सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : सर्व शाखीय सोनार समाजाची सामाजीक संघटना असलेल्या सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने येत्या रविवार, 26 नोव्हेंबर रोजी परभणी येथे सोनार समाजाचा राज्यव्यापी समाज मेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला जिल्हयातील सोनार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा शहर सरचिटणीस कैलास मुगवनकर यांनी केले आहे.
परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंती ना. बबनराव लोणीकर हे करतील. तर अध्यक्षस्थान भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे भुषवितील. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील आजी माजी आमदार, खासदार व जेष्ठ मान्यवरांची उपस्थिती राहील. सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, दिप प्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार सोहळा, प्रास्ताविक भाषणानंतर समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी कार्यक्रमामध्ये समाजातील जेष्ठ समाजसेवक यांना समाज कार्याचा गौरव म्हणून त्यांना समाज महर्षी, समाज रत्न, समाजभुषण, समाजसेवक, समाजमित्र आदी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या राज्यव्यापी महामेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याला जिल्हयातील समाजबांधवांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, प्रदेश अध्यक्ष विलास भांबुर्डेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मधुकरराव टाक, उपाध्यक्ष दिलीप नागरे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत टाक, प्रदेश संघटक बजरंग खर्जुले व वाशीम जिल्हाध्यक्ष तथा भाजपा शहर सरचिटणीस कैलास मुगवनकर यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा