मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

श्री क्षेत्र शेगाव येथे लिंगायत समाजाचा भव्य वधु-वर परिचय मेळावा


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - विदर्भ लिंगायत संंघटन समितीच्या वतीने विदर्भात प्रथमच श्री क्षेत्र शेगाव येथे येत्या 25 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस लिंगायत समाजाचे महासंमेलन व भव्यदिव्य स्वरुपात उपवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कायर्र्क्रमास जिल्हयातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विरशैव लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष काशीनाथआप्पा लाव्हरे यांनी केले आहे.
    शेगाव येथील खामगाव रोडवरील हॉटेल श्रीकृष्णा कॉटेजमध्ये आयोजीत या  महासंमेलनाचे उद्घाटन शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. यावेळी धर्मगुरु श्री ष.ब्र. 108 वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य स्वामीजी साखरखेर्डा यांची आशिर्वादपर उपस्थिती राहील. तसेच चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, मुर्तीजापुरचे आमदार हरिष पिंपळे, चिखलीच्या नगराध्यक्षा सौ. सुप्रियाताई बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभेल. याच दिवशी दुपारी 3 वाजता वधु-वर परिचय मेळावा उद्घाटन समारंभास कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंंडकर हे उपस्थित  राहून वधु-वर परिचय मेळावा पुस्तिकेचे विमोचन करतील. रविवार, 26 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता वधु-वर परिचय मेळाव्याला सुरुवात होवून सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाची सांगता होईल. या दोन्ही दिवशी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच वधु-वर परिचयासाठी ज्या उमेदवारांनी नोंदणी अर्ज भरले आहेत त्यांनी 25 तारखेला सकाळी 9 वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक असून त्याशिवाय त्यांच्या निवासाची व्यवस्था होणार नाही. असेही लाव्हरे यांनी कळविले आहे.
    विरशैव युवक युवतींनी या महासंमेलनात उपस्थित राहून सर्व बाबतीत योगदान द्यावे. भविष्यात विरशैव समाजाची सर्व भिस्त नविन पिढीवर आहे. विरशैव लिंगायत समाजाला परत प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे काम त्यांना करावयाचे आहे. या संमेलनातून त्यांनी नवीन उर्जा प्राप्त करुन घ्यावी व महात्मा बसवेश्वरांचे तत्वज्ञान सर्व जगात पसरवावे व आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून द्यावे असे आवाहन लाव्हरे यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा