बुधवार, ३ जानेवारी, २०१८

शेलुबाजार येथे बंद ला हिंसक वळण,बौध्द युवकाला जातीयवाद्याकडून मारहाण






मंगरुळपीर येथे कडकडीत बंद

शेलुबाजार येथे बंद ला हिंसक वळण,बौध्द युवकाला जातीयवाद्याकडून मारहाण

भिमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगरुळपीरमध्येही पडसाद

मंगरुळपीर-भिमा कोरेगाव येथे दि.१जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भारिप बहूजन महासंघाच्या वतीने मंगरुळपीरला कडकडीत बंद पाळन्यात आला आहे.
              दरवर्षी भिमा कोरेगावला शौर्यदिन साजरा करन्यात येतो.यंदा दि.१ जानेवारी रोजी तेथे आलेल्या शांतताप्रिय व निशस्ञ भिम अनूयायावर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड करन्यात आली.हा भ्याड हल्ला संघप्रणीत जातीयवादी लोकांकडुन करन्यात आला त्यामुळे भारिप बहूजन महासंघाकडुन या घटनेचा तिव्र निषेध करन्यात आला आणी दि.३रोजी महाराष्ट बंदची हाक देन्यात आली.
भ्याड हल्ल्यातील दोषी व सहभागींवर रासुका अंतर्गत गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करावी व अशा घटना जर शासनाने रोखल्या नाहीत तर भारीप बहूजन महासंघाकडून तिव्र आंदोलन छेडन्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.भिमा कोरेगावच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद मध्ये मंगरुळपीर येथे हा बंद शत प्रतिशत पुकारन्यात आला असुन शेलुबाजार येथे या घटनेचे तिव्र पडसाद ऊमटुन हिंसक वळणही लागले.शेलुबाजार येथे बौध्द युवकांना काही समाजकंटकाकडुन मारहान झाल्याचा प्रकार घडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता तर मारहाण करणारांवर गुन्हे नोंदवून अटक करा या मागणीसाठी बौध्द युवक मंगरुळपीर पोलिस स्टेशनवर जमले होते.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा