कोंड तालुका उस्मानाबाद येथील यावर्षी ची ग्रामपंचात ची पंचवार्षिक निवडणुकिची तगडी फिल्डिंग सुरु आहे सरपंचाची निवड हि जनतेतून होणार आसल्यामुळे एस टि महिलेला आरक्षण सुटले आहे त्यामुळे सेना भाजप काँग्रेसकडून सौ कविता शिवाजी सर्जे तर राष्ट्रवादी कडून सौ पार्वती उर्फ लक्ष्मी चंद्रशेन सर्जे यांनी सरपंच पदासाठी एकमेकासमोर दंड थोपटले आहेत यापूर्वी कविता सर्जे या बिनविरोध निघणार असल्याची चर्चा होती परंतू राष्ट्रवादी ने उमेदवार जाहीर केल्यामुळे आता सरपंच पदासाठी उमेदरांची चांगलीच दमछाक होणार आसल्याचे चित्र दिसत आहे
गावचा कारभार हाकण्यासाठी सौ यांना बहुमान मिळणार आहे त्यामुळे भावी सरपंच कोण होणार याकडे लक्ष वेधून घेतले आहे सध्या उमेदवाराचे कागदपत्र काढण्यासाठी धावपळ सुरू आहे उमेदवार कायम व्हावे यासाठी दिग्गजांच्या घशाला कोरड पडत आहे तर काही जागेवर उमेदवार मिळत नसल्याचीही चर्चा सुरु आहे त्यामुळे या रणधुमाळीत दिग्गजांंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तर उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी पण प्रयत्न सुरु आसल्याची गुणगूण सुरू आहे पण मतदार नेमक जादुची कांडी कोणावर फिरवणार याकडे वरिष्ठांचे लक्ष लागले आहे
(भाग १)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा