बुधवार, ३ जानेवारी, २०१८

भिमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचे धरणे आंदोलन


जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : दोषींवर कठोर कारवाईची मागणी
वाशीम - भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करुन या हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष अविनाश वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून या दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
    निवेदनाचा आशय असा की, भिमा कोरेगाव येथे क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी समाज एकत्रित झाला होता. या समाजावर जातीयवादी गुंडांनी तुफान दगडफेक करीत एकत्रित झालेल्या बेसावध समुदायावर हल्ला केला. त्या ठिकाणी उपस्थित असलेला लाखोंचा समुदाय शांततेच्या मार्गाने अभिवादन करीत होता. परंतु जातीयवादी मानसिकता असणार्‍या लोकांच्या नजरेला हे खुपले नाही. त्याठिकाणी असलेल्या वाहनांची जाळपोळ दंगेखोरांनी घडवून आणली. आंबेडकरी समाजाच्या एका तरुणाचा या हल्ल्यात मृत्यु झाला. बहुजन समाज पाटीृच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. सदर जातीयवादी गुंडांचा हल्ला हा पुर्वनियोजीत कटाचा भाग असल्याचे नाकारता येत नाही. हल्लेखोरांना ताबडतोब पकडून सरकारने त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच या हल्ल्याचा कट रचणार्‍या हिंदु जागरण समिती तसेच त्यांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी. तसेच या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सदर निवेदनाव्दारे बहूजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक आदींना पाठविण्यात आल्या.
    सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरु झालेल्या या धरणे आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी निळे ध्वज घेवून भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या धरणे आंदोलनात बसपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश  वानखेडे, उपाध्यक्ष राहुलदेव मनवर, देवानंद मोरे, महासचिव संजय गायकवाड, कोषाध्यक्ष संतोष वाठोरे, प्रकाश आठवले, भाऊराव वासनिक, बाळु खडसे, मंगेश तिडके, उषा बेलखेडे, रुस्तुम पंडीत, रितेश इंगळे, अमोल गायकवाड, पंजाब कांबळे, आशुतोष भगत, विशाल वाघमारे, मंगेश कंकाळ, विशाल पंडीत, विनोद अंभोेरे, विनोद तायडे, संतोष वाठोरे, कार्तीक इंगळे, धनंजय मनवर, विजय सावळे, दिलीप भालेराव, भिमरत्न वानखडे, बंडु अंभोरे, कमल इंगळे, आकाश इंगळे, शिला सावळे, कमलाबाई सावळे, सविता सावळे, प्रयागबाई सावळे, बबन सावळे, शकुंतला गवई, योगीराज अंभोरे, सुमित सावळे यांच्यासह शेकडोंच्या संख्येने आंबेडकरी समाजबांधव सहभागी झाले होते.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा