बुधवार, ३ जानेवारी, २०१८

वाशिम मध्ये वाहनांची तोडफोड रस्ता रोको सह कडकडीत बंद यशस्वी



वाशिम मध्ये वाहनांची तोडफोड
रस्ता रोको सह कडकडीत बंद यशस्वी

भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम मध्ये काळ रात्री वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात करण्यात आली. तोडफोड प्रकरणी पोलिसांनी धरपकड करत काही युवकांना अटक केली .भारिप बहुजन महासंघाचे सुप्रीमो  बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली . आंबेडकर चळवळीतील  हजारो महिलेसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले .वाशिम पोलीस स्टेशन चौकात आज सकाळपासून रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले तर दुसरीकडे कडकडीत बंद पाळण्यात आला .यावेळी पोलिसानी  निरपराध युवकाना तोडफोड प्रकरणी अटक केल्याचा आरोप  करण्यात आला. युवकाची त्वरित सुटका करा  अशी मागणी करत कार्यकर्ते  आक्रमक झाले.  पोलीस अधीक्षक आल्याशिवाययांना  आंदोलन मागे न घेण्याचा कार्यकर्त्यांनी पावित्रा घेतला . पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आक्रमक जमावाला सामोरा गेल्या. पोलीस अधीक्षक यांनी कार्यकर्त्याना शांत करत सहकार्य करण्याचे आवाहन केले .कायदा हातात घ्याल तर पोलिसांना कायदेशीर कार्यवाही करावी लागेल तेव्हा रस्ता रोको  आंदोलन मागे घेण्यात आले .बंद दरम्यान सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत  वाहतूक ठप्प झाली. वाहणाच्या मोठ्या रांगा लागल्या. कडकडीत बंद असल्याने जनतेची प्रचंड गैरसोय झाली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ,भीम टायगर  सेना पिरिपा, आरपीआय जिल्हा  नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले .कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसानी शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे 
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा