सिंदखेड येथील पोलीस स्टेशन वाईबाजार येथे स्थलांतर करण्याची मागणी...
वाई बाजार...कार्तिक बेहेरे
माहुर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याची ईमारत सन १९१८ मध्ये निजामशाही च्या काळात बांधण्यात आलेली आहे. ९९ वर्षापूर्वीची ही ईमारत आता जिर्ण झाली असुन या ईमारतीचे छञ पावसाळ्यात नेहमी गळते.ईतर वेळी या छताचे पाेपडे,मातीचे गोळे खाली पडतात,या ईमारतीत केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या वाई बा.येथील मोकळ्या जागेत सिंदखेड पोलीस स्टेशनचे स्थांलातर करण्याची आमजनतेत मागणी होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात पोलीसांव्दारे छतावर मेनकापड टाकुन पाणी गळण्या पासुन रोखण्याचे केवीलवाने प्रयत्न केले जातात,तरीही ठिकठिकानी पाणी गळतेच या ईमरतीत अनेक ईलेक्टाँनिक जसे संगणक,सी.सी.टीव्ही यंञणा,मालखाना,बंदुकासह विविध महत्वाचे दस्तावेज आहेत,हे साहीत्य सुरक्षित ठेवण्यास पोलीसांना बरीच कसरत करावी लागते.वर्षातुन दोनदा जिल्हा पोलीस अधिक्षक आणि इतर अधिकार्याकडुन पोलीस ठाण्याचे निरक्षण होते,त्यांनाही या बाबतची माहिती वेळोवेळी देण्यात आली आहे.तसेच पोलीस ठाण्या कडुन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला वेळीवेळी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.तेथुन ही या बाबत कारवाई सुरु आहे,
त्याच प्रमाने येथील पोलीस कर्मचार्याना येथे निवासाची व्यवस्था नाही,जे निवासस्थाने होते ते सर्व भुईसपाट झाले आहे,या कर्मचार्यांना ईतरञ भाड्याच्या खोल्या करुन राहण्याची वेळ आलेली आहे,तसेच या ठिकाणी तिव्र पाणी टंचाई असुन कर्मचार्यांना फ्लोराईड युक्त पाणी पिऊन आपली जवाबदारी पार पाडावी लागत आहे.तसेच या ठाण्या अंतर्गत ५२ गावे येत असुन परिसरात कुठला अनुचीत प्रकार घडला तर खराब रस्त्यामुळे घटनास्थळी पोलीसांना पोहचण्यास विलंब होतो,अशा अनेक अडचणीचा सामना येथील पोलीस कर्मचार्यांना करावा लागत आसुन वरिष्ठांनी या कडे लक्ष देवुन येथील पोलीस स्टेशन ५२ गावाचा परिसराती केंन्द् बिंन्दु आसलेल्या वाई बाजार येथील नक्षल चळवळीच्या काळात या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस चौकी निर्माण केली होती. ती जागा आजमितीस पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असुन सिंदखेड येथील पोलीस स्टेशन वाई बाजार येथे स्थलांतर करण्यात यावी,किंव्हा पोलीस दुरक्षञ तरी या ठिकाणी स्थापणा करावी,अशी मागणी सुज्ञ नागरिकातुन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा