बुधवार, ३ जानेवारी, २०१८

गुड माॅर्निंग पथकाशी हूज्जत घालणारांवर गुन्हा दाखल



शेलुबाजार पोलिस चौकीत गुन्हा दाखल

मंगरुळपीर- स्वच्छ भारत मिशनने पुन्हा एकदा गती पकडली असुन गावागावात सकाळीच गुड माॅर्नींग पथक धडकत आहे पण या पथकाशी काही जन हुज्जत घालत आहेत.दि.४ जानेवारी रोजी मंगरुळपीर तालुक्यातील गोग्री, हिरंगी, लाठी, शेलु आणि चिखली येथे गुड माॅर्निंग पथकामार्फत कारवाई करण्यात आली. गोग्री येथील महादेव काशिराम शिंदे या युवकावर गुन्हा दाखल करन्यात आला आहे.ऊघड्यावर शौचास गेल्यामुळे सरपंच गणेश मोतीराम बोथे यांनी केला गुन्हा दाखल.सदर युवकाने पथकासोबत  हुज्जत घातली होती. गोग्री येथील महादेव काशिराम शिंदे या युवकावर शेलु बाजार पोलीस चौकीत चौकी इंचार्ज गजानन जवादे यांनी केला गुन्हा दाखल.
 मंगरुळपीर पं. स. चे गट विकास अधिकारी एन टी खेरे, जि. प. वाशिम स्वच्छ भारत मिशनचे राम श्रृंगारे यांच्या नेतृत्वात आज सकाळी ५.३० वाजता पथक गोग्रीत दाखल झाले होते.
 पथकामध्ये विस्तार अधिकारी भिकाजी पद्मने, वंजारे, पंडीत राठोड, बीआर सी ज्ञानेश्वर महाले, अभिजित  गावंडे, ग्रामसेवक सुनिल सुर्वे, ठोंबरे, वाशिम येथील होमगार्ड अनिता सहस्रबुध्दे, नरेंद्र बगळे यांचा सहभाग होता.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा