सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

वसमत च्या शालेय कराटे पट्टूचे विभागीय स्पर्धे करिता निवड



रामु चव्हाण प्रतिनिधि 


वसमत : =  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,क्रीड़ा अधिकारी कार्यालय, हिंगोली व हिंगोली जिल्हा स्पोर्ट कराटे डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरिल स्पर्धा जिल्हा प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथे संपन्न झ!ली.
क्रीड़ा अधिकारी संजय बेतिवार, व उदघाटक उप विभागिय अधिकारी श्री उमाकांत पारधी , जिल्हा स्पोर्ट कराटे डो असोसिएशन चे संतोष नांगरे,गोपाल इसावे यांच्या उपस्थितित स्पर्धा पार पडली.

वसमत येथील शालेय मुला मुलीनी सहभाग होऊन यश संपादन केले.
त्यात
श्री सिधेश्वर विद्यालयांचे कु.माधुरी विवेक इंगोले 19 वर्षों अतिल 52 ते 56 किलो वजन गटा त कु.स्मिता प्रभु कस्तूरे 44 ते 48 वजनात ,कु.शितल रामचंद्र वर्मा 17 वर्ष आतिल 60 ते64 किलो वजनात 
मुले : रंजीत गंगाराम कुरुडे 17 वर्ष आतिल 40 ते45 वजनात ,अर्जुन रविकिरण गावंडे 14 वर्षा आतिल 40 ते 45 किलो वजनात प्रथम क्रमांक मिळवून विजेते पद मिलविले. तर आकांक्षा अनिल पंडित ,सागर रवि कोल्हे, श्रीकांत कैलास जाघव यांनी उपविजेते पद मिलविले.
हु.बहिर्जी स्मारक विद्यालय यातील कु.सनिका भगवान हमाने 19 वर्षा आतिल 52 ते 56 किलो वजनात , कु.शिवानी माधवराव हरणे 17 वर्षा च्या आतिल वजनात ,मुले: विशाल गोपिनाथ वाघमारे 14 वर्षा आतिल 32 किलो वजनात , आकाश बबनराव पांचाळ 35 ते 40 किलो वजनात प्रथम क्रमांक मिळवून विजेते पद पटकीविले.

महात्मा गांधी विद्यालयाची कु.रानी बालाजी अपुने 17 वर्षा आतिल 48 ते 52 किलो वजनात प्रथम
लिटल इंग्लिश स्कूलची कु.अनुष्का तुकाराम मुरुडकर 14 वर्षा आतिल 48 ते 52 किलो वजनात प्रथम क्रमांक मिळवून विजेते पद मिळवीले. 
त्यांची शालेय विभागीय स्तर स्पर्धे करिता निवड झ।ल्या बदल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार ,श्री किशोर पाठक, श्री संजय बेतिवार, संतोष फूफाटे ,मुख्यधापक, क्रीडा शिक्षक, सर्व क्रीड़ा प्रेमिनी अभिनदंन केले.यशस्विनी कराटे पट्टूना स्वयंसिद्धा प्रशिक्षिका कु. मनीषा नांगरे यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धा यशस्वी करीता सर्व प्रशिक्षक, संघटनेचे उपाध्यक्ष नरेश बेतिवार यांच्यासह गजानन ख़िलारे ,प्रवीण काम्बले,हर्षद खरे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा