कारंजा -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व संविधान निर्माण समिति चे अध्यक्ष डा बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले डा बाबासाहेब आंबेडकरांनी सतत 2 वर्ष 11 महीने 18 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिति केली डा बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अमलात आले भारत सरकार ने डा बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्ष निमित्त 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिवस म्हणून साजरा केला परंतु आंबेडकरवादी जनता ही दशका पासून 26 नोव्हेंबर हां दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आहे डा बाबासाहेब यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 30 वाजता स्थानीय डा बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारिप बहुजन महासंघच्या वतीने संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संविधान दिवस कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,नगर परिषद् पदाधिकारी,नगरसेवक व आंबेडकरवादी विचारसरणीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी संविधान दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी तसेच भारिप युवक कारंजा तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर यानी केले आहे.
प्रतिनिधी - विनोद नंदागवळी, कारंजा (लाड) 9673954516
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा