सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

उस्मानाबाद येथील उप प्रादेशिक परिवहन आधिकारी विलास कांबळे यांचे निलंबन न झाल्यास उपोषण करणार -खलील सय्यद





कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केल्याचा खलील सय्यद यांचा आरोप 

संवादाता/ कोंड

उस्मानाबाद येथील काँग्रेस आयचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सय्यद यांनी आज २५ सप्टेंबर रोजी (सोमवारी ) उस्मानाबाद येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांचे २३ आक्टोंबर पर्यंत निलंबन न झाल्यावर २३ आक्टोंबर  पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी उस्मानाबाद येथील उप प्रादेशीक परिवहन अधीकारी विलास कांबळे यांच्या तक्रारी खलील सय्यद यांनी संबधीत कार्यालयात  लेखी दिल्या होत्या. कांबळे यांच्या तक्रारी करुनही त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्यामुळे सय्यद यांनी संबंधित विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. या आधी सय्यद यांनी ३१ मे,  ६ जुलै, ७ जुलै ,२४ जुलै  या तारखेला परिवहन आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत व्यवसाय परावाने नुतणीकरण करताना नोंदणी संपल्याचा व नुतनिकरणाच्या कालावधीत विक्री केलेल्या पुर्ण वाहनावर तडजोड शुल्क न आकारता मोजक्याच वाहनावर दंड आकारून बाकीची वाहने विनादंड नोंदणी करणे, कार्यालयात गैरहजर राहणे ,वाहन जप्त करुन कर भरलेल्या वाहन मालकाला मानसीक व अर्थिक त्रास देणे, कार्यालयास कामासाठी गेलेल्या लोकप्रतिनींचा अपमान करणे, कार्यालयातील कामे दलालामार्फत करणे आदींचा उल्लेख लेखी तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

 या प्रकारामुळे शाससनाचा कोट्यावधी रुपयाचा कर बुडवून व्यवसाय धारकाशी संगनमत करुन रकमेचा अपहार केल्याचेही नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निपक्ष, सखोल चौकशी करुन कांबळे यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.


अद्यापपर्यंत कांबळे यांच्यावर कार्यवाही होत नाही, कांबळे यांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा उपोषणाची जबाबदारी ही संबधीत कार्यालयावर राहील असे खलील सय्यद यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा