रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

भरारी पथकाच्या दौऱ्याची माहिती मिळताच माहूर-वाईबाजारची सर्व कृषी दुकानाचे शटर लागले



श्रीक्षेत्र माहूर : - कार्तिक बेहेरे

     जि.प.चे कृषी विकास अधिकारी पंडितराव मोरे यांच्या नेतृत्वातील कृषी विभागाचे विशेष भरारी पथक सरप्राईज भेटी देऊन कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्याच्या अनुशंगाने आज हे  पथक सारखणी येथे आल्याची माहिती कळताच  तालुक्यातील वाई बाजार व माहूर बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्रांना शटर लागल्याने  तालुक्यात कृषी विभागाच्या कारभारा बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून या मागचे गौडबंगाल काय आहे असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

              याबाबत सविस्तर असे की, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या वापराने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी सदर विषय शासनाने गांभीर्याने घेतला असून  यवतमाळ येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिल्हा विशेष भरारी पथके स्थापन करून कृषी सेवा केंद्रे तपासणी करण्याचे आदेशित केल्या वरून आज किनवट माहूर या आदिवासी प्रवण व नक्षलग्रस्त तालुक्यात सारखणी येथे दाखल झाल्याची माहिती मिळताच  त्याचे लोण ताबडतोब माहूर व वाईबाजार येथे पोहचल्याने तालुक्यातील वाई बाजार व माहूर येथील कृषी सेवा केंद्राचे शटर लागल्याने माहूर या आदिवासी प्रवण तालुक्यात सुद्धा यवतमाळ दुर्घटनेस कारणीभूत असणारी कीटकनाशके विक्री केल्या जात असल्याची शंका शेतकरी  उपस्थित करत आहेत.

              “कर नाही त्याल डर नाही” या उक्तीप्रमाणे कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद करून तूर्तास चमडी बचाव धोरण अवलंबले असले तरी या प्रकाराची तालुक्यात उलटसुलट चर्चा होत असून ही माहिती कृषी विभागातीलच एखाद्या खबऱ्याने कृषी दुकानदारांना दिली असल्याच्या शंका अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणात कृषी दुकानदार व तालुका कृषी विभागाची मिलीभगत असल्याची जोरदार चर्चा माहूर तालुक्यात होत आहे.  माहूर तालुका कृषी विभागाची अब्रू मात्र वेशीवर टांगल्या गेली हे मात्र खरे. याबाबत माहूर पं.स चे कृषी अधिकारी गजानन हुंडेकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित कृषी दुकानदारांना कारणे दखवा नोटीसा देणार असल्याचे सांगितले,

                 असे असले तरी  साप निघून गेल्यावर फरकांडीला ठोकन्याचाच प्रकार हा आहे. भरारी पथकाचे प्रमुख नांदेड जि.प. चे कृषी विकास अधिकारी पंडितराव मोरे यांचीशी संपर्क साधला असता भरारी पथकाच्या चाहुलीने दुकानांचे शटर लावणाऱ्या दुकानदारांना   नोटीस देऊन सखोल चौकशी करून दोषींचे परवाने रद्द  करणार आसल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत विखे पाटील कृषी परिषदेचे संघटक अविनाश टनमने  व माहूर तालुकाध्यक्ष शिवशंकर थोटे यांनी हा प्रकार म्हणजे शासन,प्रशासनाचा अवमान करण्याचा प्रकार असून पथक प्रमुख पंडितराव मोरे यांनी संबधित कृषी दुकानदार व त्यांना आजवर पाठीशी घालत आलेले कृषी विभागाचे सर्व संबधिता विरुद्ध कठोर कार्यवाही करून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा