३० नोव्हेंबरपर्यंत मुदत : आदिवासी उपयोजना :
महेंद्रकुमार महाजन
रिसोड प्रतिनिधी
रिसोड - आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात लाभार्थींना सिंचन विहिरींचा लाभ दिला जाणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन रिसोड पंचायत समितीचे कृषी अधिकारी (विघयो) शरद घुगे यांनी बुधवारी केले.
आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी आदिवासी उपयोजना या घटकांतर्गत सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील या अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत कागदपत्रांसह रिसोड पंचायत समिती कृषी विभाग येथे सादर करणे आवश्यक आहे. रिसोड तालुकातील
आदिवासी शेतकऱ्यांनी क्षेत्रांअतर्गत अर्ज भरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत रिसोड तालुका येत नसून क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना अंतर्गत रिसोड येते. यापूर्वी कुणी चुकीने अर्ज केले असल्यास पुन्हा सुधारणा करून क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना अंतर्गत अर्ज भरून प्रत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले. संबंधित लाभार्थीला ‘कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहेत. सातबारा, आठ अ, जातीचा दाखला, दारिद्ररेषेचे कार्ड, जातपडताळणी प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार क्रमांक, विहिर नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची प्रक्रिया आॅनलाईन करावी लागणार आहे. आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन शरद घुगे रिसोड कुषि अधिकारी
यांनी केले.
महेंद्रकुमार महाजन
रिसोड प्रतिनिधी
9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा