बुधवार, ३ जानेवारी, २०१८

मंगरूळपीर येथील महिलांचा एल्गार



भिमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याचा केला निषेध

मंगरुळपीर-भिमा कोरेगाव येथे शौर्य दिन दि.१ जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात मंगरुळपीर येथील महिलांनी एल्गार पुकारला असुन नॅशनल अॅट्रासिटी प्रीविशल फोर्स(नफ)कडुन ठानेदार यांना मागन्याचे निवेदन दिले आहे.
              बहूजन समाजातील बांधव शौर्यदिनानिमित्त भिमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करन्यासाठी जात असतात.यावर्षी २०० वर्ष शौर्य दिनाला झाले होते.पण समाजकंटकांनी गाडी अडवून गाडीची तोडफोड केली महामानवाच्या विरुध्द अर्वाच्च बोलून पुढे जाल तर जीवे मारु अशी धमकी देवून जातीवाचक शिविगाळ केली अशी तक्रार मंगरुळपीर येथील साधना सुर्वे यांनी पो.स्टे.मध्ये दिली.हल्ला करणार्‍या समाजकंटकांना त्वरीत अटक करुन अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत व अनू.जातींच्या लोकांच्या विरोधात सामुहिक बहिष्कार करणारांना म्हणजेच मनोहर ऊर्फ संभाजी भिडे,मिलिंद एकबोटे,आनंद दवे यांच्या माध्यमातुन दंगा करणे,जातीय तेढ निर्माण करणे,अनू.जातीच्या लोकांच्या विरोधात सामूहिक बहिष्कार करणे या कारणास्तव दोषीवर योग्य कारवाई करावी या मागणीची लेखी तक्रार नॅशनल अॅट्रासिटी प्रिविशल फोर्स (नफ) च्या साधना मदन सुर्वे यांनी मंगरुळपीर पो.स्टे.ला दिली आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा