मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

संस्कार व आध्यात्मिक केंद्राकरीता चार एकर जमिन देणार सोमाणी परिवाराचा निर्णय


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : राष्ट्रीय युवा पुरस्काराने भारत सरकार व्दारा पुरस्कृत सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांनी आध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकर यांना नागपूर येथील आश्रमामध्ये बहुचर्चित गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंदलेले व नुकतेच प्रकाशित झालेले क्रांतीकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे कडवे प्रवचन भाग नऊ हे पुस्तक भेट देवून त्यांचा आशिर्वाद घेतला.
    तदनंतर क्रीडा संकुल येथे आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यक्रमात मेळघाट येथे 20 वर्षापासून आदीवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तु, धान्य, आपादग्रस्तांना मदत, निराधारांना आधार, व्यसनमुक्ती, अवयवदान अभियान, नेत्रदान, रक्तदान, बेटी बचाव बेटी पढाव समवेत विविध सामाजीक कार्य करणारे तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा मंचावर श्रीश्री रविशंकरजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
चार एकर जमीन दान देणार
    जिल्हयातील धनज बु. येथील रहिवासी सोमाणी परिवाराची वाशीम जिल्हयातील भामदेवी येथे वडीलोपार्जित जमीन आहे. सदर गाव हे मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतले असून या गावात विकासाच्या विविध योजना, प्रकल्प सुरु आहेत. आज बालकांना संस्कार व परिवारांना आध्यात्मिक ज्ञान जरुरी असल्याने भामदेवी येथील चार एकर जमीन श्रीश्री रविशंकरजी यांना संस्कार व आध्यात्मिक केंद्राकरीता देण्याचा निर्णय समाजसेवी पुनमचंद सोमाणी, सौ. स्नेहलता सोमाणी, राजेश सोमाणी, निलेश सोमाणी, शाम सोमाणी यांनी घेतला आहे. बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे शिक्षक डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव देण्यात येणार असून या केंद्राच्या भूमिपुजनाला श्रीश्री रविशंकर यांना भामदेवी येथे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भामदेवी येथे जागृत माता जगदंबा देवस्थानही आहे. जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हींगच्या संस्कार व आध्यात्मिक केंद्राच्या निर्मितीकरीता सोमाणी परिवाराने पुढाकार घेतला असून त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा