सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

अखेर 9 महिन्यानंतर महिला खून प्रकरणाचा उलगडा




पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

मैराळडोह शिवारातील घटना


महादेव हरणे 
           मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम मैराळडोह येथील प्रसिद्ध वाघामाय मंदिर परीसरात सोनाळा धरण काठावरील नाल्यात   कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना दि 15 जानेवारीला2017 रोजी  दुपारी 1 वाजता उघडकीस आली होती. प्रेताच्या उत्तरीय तपासणीत  महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. जउळका पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली .आरोपीना पकडण्याचे आव्हान पोलिसांना समोर राहले. स्थानिक  गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक मोक्षदा  पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तपास करून सुभाष तागड वय 50 वर्ष, कैलास प्रल्हाद गंगावणे वय 30 वर्ष रा देपुळ ता जि- वाशिम या दोघाना   अटक करून त्यांच्या कडून  76 हजार रुपयांचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे
परभणी जिल्ह्यातील गव्हा येथील  राईबाई त्रंबक घुगे वय 45 वर्ष हिचे देपुळ येथील सुभाष तागड याच्याशी अनैतिक संबंध होते . अनैतिक संबंधाचा गवगवा होऊ नये म्हणून सुभाष तागड याने कैलास प्रल्हाद गंगावणे याच्या  मदतीने 28 डिसेंबरला 2016 ला
जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या  मैराळडोह येथील वाघामाय परिसरात राईबाई घुगे हिचा गळा आवळून खून केला  व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेताला दगड बांधून प्रेत  सोनाळा धरणात टाकले त्यापूर्वी आरोपीने  मृतक महिलेच्या अंगावरील 76 हजाराचे सोन्याचे दागिने काढून  घेतल्याची कबुली दिली  .
सदर कार्यवाही  पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील डुकरे पाटील ,सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार साळवे, अजय वाढवे,पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण,नापोका सुनील चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल रवी घरात, राजू राठोड, बालाजी बर्वे ,रामकृष्ण नागरे,यांनी अथक परिश्रम घेऊन कौशल्याने गुन्हा उघडकीस आणला पुढील तपास जऊळका पोलीस स्टेशन चे  ठाणेदार आर जी शेख करीत आहेत

महादेव हरणेे 

9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा