रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

ऊमरी खु. ता.मानोरा येथे जागतीक शौचालय दिन साजरा

ऊमरी खु. ता.मानोरा येथे जागतीक शौचालय दिन साजरा करण्यात आला.. श्री.दयाराम आडे यांच्या नविन शौचालयाचा मा. सभापती सौ धनश्री अभय राठोड यांच्या हस्ते. फित कापुन उट्घाटन  करण्यात आले. तसेच शौचालयाच्या आकाराचा केक कापुन जागतिक शौचालय दिन साजरा करन्यात आला. 
उपस्थित गावकरी मंडळींना शौचालय बांधनेकरीता जिप वाशिम चे अांबेकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.तसेच विष्ठेवर माशी बसुन तीच माशी तुमच्या अन्नावर बसते त्यामुळे आरोग्यास हानी पोहचते याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व शौचालयाचे महत्व पटवुन दिले..
त्यात त्यांनी गाव हागणदारी मुक्त झाल्याशिवाय कोणत्याही योजना आपल्या गावात येणार नाहीत ..कोणतेही वैयक्तिक लाभ मिळणार नाहीत..तसेच ज्यांच्याकडे शौचालय नसेल त्यांना आता रेशन मिळणार नाही..कोणताही ग्रा.पं. चा दाखला मिळणार नाही... हे गावकर्यानां सांगितले.. 
मा. टाकरस साहब (ग. वि. अ.) मानोरा यांनी आपल्या भाषनात आपल्या माय मावल्यांचा अवमान आता तरी थांबवा कुठं पर्यन्त त्यांना उघड्यावर पाठवता त्यांच्यासाठी तरी शौचालय बांधा असे अवाहन केले ..

गावाचे उपसरपंच यांनी गावाच्या वतीने 1जानेवारी पर्यन्त गाव हागणदारी मुक्त करु असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमासाठी ..जि़.प वाशिम चे साने साहेब .अांबेकर साहेब. दुधाटे साहेब.  सौ.रेखा.रणवीर.सोनटक्के.(जि.प सदस्य) अभय राठोड(सा.कार्यकर्ता). मा.टाकरस साहेब(ग.वि.अ) श्री. नायसे साहेब( वि.अ.) .भगत साहेब (वि.अ.).व्यवहारे साहेब .(वि.अ)चिंतावार साहेब (वि.अ)  .सौ.रंजना बल्हाळ (सरपंच) प्रकाश राठोड(उपसरपंच ) व सर्व ग्रा.पं.सदस्य...श्री.नवघरे (तलाठी)  आरोग्यसेवक .आशा व अंगणवाडी सेविका ,सर्व शिक्षक ,कें.प्र.,व सर्व गावकरी मंडळींची उपस्थिती होती..कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.गोविंदवार सर (मु.अ) यांनी केले.....सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. एम जे राठोड (ग्रामसेवक)ग्रा.प. कर्मचारी- रामभाऊ राठोड.अशोक राठोड.विवेक पवार.संदिप राठोड यांनी अथक परीश्रम घेतले...



samrat.
               Times

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा