रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन


सम्राट टाइम्स लाईव्ह

वाशिम : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक आनंद देऊळगावकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा