सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची जिल्हास्तरीय सभा रविवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक मध्यमेश्वर संस्थान येथे घेण्यात आली. या सभेचे उद्घाटक मध्यमेश्वर संस्थानचे ट्रस्टी बंडुकाका जहागीरदार हे होते. तर अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष उदय महा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बडवणे, वकील आघाडीचे सरचिटणीस अॅड. राजेंद्र पोद्दार, सरचिटणीस अनिल बंठे, अमरावती विभागीय अध्यक्ष अभय खेडकर, हिंगेाली जिल्हाध्यक्ष दुर्गादास पांडे यांची उपस्थिती होती. यावेळी ब्राह्मण समाजातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळामध्ये प्राविण्या मिळविणार्या गुणवंत खेळाडूंचा व अधिकारी, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महाविद्यालयीन अंतर्गत पॉवरलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक विजेता वैभव कडवे, स्क्वॅश खेळात सुर्वपदक विजेती रेणूका देशमुख, सायकल पोलोमध्ये सुवर्णपदक विजेती स्नेहल मिश्रा या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते, भगवान परशुरामाची प्रतिमा व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच महासंघाचे सरचिटणीस अनिल बंठे, जिल्हाध्यक्ष शशिकांत दंडवते, महिला आघाडी अध्यक्ष स्मिता जोशी, यवतमाळचे पालक संजय कुलकर्णी यांचा भगवान परशुरामाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणातून उदय महा, आनंद बडवणे, अभय खेडकर आदींनी ब्राह्मण समाजाच्या समस्या, त्यांचे अधिकार यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी पदाधिकार्यांनी वाशीम जिल्हा युवा आघाडीची कार्यकारीणी जाहीर केली. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष मयुर बिटोडकर, उपाध्यक्ष मनोज अनसिंगकर, ओंकार देशमुख, कोषाध्यक्ष अनिरुध्द पाटील, प्रसिध्दी प्रमुख अक्षय जोशी ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला ब्राह्मण समाजातील युवा वर्ग, जेष्ठ नागरीक, महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिष डांगे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल काटेकर यांनी केले.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा