उकळी पेन :- येथे सय्यद.मेहबुब सुभानी यांची दरगाह असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संदल उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सदर उत्सवात सर्व धर्मियांचा सहभाग असतो.येथे मुस्लिम वस्ती कमी असून सुद्धा संदल उत्सवात सर्वधर्मिय लोक सहभाग घेऊन गावात सर्वधर्मसमभावाने राहून भारतीय संविधानातिल धर्मनिरपेक्ष या तत्वाचा अवलंब करतात.
वरील कारणाने उकळी पेन गाव एक आदर्श व राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून वाशिम जिल्हयात नावारूपास आलेले आहे.
सदर संदल उत्सवास ऑल इंडिया समता सैनिक दल जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ इंगोले ,प्रा. संदीप भगत , प्रा. विनोद जमधाडे , समाजसेवक जीवन मह्हले , माजी सरपंच कालीदास भोयनवाड , ज्ञानदेव जैताडे , प्राचार्य संजय पेशकलवाड , कैलास धवसे , मदन मधुरवाड , सुरेश राजगुरू , कैलास कूटे ,सीताराम कूटे, आदि मान्यवरानी भेटी दिल्या.
या संदल उत्सवात शेकडो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी सै.अन्वर , सलीम शेख , सै. अकिल, सै. माजीद , शेख आलिम , शेख आस्लम , शेख शाहरूख , शेख इम्रान , शेख अन्सार , शेख सादीक , सै.असद , अंसार हुसैन , शेख राजू , शेख शेरु , सै. अमजद , शेख सलमान , शेख फिरोज , शेख रहीम आदिंनी प्रयत्न केले.
सम्राट टाईम्स
सुरेश इंगोले
8830966982
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा