सम्राट टाइम्स लाईव्ह
औरंगाबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मसोला फाट्यावर ट्रक क्रमांक एम एच 20 इ जि - 9241 ने हनुमान मंदिराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मंदिर जमीनदोस्त झाल्याची घटना आज पहाटे 5 :30 वाजताच्या सुमारास घडली
औरंगाबाद कडुन कांद्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने कारंजा कडे जात असताना तर्हाळा जवळच्या मसोला फाट्यावर असलेल्या हनुमान मंदिराला धडकला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुने मंदिर जमीनदोस्त झाले . आज शनिवार हनुमानाचा दिवस असल्याने भाविक भक्तांच्या च्या भावना दुखाविल्या गेल्या .भाविक भक्त गोळा झाले होते व ट्रक मालकानी नवीन हनुमान मंदिर उभारून द्यावे अशी मागणी ऊपस्थीत हनुमान भक्तांनी केली आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा