सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

मालेगांवचे गटविकास अधिकारी ACB च्या जाळ्यात




विनोद तायडे वाशिम

          मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव  महागावकर वय 52 वर्ष  यांना 1000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी   लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली .
तक्रारदाराचे वडील भाऊराव यादव कांबळे यांच्या नावाने रामनगर शिवारात 1.90 आर शेती आहे भाऊराव कांबळे यांच्या नावाने डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबन अंतर्गत विहीर मंजूर झाली. त्यांनी विहिरीचे खोदकाम केले. त्यांचा 71 हजार रुपयांचा पहिला हप्ता  बँक खात्यात जमा करण्यासाठी कांबळे यांना  मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय महागावकर यांनी  1000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार कांबळे यांनी 13 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली 14 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता गटविकास अधिकारी संजय महागावकर यांनी 1000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महागावकर यांना आज अटक करून गुन्ह्याची नोंद केली सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुनीता नाशिकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक ए जी रुईकर, यांच्या पथकाने केली

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा