बुधवार, ३ जानेवारी, २०१८

*भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ केशवनगर येथे रस्ता रोको आंदोलन*


भीमा कोरेगाव येथे भीमसैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिसोड-मालेगांव मार्गावर केशवनगर येथे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते राजकुमार अंभोरे,दिलीप भालेराव,रामा वानखेडे यांच्या नेतृत्वात आज दि.3 जानेवारी सकाळी 12:00 वाजतापासून ते 12:45 पर्यंत रोडवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली.रिसोड -मालेगांव मार्गावर केशवनगर या ठिकाणी,वाघी खुर्द,दापुरी खुर्द,चिचाम्बा पेन,मसला,येवता येथील आंबेडकरी महिला, पुरुष मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले याप्रसंगी रस्ता रोको करत कार्यकर्त्यानी सरकार विरोधात ओरड घोषणाबाजी केली. हल्लेखोरांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.या आन्दोलनामध्ये प्रकाश   भालेराव यांच्या समवेत मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता होती.तसेच बसपा कार्यकर्ते नितिन डोंगरदिवे,नितिन खंडारे,डॉ.अंभोरे,देवीकीनंद अंभोरे,रवि वाघमारे,सुरज मोरे, रामा वानखडे, शंकर मोरे, उमेश कांबळे, रामू मोरे यांच्यासह शेकडोच्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव सहभागी झाला होता.यावेळी शिरपुर पोलिस स्टेशनचे पोलीस जमादार दामोधर ईप्पर,पोलीस कर्मचारी जोगदंड साहेब,कोकाटे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
सिद्धार्थ भालेराव
9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा