बुधवार, ३ जानेवारी, २०१८

मालेगावात कडकडीत बंद यशस्वी



भीमा कोरेगाव हल्ल्याच्या  निषेधार्थ महाराष्ट्राने पेट  घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर मालेगावात सर्वपक्षीय आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मालेगावात कडकडीत बंद यशस्वी केला .
भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर जातीयवाद्यानी भ्याड हल्ला केला .वाहनांची जाळपोळ केली .दंगली पेटविली .त्यात एक तरुणांचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्र पेटला .भारिप बहुजन महासंघाचे सुप्रीमो अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली. त्यांच्या हाकेला ओ देत भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पाडला .मालेगावात भारिप बहुजन महासंघ ,भीम आर्मी आणि सर्व आंबेडकरी गटातटाने बंद पुकारला.सकाळपासूनच मालेगावात शुकशुकाट पसरला.
सर्व दुकाने ,प्रतिष्ठान , भाजी  मार्केट ,मटण मार्केट, वाहने ,शाळा, कॉलेज ,बद ठेवण्यात आली . कडकडीत बंद ठेवल्याने जनतेची प्रचंड गैरसोय झाली भारिप बहुजन महासंघ आणि भीम आर्मीच्या वतीने तहसील समोरील डॉ बाबासाहेब आंबेडजर यांच्या तेलचित्रासमोर निषेध सभा घेण्यात आली भीमा कोरेगाव हल्ल्यातील जातीयवादयाना त्वरित अटक न केल्यास 11 जानेवारीला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला .बद  यशस्वी करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा नेते जे. एस. शिंदे, तालुका अध्यक्ष संदीप सावळे , संजय शिंदे,बाळू खंडारे , कैलास ढाले,दीपक वानखडे कैलास बनसोड, सुखदेव वानखडे,विलास गवळी ,रामदास वानखडे यांच्यासह भिम आर्मिच्या संदीप सावंत,संदीप पखाले, अनिल पखाले,चेतन इंगळे,नितीन रोकडे ,विजू पखाले, मनोज कांबळे आदी शेकडो कार्यकर्त्यां नी प्रयत्न केले  कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला .
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा