सम्राट टाईम्स
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा वर्तुळात बिबट्याने एकाच आठवड्यात बकरिसह गोऱ्हा फस्त केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे कवरदरी येथील विक्रम तुळशीराम माघाडे यांची बकरी बिबट्याने 4 दिवसांपूर्वीच खाल्ली तोच दि 22 नोव्हेंबरला किन्हीराजा येथील शेतकरी अशोकराव नालिंदे यांच्या गोऱ्हाचा सांगाडा जंगलात आढळून आला. बिबट्यानेच शिकार केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. किन्हीराजा वर्तुळाला लागूनच काटेपूर्ण अभयारण्य आहे यात बिबट्याचे प्रमाण जास्त आहे. महान धरण परिसरात बिबट्याचा वावर आहे .अभयारन्यामुळे बिबट्या लोकांच्या नजरेस पडत आहे .शेतकऱ्यांची जनावरे मारली जात असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा