रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

जि.प. लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांचे ग्रेड पे वाढणार


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या 17 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात ग्रामविकास विभागाच्या आयोजीत सभेत जि.प. लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या ग्रेड पे दुरुस्ती व वाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सभेला ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री रिंगणे यांची अध्यक्षता लाभली. तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य सचिव बापुसाहेब कुलकर्णी, संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष दाभाडकर, राज्य सचिव अरुण जोर्वेकर, उमाकांत सुर्यवंशी, सचिन मगर, सागर बाबर, शेखर गायकवाड आदींची उपस्थिती होती. या सभेत जि.प. लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगामध्ये असलेली वेतन त्रुटी संबंधीत अभ्यास अहवालावर चर्चा करण्यात आली. सभेमध्ये लिपीक शिरोमणी तथा मुख्य सचिव बापुसाहेब कुलकर्णी, संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष दाभाडकर यांनी समकक्ष पदाबाबत लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या ग्रेड वेतनामध्ये कशा रितीने अन्याय झाला व ग्रेड पे वाढविणे का गरजेचे आहे हे प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले.
    कर्मचार्‍यांचे ग्रेड पे वाढविण्यासंदर्भात संघटनेने राज्यभरात कामबंद आंदोलन केले होते. व यासाठी बापुसाहेब कुलकर्णी यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेवून ग्रेड पे वाढविण्यासंदर्भात समिती नेमली होती अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश भारती यांनी दिली. ग्रेड पे दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव पुणे येथे संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, उमाकांत सुर्यवंशी, सचिन मगर, सागर बाबर, शेखर गायकवाड यांनी मेहनतीने तयार केला असून त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानुन हा लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचा विजय असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश भारती यांनी कळविले आहे. मंत्रालयात झालेल्या सभेत कर्मचार्‍यांच्या वेतनावर सकारात्मक चर्चा होवून सदर प्रस्तावावर विचार करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे उपसचिवांनी सांगीतले. संघटनेच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना र.नं. 615 चे जिल्हाध्यक्ष राजेश भारती, सचिव जयंत देव, कार्याध्यक्ष योगेश वाळले, मुकुंद नायक, सुनिल मोरकर, मोहन रिठे, सतिश बाहेकर, संतोष राठोड, राधेशाम वायभासे, रमेश अंभोरे, बाबाराव हिवराळे, बाबाराव घुगे, सविता मोरे, गणेश झाटे आदींनी अभिनंदन केले आहे.

सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा