेल्या गाडीने मागून जबरदस्त धडक दिली. त्यामध्ये सुषमा ताई अंधारे जखमी झाल्या आहेत 
सदर धडक देणारे यांच्या वर कठोर कारवाई करावी. व त्यांना तातडीने अटक करावी. आणि सुषमा ताई अंधारे यांना शासनाने त्वरित पोलीस संरक्षण द्यावे. यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना , आंबेडकरी चळवळीतील व  साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी  मागणी केली बस स्थानक जवळील रेस्ट हाऊस येथे आयोजित बैठकीत हल्लेखोरांचा जाहीर निषेध नोंदवला  जाहीर निषेध नोंदवला  निषेध सभा आटोपल्यावर  जिल्ह्य़ाधिकारी यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले 
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान ,  अडव्होकेट  पी पी अंभोरे, साहित्यिक महेंद्र ताजने,  माजी पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ खंडारे ,पप्पू घुगे, महेंद्र खंडारे, सुमेध खंडारे प्रविण पट्टेबहादूर आदी उपस्थित होते.

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

संत गजानन महाराज प्रगट दिनी उमरवाडी येथे महाप्रसाद हजारो भाविकांनी घेतला लाभ




मालेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल उमरवाडी गावात संत गजानन महाराज प्रगट दिनी भागवत सप्ताहसह  विविध कार्यक्रम पार कार्यक्रम पडले  प्रगट दिनी महाप्रासादाचा हजारो भाविक भक्तांनी  लाभ घेतला .
उमरवाडी गाव आदिवासी बहुल  आहे .मेडशी परिसरात संत गजानन महाराज मंदिर असणारे उमरवाडी एकमेव गाव असून या गावात दारूबंदी आहे हे विशेष!
8 वर्षांपूर्वी  प्रदीप पाठक यांच्या पुढाकाराने गावात संत गजानन महाराज प्रगटदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. अज्ञान पसरलेल्या गावात संत गजानन महाराज कृपेने गावाचा कायापालट झाल्याची गावकऱ्यांची श्रद्धा आहे. गावकऱ्यांनी एकत्रित येत गावात संत गजानन महाराजाचे भव्य मंदिर उभारले . दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  संत गजानन महाराज प्रगट दिनी भागवत सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले होते. भजन ,कीर्तन, प्रवचन  भागवत कथा  , पारायण सात दिवस कार्यक्रम पार पडले .प्रगटदिनी दुपारी  2 वाजता  संत गजानन महाराज  मूर्तीची महापूजा  मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते  प्रदीप पाठक व सौ  प्रियाताई पाठक या दाम्पत्याचे शुभहस्ते पार पडली . महाआरती व अभिषेक होऊन  गजानन महाराज मिरवणुकीला सुरुवात झाली .गावातून  नृत्य करणाऱ्या घोड्यामागून ताळमृदुंगाचा तालावर भाविक भक्त तल्लीन झाले .आदिवासी संस्कृती जपत  महिला व मुलींनी गीतगात नृत्य सादर केले .यावेळी  महिलांची फुगळी  मिरवणूकीचे आकर्षण ठरले .वाजत गाजत मिरवणूक भवानी माता मंदिरापर्यंत आणण्यात आली .भवानी मातेला नैव्यद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. पंचकक्रोशीतील 11 हजार  भाविक भक्तांनी  शितबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला . उमरवाडी  गाव गण गणात बोते च्या गजरात दुमदुमून गेले यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी  पोलीस जमादार सुरेंद्र तिखिले ,पोलीस कर्मचारी विलास गायकवाड ,टाले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला

प्रवीण घुगे मेडशी प्रतिनिधी
9921444908

रविवार, २८ जानेवारी, २०१८

धनज पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गुटखा विक्रीला उधाण


कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावामध्ये गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आल्याचे समोर आले आहे. तरुण पिढीमध्ये या गुटखा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असे लक्षात येते. गुटखा सेवनामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये तोंडाच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गुटख्याच्या व्यसनामुळे तरुण पिढी कमकुवत होत चालली आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. या कडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गावागावांमध्ये गुटख्याचा व्यवसाय जोरात चालू आहे. गुटखा पुरविणारे लोक हे सायकल व दुचाकी वाहनांचा वापर करून माल पुरवितात, व माल विकण्याचे काम हे गावातील पानटपरी , किराणा दुकान हे करीत आहेत. हे लोक ठोक गुटख्याचा माल  कुठून घेतात हे अजूनही लक्षात आले नाही व याचा थांगपत्ता सुद्धा लागलेला नाही. सर्व परिसराची पाहणी केल्यानांतर असे लक्षात येते कि, गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे. याठिकाणी महिन्याकाठी लाखोंचा गुटखा विकला जातो पण या गोष्टीला कुठेच आळा  बसला नाही. याकडे एफ. डी. ए. चे दुर्लक्ष होत आहे. कारण या गुटखा विक्रीवर कार्यवाही न होता तो खुलेआम विकला जात आहे. व प्रत्यक्ष कार्यवाही पाहता फक्त २-३ % कार्यवाही होत आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी लोकांमध्ये चर्चा आहे.  
विनोद नंदागवळी कामरगाव प्रतिनिधी

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

सिंगडोह सिंगणापुर येथे प्रजासत्ताक दिन साजरा


मानोरा प्रतिनिधी: साखरडोह येथून जवळच असलेल्या ग्राम सिंगडोह सिंगणापुर येथे 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सरपंच अभिजित मन्वर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून ध्वजारोहण केले,यावेळी मुख्याध्यापक शाळेचे शिक्षक ,गावचे पोलीस पाटील सुखदेव पाटील,संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिलीप चव्हाण,रक्षण डीलर देवानंद चव्हाण,इंडल, फुलसिंग चव्हाण,विष्णू भगत,कर्मचारी विजय भगत,सह गावचे नागरिक ,माहिला,विध्यार्थी यांची उपस्थिती होती,,,,,,,,,,,
,सुशील भगत 8605501666

जिल्हा प.प्रा.म.शाळा कार्ली येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा

                जिल्हा प.प्रा.शाळा कार्ली येथे ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेंव्हा सर्व प्रथम संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. व सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणामध्ये येऊन ,सरपंच, उपसरपंच यांनी महापुशांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. शाळा वेवस्थापक समिती अध्यक्ष व शाळा वेवस्थापक शिक्षण तज्ञ ज्ञानेश्वर करडे यांच्या हस्थे झेंडा पूजन करण्यात आले. व जिल्हा प.प्रा.शाळा ,मुख्याध्यापिका ललिता वेरुळकर मॅडम यांच्या हस्थे झेंडा वंदना करण्यात आले.सलामी देऊन विध्यार्थीनि  राष्ट्रगीत घेण्याचे आले. तेंव्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सरपंच मीनाताई नाना करडे ,उपारपंच मनोज वासे , पोलिस पाटील विनोद तायडे ,तंटा मुक्ती अध्यक्ष देवानंद करडे , अंगणवाडी सेविका  संगीता पारे ,शाळा वेवस्थापक समिती अध्यक्ष व शाळा वेवस्थापक समिती शिक्षणतज्ञ ज्ञानेश्वर करडे मुख्याध्यापिका ललिता वेरुळकर , अमोल  पढेन सर गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थित मध्ये  ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा वेवस्थापक समिती शिक्षणतज्ञ ज्ञानेश्वर करडे यांनी ममोगत वेक्त केले व जिल्हा प. च्या मुख्याध्यापिका यांना हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा देण्यात आले.                    प्रतिनिधी - दामोदर जोंधळेकर ,९९२२३६५१४९

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .....॥


वार्ता / 26 जानेवारी 
उकळी पेन :- येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  आला .सर्वप्रथम संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली , प्रभातफेरी मध्ये स्वच्छता अभियान ,  संडास बांधा घरोघरी , व्रुक्ष लावा व्रुक्ष जगवा , बेटी बचाव बेटी पढाव , आदी फलक  हातात घेऊन भारतीय महापुरुषांचा जयजयकार करण्यात आला .
सर्वप्रथम महापुरुषांच्या फोटोंना मान्यवरांच्या हस्ते  हार घालून वंदन करण्यात आले .
तसेच मुख्याध्यापक डवरे सर यांचे शाल व श्रीफळ देवून गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
प्रभातफेरी संपल्यावर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले , सदर कार्यक्रम शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेशभाऊ इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .तर ध्वजारोहण मुख्याध्यापक संजय डवरे यांच्या हस्ते पार पडले .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शा.शि.स.उपाध्यक्ष डॉ.सुधाकर गांजरे व सर्व सदस्य ,   सरपंचा मंगला खोड्के ,  उपसरपंच गोवर्धन चव्हाण , व सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक माळकर,गावचे  प्रतिष्ठित नागरिक जीवन मह्ह्लले , मोहन गांजरे , नितीन जैताडे , गजानन जैताडे , विद्या प्रबोधिनी विद्यालयचे प्राचार्य संजय पेशकलवाड , प्रा . संदीप भगत सर , राजेश लांभाडे सर ,  पोलिस कर्मचारी खडसे जमादार ,  शब्बीर सर , पालकवर्ग , उपस्थित  होता .
सदर प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक संजय डवरे सर व सर्व शिक्षक व्रुंद सौ .लव्हाळे मेडम , मनवर मेडम , शेलारे मेडम ,  दीपक जावळे सर ,  हातगुडे सर ,गंगावने सर , बोरचाटे सर , बिराजदार सर , भोयर सर , आदी नी परिश्रम घेतले . 
सम्राट टाइम्स 
सुरेश इंगोले 
8830966982

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

साखरडोह येथील वसंतराव नाईक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा


मानोरा प्रतिनिधी : तालुक्यातील साखरडोह येथिल वसंतराव नाईक विध्यालायमध्ये 69 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उद्धव काजळे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करून ध्वजारोहण केले,यावेळी शिक्षक अशोक ठाकरे,विलास पत्की,किशोर नाटेकर ,कर्मचारी जगदीश राठोड,दत्त राऊत, अशोक कोकरे,गजानन धोंगडे,वर्ग 8,वर्ग9,व वर्ग 10 चे विध्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते,यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावामधून भव्य रॅली काढून  नारे देऊन गाव दुमदुमून गेले होते,,,,,,,,,सुशील भगत मो 8605501666

कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव छात्रसंग सचिवपदी चि. मंथन थोरात


कामरगाव - कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव छात्रसंघ सचिवपदी बि.ए.भाग दोनचा विद्यार्थी चि.मंथन थोरात यांची निवड करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने निरदेशन केल्यानुसार  १८ जानेवारी २०१८ नुसार सदर महाविदयालयात विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात   आले होते. त्यामधे गुनवत्ते नुसार विद्यार्थी निवड करण्यात आलि.   मंथन थोरात,सपना सावरकर, सायमा बेग, अजय लांजेवार, विद्या थोरात, राजश्री साळविकर, सृस्टि तिवारी,  यापैकि पात्रतेनुसार वर्ग प्रतिनिधि, रायसो प्रतिनिधि, सांस्कृतिक प्रतिनिधि, यामधुन निवड करण्यात होती, यापैकी  छात्रसंघ सचिवपदी
चि. मंथन वासुदेव थोरात ह्याची बिनविरोध निवड  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उद्धव जाने सर यांच्या देखरेखी खाली  निवडणुक प्रक्रिया पार पाडली, व इतर सहकारी प्राचार्य डॉ.विजय खराते सर प्रा.चव्हाण प्रा.थोरात सर  सर डॉ.दिनेश तट्टे सर डॉ.शरद उमाटे सर  डॉ. वाठोरे सर, डॉ. गजानन हिवराळे सर,   डॉ. बजाज मँडम, यांची प्रमुख उपस्थिति होती.
याप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ. उद्धव जाने यांनी विद्यापीठ कायदा व छात्रसंघ सचिवाच्या कार्याची ओळख करून दिली. चि. मंथन थोरात. ह्याचे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विध्यार्थीनी कौतुक केले आहे.

विशाल ठाकरे. 8975734338

सम्राट टाइम. कामरगाव प्रतिनिधि.

सोमवार, २२ जानेवारी, २०१८

अल्पसंख्यांक बहुल शैक्षणिक संस्था पायाभूत



सुविधासाठी अनुदानाकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २२ : अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०१७-१८ या वर्षासाठी इच्छुक शाळांकडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात सादर करावेत, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

प्रस्तावासोबत स्वयंसाक्षांकित प्रतिज्ञापत्र, सदस्यांची यादी, शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा अपंग शाळेचा डीआयइएस, इन्स्टिट्यूट, लायसन्स कोड, पटसंख्येचा दाखला, आगाऊ पावती, ट्रस्ट डीड सत्यप्रत, धर्मदाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची, फेरफार अहवाल प्रत, नोंदणी प्रमाणपत्र प्रत (नोंदणी क्रमांक व वर्ष नमूद करावे), शाळेला शासनाने प्रदान केलेल्या मान्यतेची प्रत, पी. आर. कार्ड किंवा गाव नमुना सातबारा उतारा किंवा भाडेपावती, वार्षिक अहवाल (लगतच्या मागील चार पैकी तीन वर्षाचे), दरपत्रकाची प्रत, अंदाजपत्रक (बांधकामाकरिता मागणी केली असल्यास), इमारतीचे छायाचित्र, मागणीची एकूण रक्कम व सुविधेचे स्वरूप, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याबाबतचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी दिलेला निधी कोणकोणत्या सुविधांसाठी देण्यात आलेला आहे त्याचा वर्षनिहाय तपशील, यापूर्वी निधी दिला असल्यास त्याची वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्रे, शाळा स्वयं अर्थ सहाय्यित नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.

सम्राट टाइम्स मीडिया

बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे


👉 मनुवाद्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

वाशीम - बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक डॉ. आर. एस. जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देवून सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिनिधी महसूल तहसीलदार श्रीमती वाणी यांना निवेदन सादर करण्यात आले. 
    यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव रणसंग्रामातील शहीदांना सलामी देण्याच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त जमलेल्या मुलनिवासी बहुजन समाजातील लोकांवर हल्ला करण्यात आला. दरम्यान बामसेफचे राष्टीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि बामसेफच्या भारत मुक्ती मोर्चा व इतर शाखांतर्फे भिमा कोरेगाव येथील व्दिशताब्दी कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी 51 हजार कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले. परिणामत: भिमा कोरेगावात 1 जानेवारी रोजी 5 ते 6 लाखांच्यावर बहुजन समाज एकत्र झाला. ज्यामध्ये बौध्द समाजाचा सर्वांधिक भरणा होता. त्यांच्यावर भिडे, एकबोटे व दवे यांनी चिथावणी देवून सवर्ण समाजातील तरुणांची माथी भडकवली व मोठमोठ्या इमारतीवरून दगडांचा वर्षाव केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. तर एकजण ठार झाला. बरेच जण जखमी झाले. त्याच्या निषेधार्थात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात धरणे आंदोलन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून महामहिम राष्टपती भारत सरकार यांना देण्यासाठी करण्यात आले. भिमा कोरेगाव येथील दंगलीत मिलींद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे व आनंद दवे यांच्यावर अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून सुध्दा त्यांना पोलीसांव्दारा अटक न करता उलट संरक्षण देणे हे न्यायप्रक्रियेला न जुमानण्याचे धोरण आहे. त्यामुळे त्वरीत अटक करावी. त्याबरोबरच शांततापुर्वक संवैधानिक पध्दतीने निषेधार्थ बंद पाळणार्‍या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आणि नक्षल्यांच्या नायनाटासाठी राबविण्यात येणार्‍या कोम्बींग ऑपेरशनच्या व्दारे पोलीस व राज्य शासनाच्या मार्फत निरपराध तरुणांवर अटक सत्र चालविणे, बहुजन समाजातील बौध्द व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून विवाद उभे करणे, दंगलीतील बळी ठरलेल्या जखमी झालेल्या वाहनांचे नुकसान झालेल्या तक्रारदारांच्या पोलीसांकडे एफआयआर नोंदवून न घेणे सोबतच दंगा करणार्‍यांना पोलीस व राज्य शासनाव्दारा संरक्षण देवून जातीय वैमनस्य निर्माण करणे, तथा दंगलखोरांना संरक्षण देण्याच्या निषेधार्थ राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्टलपतींना निवेदन सादर करण्यात आले.
    यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक डॉ. आर. एस. जाधव, नफ अध्यक्ष मिलींद सुर्वे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी अनुक्रमे पे्रमानंद अरखराव व मंगल इंगोले तसेच इतर शेकडो आंदोलनकर्त्यांना आंदोलन मंडपात निषेध व्यक्त करून प्रमुख वक्त्यांनी यासदंर्भात आपले मनोगते व्यक्त केली. या धोरणाला ग्रामस्थ व वाशिमकरांनी रजिष्टरवर स्वाक्षर्‍या करून आपला पाठिंबा दर्शविला.

सम्राट टाइम्स मीडिया

मंगळवारी शहरात भव्य मोफत आयुर्वेदीक रोगनिदान शिबीर


औषधीचे मोफत वितरण : लाभ घेण्याचे आवाहन
वाशीम - अथर्व आयुर्वेद, जय माता दी बहूउद्देशिय संस्था व विदर्भ अर्बन अ‍ॅन्ड रुरल को-ऑप. क्रेडीट सोसायटी  यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हावासीयांसाठी शहरात मंगळवार, 23 जानेवारी रोजी भव्य मोफत आयुर्वेदीक रोगनिदान  व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पुसद नाका येथील तुर्के संकुलातील अथर्व आयुर्वेद मध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार्‍या या शिबीरात रुग्णांची मोफत रोगनिदान तपासणी करुन रुग्णांना गोळ्या व कॅप्सुल मोफत देण्यात येतील. शिबीरामध्ये आम्लपित्त, वातविकार, संधीवात, मुळव्याध, मुतखडा, दमा, अ‍ॅलर्जी, त्वचा विकार, श्वेतप्रदर, मासीक पाळीचे आजार, डोके दुखणे, डोक्याचे विकार, इतर बरेचसे जुनाट आजारावर तपासणी व औषधोपचार केले जातील. तसेच वातविकार, आम्लपित्त, दमा, मुतखडा, मुळव्याध, त्वचाविकार इतर विकारावर डॉ. बी.के. व्यास, वारंवार होणारी सर्दी, बालदमा, धुळीची अ‍ॅलर्जी, नाकाचे हाड वाढणे, मुतखडा, श्वेतप्रदर, स्तनातील गाठी, कॅन्सर, त्वचारोग, मायग्रेन इत्यादी विकारावर जयपुर येथील डॉ. प्रिती चव्हाण रुग्णांची तपासणी करतील. तसेच तेल्हारा येथील प्रसिध्द नाडीपरिक्षक वैद्य गणेश उमाळे हे रुग्णांची नाडी परिक्षण करुन सर्व जुनाट रोगांवर आयुर्वेदीक उपचार करतील. तरी जिल्हयातील गरजु व व्याधीग्रस्त रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अथर्व आयुर्वेदच्या वतीने करण्यात आले आहे.
सम्राट टाइम्स मीडिया

मराठा वधु-वर परिचय मेळाव्यातून सामाजिक जिव्हाळा निर्माण होण्यास मदत-मा.आ.विजय जाधव


२२ जानेवारी

वाशिम : बहुसंख्येने असलेला मराठा समाज बांधव सगळीकडे विखुरला गेला. त्यामुळे समाजाचे गरीब श्रीमंत असे दोन भाग होत आहेत. परंतु सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम राखण्यासाठी वर वधु परिचय मेळावा हे मोठे माध्यम आहे. असे प्रतिपादन माजी आ.विजयराव जाधव यांनी मराठा वरवधु परिचय पालक मेळाव्यामध्ये बोलतांना केले.

स्थानिक वाटाणे लॉन मंगलकार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी पुढे बोलतांना अ‍ॅड. विजयराव जाधव म्हणाले की, मराठा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाज बांधवांनी आपसातील मतभेद विसरून राजकारण विरहित असा प्लॉटफार्म निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मराठा वरवधु परिचय मेळाव्यामध्ये ज्या तरूण तरूणींनी आपआपले मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतातून मराठा समाजातील जुन्या चालीरुढी बदलतांनाच समाज हा शिक्षण आणि उद्योगामध्ये पुढे कसा जाईल या दृष्टीने सांगोपांग विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, मराठा समाजात गरीब श्रीमंत विंâवा छोटा मोठा असा भेदभाव समुळ नष्ट झाला पाहिजे यासाठी समाजधुरीणांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवून एकोपा साधणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले,  

मराठा समाजातील वरवधु या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने हजर झाले होते. या वेळी ६८ उपवर वरवधुंनी आपआपले मनोगत व्यक्त करतांना समाजातील हुंडा प्रथेला थांबविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. वधुवर परिचय पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. उपस्थित पालकांपैकी, चार पालकांनी वधुवर परिचय मेळाव्यातून समाजाला एकत्रित येण्याची संधी मिळाली असल्याने भविष्यातही समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे सांगीतले. 

आ.अमित झनक यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, वाशिम जिल्हयाच्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी समाजातील उपवर वरवधुंचे  सोयरीक जुळविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनिय असून अशा मेळाव्यातूनच सामाजिक जनजागृती  निर्माण होत असल्याने असे मेळावे ही काळाजी गरज आहे. असे ते म्हणाले. यावेळी माजी आ.किसनराव गवळी, बाळासाहेब खरात, पांडूरंग ठाकरे, अ‍ॅड. एस. के. उंडाळ, श्रीमती शांताबाई शिंदे आदिंनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मराठा समाजातील युवक युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुप्रसिध्द उद्योगजक अविनाश जोगदंड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित तरुण- तरुणींनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्यांना अशा कार्यक्रमातून उद्योगाविषयी रोजगार मिळविण्यासाठी एक मोठी संधी अविनाश जोगदंड यांनी प्राप्त करून दिल्याचे सांगितले. 

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत महाकाळ, बाळासाहेब खरात, माधवराव अंभोेरे, महादेवराव काकडे, भाऊसाहेब काळे, अविनाश जोगदंड, मारोतराव लादे, सहदेवराव शिंदे, स्वच्छता दुत सौ.संगीता अव्हाळे, डॉ.अनिल कावरखे, डॉ.दीपक शेळके, विजय काळे, माणिकराव जोगदंड, प्रा.नंदकिशोर मवाळ, नारायणराव बारड,  भगवानराव बोरकर, विठठलराव आरु, दत्ताभाऊ लोणसुने, डॉ.मदन नरवाडे, डॉ.अशोक इंगोले, डॉ.अशोकराव करसडे, रावसाहेब राहणे, राजेश दहातोंडे आदिंची उपस्थिती होती. या प्रसंगी गायकवाड आणि काटे परिवारातील उच्च विद्याविभूषीत मुलामुलींचा विवाह सर्वांच्या साक्षींने साध्या पध्दतीने संपन्न झाला. मेळाव्याचे प्रास्ताविक माधवराव अंभोरे यांनी तर संचालन प्रा.प्रभाकर भालेराव यांनी केले. यावेळी दोन हजारावर समाज बंधुभगिंनींची उपस्थिती होती.  

  सम्राट टाइम्स  मीडिया

शेतकरी कर्जमाफी चुकीच्या धोरणा विरोधात युवा शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन



👉 पोलिसांसह अधिकाऱ्यांची तारांबळ

👉अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी केली मध्यस्थी

 सम्राट टाइम्स मीडिया

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ कोळगाव येथील युवा शेतकऱ्याने आज दुपारी 1 वाजता अचानक  जिल्हापरिषद परिसरातील उंच टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडल्याने अधिकाऱ्यासह पोलिसांची तारांबळ उडाली .अखेर अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले .
मालेगाव तालुक्यातील कोळगाव बुजरूक येथील युवा शेतकरी विजय पंडितराव शेंडगे यांनी 15 जानेवारीला  मालेगाव तहसीलदारा ला निवेदन दिले होते . निवेदनात शासनाने कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय केल्याचा आरोप केला.  शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखा पर्यंत कर्ज माफी दयावी अशी मागणी केली .शेतीमाला हमी भाव नाही शेतकऱ्यानी जगावे तरी  कसे असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनातून केला  . युवा शेतकरी शेंडगे यांनी मुख्यमंत्र्याना निवेदनातून इच्छा मरणाची परवानगी मागितली अन्यथा कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्त्या केल्यास शासन त्याला जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला होता त्याअनुषंगाने शेंडगे यांनी आज शोले स्टाईल आंदोलन छेडले सतत 4 तास आंदोलन सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी , महसूल अधिकारी पोलीस विभागासह अग्नी शामक दल घटनास्थळी पोहचले जिल्हापरिषद परिसरात बघ्यांची एकच गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले अखेर 3 तासानंतर अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले 

सम्राट टाइम्स मीडिया