पंजाबराव घुगे
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससह अरुणबाबा इंगोले मित्र मंडळाने एल्गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यार्थ हजारो कार्यकर्त्यांचा बैलगाडी मोर्च्या तहसील कार्यालयावर आज धडकला विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविण्यात आले
भाजपा शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून थट्टा चालविली आहे क्रूर सरकार शेतकऱ्यांसाठी फसव्या योजना जाहीर करून शेतकऱ्याच्या भावानेशी खेळत आहे मालेगाव तालुका दुष्कळग्रस्त जाहीर करावा ,मालेगाव तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत जाहीर करावी, सोयाबीन पिकाच्या नुकसणीबाबत शेतकऱ्यांना एकरी 5000रुपये अनुदान मंजूर करणे,कपासींवर गुलाबी बोड अळीमुळे झालेल्या नुकसाणीबाबत एकरी 5000 रुपये अनुदान देणे, सुदी, अनसिंग,कुरळा,सुकांडा ,खैरखेडा ही गावे मालेगाव मंडळ ऐवजी मेडशी मंडळामध्ये समाविष्ठ करावे व पांगगीकुटे हे गाव करंजी मधून किन्ही राजा मध्ये समाविष्ठ करावे ,200 रुपये सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे, कर्जमाफी चे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित जमा करावे,
कृषी पंपाचे कनेक्शन कट करू नये आणि तोडलेले कनेक्शन त्वरित विनाशुल्क जोडून द्यावे आदी मागण्यार्थ मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेससह अरुणबाबा इंगोले मित्र मंडळा च्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकला शेकडो बैलगाड्यासह हजारो कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते शेकडो महिला कार्यकर्त्यानी मोर्च्यात सहभाग नोंदविला हे विशेष!
पंजाबराव घुगे
9823812319
Samrat times
(Malegaon reporter)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा