सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

वनोजा आणि माळशेलु गावातील 31 लोटाबहाद्दर ताब्यात



विनोद तायडे वाशिम


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सलग चवथ्या दिवशी जिल्हा
परिषद आणि पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने धडक देऊन सार्वजनिक जागी
शौच करणाज्यांना सळो कि पळो करुन सोडले आहे. आज (दि 25) रोजी तालुक्यातील
वनोजा आणि माळशेलु गावातील तब्बल 31 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर
मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई केली. सकाळी दोन तासात 11 लोकांकडुन 13
हजार दोनशे रुपये ऑन दि स्पॉट दंड वसुल करण्यात आला आणि उर्वरीत 20
लोकांना शेलु बाजार येथील पोलीस चौकीत आणण्यात आले होते. या पथकामध्ये
जिल्हा परिषदच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
सुदाम ईस्कापे, जिल्हा समन्वयक राजु सरतापे, जिल्हा माहिती व संवाद
सल्लागार राम श्रंृगारे, रवि पडघान, विस्तार अधिकारी पद्मने, ग्रामविकास
अधिकारी रविंद्र वाढणकर, गांजरे, ज्ञानेश्वर महल्ले, अभिजित गावंडे, रवि
राठोड, चव्हान, राजु ठाकरे आदिंचा सहभाग होता.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा