रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत विविध पदाधिकार्‍यांची निवड


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : लहुजी शक्ती सेनेची बैठक शनिवार, 18 नोव्हेंबर रोजी पंचशिलनगर येथे घेण्यात आली. बैठकीला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कैलास थोरात, जिल्हा उपाध्यक्ष मोहनराज दुतोंडे, युवा उपाध्यक्ष रामदास आव्हाडे, शहर अध्यक्ष दिपक साठे, शहर युवा अध्यक्ष शिवाजी इंगळे, उपाध्यक्ष केशव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी वस्ताद लहुजी साळवे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मातंग समाजाचा विकास व संघटना बळकटीकरण आवश्यक असून समाजहितासाठी कार्य करण्यासोबतच वरिष्ठांच्या आदेशाने लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय द्यावा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा कार्यकारणीमध्ये विविध पदाधिकार्‍यांची निवड करुन त्यांना जिल्हाध्यक्ष कैलास थोरात यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामध्ये, जिल्हा सचिवपदी शंकर खंदारे, युवा शहर संघटकपदी लक्ष्मण कांबळे, युवा महिला अध्यक्षपदी शोभाताई नावकार, महिला जिल्हाध्यक्षपदी सुमनताई गायकवाड, जिल्हा संघटकपदी प्रल्हाद लगड, टो शाखा अध्यक्षपदी सचिन बांगर व शहर उपाध्यक्षपदी विलास रणशिंगे आदींची नियुक्ती करण्यात आली. उपस्थितांचे आभार शिवाजी इंगळे यांनी मानले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा