सम्राट टाइम्स लाईव्ह
मराठा सेवा संघ प्राणित वि.भ.वि.प ची वाशिम कार्यकारिणीची आढावा बैठक वाशिम येथील स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात पार पडली. कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गजानन भोयर,वि.भ.वि.प प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी, विदभ कार्याध्यक्ष नारायण शिंदे,जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष गणेशजी आढाव ,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष वाशिम राजू कोंघे व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थित होती .या वेळी विध्यार्थी नेते गणेश आढाव यांनी अमरावती उपकेंद्राच्या प्रश्नावर बोलतानी आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने वेग वेगळ्या स्वरूपात आतापर्यंत निवेदन ,धरणे आंदोलन संघटनेच्या वतीने आतापर्यंत करण्यात आले आहेत . आतातरी लोकप्रतिनिधीनी या बाबत पाठपुरावा होऊन सुद्धा निर्णय घेतलेले नाहीत. अश्या लोकप्रतिनिधी लवकरात लवकर योग्य निर्णय घेत हा प्रश्न लवकर विधानसभेत मांडून वाशिम ला न्याय मिळवून द्यावा .अन्यथा पुढील आंदोलन साठी ऱ्यांनी तयार राहवे. या प्रसंगी अजून गजानन भोयर,भागवत मापारी ,नारायण शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पोहचवुन प्रत्येक तालुकास्तरावर}तालुकाध्यक्ष निवड झाली अशी दांडगा विस्तार असणारी वीर भागतसिंह विध्यार्थी परिषद ही एकमेव विध्यार्थी संघटना असावी.हीच वि.भ.वि.प ची भरीव कामगिरी मनता येईल.गाव ,खेडे ,शहरी भाग व त्यापासून प्रत्येक कॉलेज पर्यंत पोहचण्याचा आमचा मानस असल्याचं प्रतिपादन या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी केले . विविध मुद्द्यांवर एसटी महामंडळ च्या पासेस व गाड्या, महा डी. बी.टी स्कॉलरशिप ,चिडीमारी , म्हविध्यालयीन निवडणूका ,अँटी रॅगिंग या बद्दल चर्चा व निर्णय घेन्यात आले . या वेळी नवीन जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली . जिल्हा सचिव प्रवीण गोटे , जिल्हाउपाध्यक्ष गोपाल कोंघे , जिल्हाउपाध्यक्ष रुपेश बाजड, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल शिंदे, कोष्याध्यक्ष संतोष कोल्हे , जिल्हा संघटक मंगेश शिंदे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख गनेश गोटे, जिल्हा प्रवक्ता अर्जून सुर्वे , जिल्हा मार्गदर्शक योगेश लांडकर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश देशमुख, अंकुश मापारी, संदीप खंदारे ,तालुकाध्यक्ष} रिसोड ऋषिकेश देशमुख,वाशिम योगेश खोडके ,मालेगाव किसनराव शिंदे,मनोरा प्रणव ठाकरे,मंगरूळपिर योगेश लुंगे, कारंजा वैभव भिवरकर,वाशीम शहराध्यक्ष निलेश वानखेडे या सर्वांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. सूत्र संचालन मंगेश शिंदे , प्रास्ताविक देवा बर्डे तर आभार प्रदर्शन योगेश खोडके यांनी केले.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा