👉 👉 महिलेचा गाडीत बसण्यास नकार
सम्राट टाइम्स लाईव्ह
देशाच्या पंतप्रधानांनी हातात झाडू घेतला आणि देश स्वच्छतेकडे सरसावला!. महाराष्ट्रात गाव हागणदारीमुक्तीचे वारे जोरात वाहू लागले. गुड मॉर्निग पथके स्थापन करण्यात आली. भल्या पहाटे 5 वाजतापासूनच हागरदरी धुंडाळू लागले . उघड्यावर शौच करणारे अंतर्वस्त्र घेऊन पळू लागले. जनतेची दाणादाण उडाली. पथकाला मजा येऊ लागली. जनतेची मानसिकता बदलण्यासाठी गावात कलापथके जनजागृती करू लागली. काही जिल्हे ,तालुके ,नगर परिषद, हागणदारी मुक्त घोषित होऊ झाली. सेलिब्रिटी शौचालय बांधण्याचा संदेश जाहिरातीतून देऊ लागले. करोडो रुपये स्वच्छता संदेशावर खर्च होऊ लागले. वरिष्ठ पातळीवर कडक कायदे झाले .रेशन पासून दाखल्यापर्यंत बंदी घालण्याची भाषा होऊ लागली. काही ठिकाणी गुड मॉर्निग पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे महिलांनी गुड मॉर्निग पथकावर गुन्हे दाखल केले आणि जिल्ह्यात गुड मॉर्निग मोहीम थंडावली. काही दिवसांपासून पुन्हा गुड मॉर्निग पथके कार्यन्वित झाली .
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे दि 22 नोव्हेबरला भल्या पहाटे 5 वाजता पाणी व स्वच्छता मिशनची गाडी दाखल झाली आणि उघड्यावर शौच करणाऱ्याची पळापळ झाली. पथकासोबत गावातील सरपंच, सदस्य ,पोलीस पाटील,तंटामुक्ती समिती अध्यक्ष ,ग्रा स्व. समिती अध्यक्ष, महिला कर्मचारी नसताना महिलांना उघड्यावर शौच करताना रंगेहात पकडण्यात आले महिलांना गाडीत बसण्याचे सांगनारे आपण कोण? कोठून आले? गुंड की नक्षलवादी? म्हणत वाहनात बसण्यास महिलांनी नकार दिला .गावातील कोण तुमच्यासोबत आहेत. तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा म्हणत एक महिला पथकातील महिला कर्मचाऱ्यावर खेसकली . मागील गुन्हे नोंद होण्याचा अनुभव पाठीशी असल्याने पथकाने काढता पाय घेतला उघड्यावर शोच करताना रंगेहात पकडण्यात आलेल्या 10 लोटाबहाद्दराना किन्हीराजा पोलीस चौकीत आणण्यात आले दंड भरा अन्यथा पोलीस कार्यवाहिला सामोरे जा म्हणत गुड मॉर्निग पथकाने एक दिवसाची मुदत दिली. केवळ एकाने दंडाचा भरणा केला उर्वरित 9 लोटा बहाद्दर तटस्थ आहेत. 30 तासांचा कालावधी उलटला आहे . गुड मॉर्निग पथक आता काय कार्यवाही करणार याकडे सर्व गावाचे लक्ष लागले आहे तर पथकांनी पकडलेल्या महिलेने विचारलेला प्रश्न ग्रामस्थ महीलांना महत्वाचा असल्याचे म्हणत इतर महिलांनी त्या महिलेला साथ दिली .उदया अपहरण करणारे गुंड, नक्षलवादी गावात येऊन महिलांना लक्ष करतील महिलांची अब्रू जाईल त्यामुळे पथकासोबत गावातील राजकीय पदाधिकाऱ्यासह कर्मचारी ,महिला असायला पाहिजे असा महिलांचा सूर निघाला...
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा