गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

धर्म जोडण्याची भाषा करतो, तोडण्याची नाही- श्रवण मुनीश्रीं विशेषसागरजी



महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 

रिसोड - सेनगांव शहरातील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मदिरात दि.२२ नोव्हेंबर बुधवार रोजी धर्मसभेमध्ये प.पु.राष्ट्रसंत गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी महाराजांचे सुयोग्य शिष्य प.पु.श्रवण मुनीश्री विशेषसागरजी महाराज यांनी जे श्रोते उपस्थित आहेत आणि मुनी धर्माला मानतात व त्यांची पुजा अर्चा करतात. मुनीधर्माला माना,मुनींची भक्ती करा परंतु जे मुनी समाजाला तोडण्याची,समाजात फुट पाडण्याची भाषा करीत असतील तर त्यांचे विचार लक्षात ठेवु नये असे यावेळी उदगार काढले.
सेनगांव येथील श्री १००८ महावीर दिगंबर जैन मंदीर येथे आयोजीत धर्मसभेला संबोधीत करतांना बोलत होते.यावेळी जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मुनीश्रीं पुढे बोलतांना म्हणाले की, जैन दर्शनास सम्यदर्शनला 'आईची उपमा दिली आहे, ज्या प्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलाची रक्षा करते; मुलाची प्रगती पाहते त्याच प्रकारे 'सम्यदर्शन' आपल्या आराधकांची प्रगती करते. सम्यदर्शन जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. आज समाजामध्ये अशा व्यक्तींची आवश्यकता आहे जो कैची नव्हे तर सुईचे काम करेल, समाजाला तोडण्याची नव्हे तर, जोडण्याची वृत्ती बाळगेल. धर्म जोडणे शिकवितो तोडणे नाही. भगवान महावीरांनी 'जिओ और जिने दो' चा नारा देत आपले जिवन व्यतीत केले. त्याच उक्तीस धरुन आज समाजामध्ये "मिलो और मिलने दो, जुडो और जुडने दो" या उद्धोताने समाज जोडणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य समजावे. "जैसा खावे अन्न वैसा होवे मन". "खानपान शुध्द, तो खानदान शुध्द" धर्मसभेनंतर मुनीश्रींच्या मंगल सानिध्यात 'णमोकार पैतीसी विधान' दि.२४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता येथील १००८ महावीर दिगंबर जैन मंदिरात जैन बांधवांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जैन मंदीर विश्वस्त समिती कडुन करण्यात आले आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन 
रिसोड प्रतिनिधी 
9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा