सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे...... - नायमुर्ती पनाड.



मंगरूळपीर :- 
विधी सेवा प्राधिकरण सप्ताहा निमित्त दिवानी न्यायालय, मंगरूळपीर यांचेवतीने स्थानिक मंगलधाम परिसरातील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेत आयोजित बालदिनाचे कार्यक्रमात तालूका विधी सेवा समिती चे अध्यक्ष, तथा  दिवानी न्यायालय कनिष्ट स्तर चे  न्यायाधिश पनाड यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालूका विधी सेवा समिती चे अध्यक्ष, तथा  दिवानी न्यायालय कनिष्ट स्तर चे  न्यायाधिश मा. पनाड साहेब हे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून वकील संघाचे तालूकाध्यक्ष अॅड. एन्. एम्. मूळे, अॅड. संतोष सरकाळे, महात्मा फूले शिक्षण व क्रिडा प्रसारक संस्थेचे अध्यक्ष हिरामण इंगोले, सचिव संतोष शेटे, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. प्रतिमा डवले, सावंत, देशमूख, हे होते. 
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महान विज्ञाननिष्ट, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन, हारार्पण करण्यात आले. यावेळी शाळेचे वतीने मान्यवरांचे पूष्पगूच्छ देवून स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अॅड. संतोष सरकाळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली. 
तर तालूका विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. एन्. एम्. मूळे यांनी 'न्याय सर्वांसाठी' या भुमिकेतून निर्मात विधी सेवा प्राधिकरण, रचना,कार्य, त्यामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, इ. बाबत माहिती दिली. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष, तालूका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर चे मा. न्यायाधिश पनाड साहेब यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष हिरामण इंगोले हे दोन्ही डोळ्यांनी अंध, अपंग, निराधार, निराश्रित, अशिक्षित असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले व गोरगरीबांच्या मुलांकरीता त्यांचेच वस्तीत शाळा काढली ही फार मोठे कार्य आहे, असे सांगत यांचे अभिनंदन केले. व सोबत शासनाने विधी सेवा प्राधिकरणाची निर्मिती व त्याची प्रभावी अंमलबजावणी करून सामाण्य, शोषित, पिडित, अनाथ, गरीबांना मोफत न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली. बालकांना विविध हक्क व अधिकार दिलेले आहेत त्यांचे रक्षण झाले पाहिजे. बालकांचे शोषण बंद झालेच पाहिजे. बालमजूरी, बालकामगार, बालकांवर होणारे शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार मूक्त समाज घडविणे, हे आपले प्रथम कर्तव्य मानून त्याविरोधात कायद्यासोबतच मानसिकता बनवूया. 'से नो टू चाईल्ड व्हायलन्स' असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचलन शिक्षक निलेश मिसाळ यांनी तर आभार शिक्षक योगेश गवई यांनी मानले.
यावेळी, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट्स् व चाॅकलेट्स् चा खाऊ वाटप करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेचे कु. प्रतिमा डवले (मूख्याध्यापिका), शिक्षक योगेश गवई, महादेव ससाने, श्रीकृष्ण दबडे,गजानन उखळकर, विनोद मूसळे, सतिश सरोदे, आणि निलेश मिसाळ यांसोबत विधी सेवा समिती, तालूका विधीज्ञ संघ, मंगरूळपीर दिवाणी न्यायालयाचे कर्मचारी सावंत, देशमूख, वर, यांनी विशेष परिश्रम घेतले.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा