कारंजा:-ग्राम बेलखेड येथील कॉ. रामेश्वर डोईफोडे यांच्या चवथ्या स्मृती दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना फाटा देत त्यांच्या कुटुंबीयानी अंधश्रद्धा निर्मूलन व सैनिक पालकांचा सत्कार कार्यक्रम दि. १९/११/२०१७ ला ग्राम बेलखेड येथे घडवून आणला. सदर कार्यक्रमात अनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर त्यांचे सोबत अंनिसचे यवतमाळ जिल्हा संघटक बंडू बोरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अंबादास खडसे, जिल्हा संघटक विजय भड , राम नाखले, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर उपस्थित होते.
कामठा बेलखेड ह्या दोन्ही गावातील सैन्य व पोलीस मध्ये मुले पाठविणाऱ्या पालकांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात दिलीप सोळंके अनेक बदमाश बुवा बाबांचे उदाहरण देत घटक व कालबाह्य धार्मिक रूढी, प्रथा यामुळे समाजाचे कसे शोषण होते त्याबद्दल प्रात्यक्षिकासह आपल्या विनोदी शैलीत प्रबोधन केले. त्या प्रसंगी गजानन अमदाबादकर , अंबादास डोईफोडे , बंडू बोरकर, यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली. यावेळी मंचावर पोलीस पाटील शंकर मोरे , चेतना अध्यापक विद्यालय वर्धा येथील प्राचार्य पंकज मुनेश्वर, युवा रूरल नागपूर चे देवराज पाटील, बाबारावजी घन, बाबाराव वानखडे आणि आदी. उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन डोईफोडे परिवार व क्रांती रूरल डेव्हलपमेंट असोसिएशन, बेलखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर डोईफोडे यांनी व आभार प्रदर्शन कु. दीपाली डोईफोडे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आकाश पवार, आशिष धोंगडे, विशाल ठाकरे, अजय सुलताने, सचिन चांदुरकर, अक्षय जवंजाळ, निलेश डोईफोडे, महेश पारडे, जयश्री घन , सचिन पवार, प्रवीण वानखडे, भूषण साखरे, योगेश गंगोले, गोपाळ डोईफोडे, पवन वानखडे, व रोशन वानखडे आदीनी परिश्रम घेतले. तर बेलखेड कामठा येथील ग्रामस्थ तथा महिला भगिनी यांनी प्रबोधनाचा आस्वाद घेत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा