सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम : सामाजीक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या स्थानिक रेल्वे गेट जवळील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील समस्या दुर करुन विद्यार्थ्याना सुविधा देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 20 नोव्हेंबर रोजी जि.प. समाजकल्याण अधिकार्यांना निवेदन देवून करण्यात आली.
निवेदनात नमूद केले आहे की, शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्याना अनेक समस्या गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत आहेत. पलंग तुटक्या अवस्थेत आहेत. वसतीगृहातील पंखे नादुरुस्त आहेत. शौचालय व बाथरुममध्ये विजेची व्यवस्था नाही. सफाई कामगारांकडून स्वच्छतेची काळजी घेतल्या जात नाही. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता केल्या जात नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यासाठी भोजन व्यवस्थेमध्ये नियम पाळल्या जात नाहीत. नियमानुसार त्यांना जेवण दिले जात नसून ठरविलेल्या मेनुनुसार जेवण न देता निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात आहे. या सर्व समस्यांमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनात अडथळा निर्माण होत आहे. येत्या दहा दिवसात वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या दुर न झाल्यास अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देतांना अभाविपचे नगरमंत्री जगदीश इंगोले, जिल्हा संयोजक ऋषांत कोरान्ने, शिवम कदम, अजय बोरकर, दिनेश चव्हाण, यशवंत काळे, सौरभ नानवटे, यशवंत काळे, साहील डवरे, श्रीवेद केळकर, चिन्मस लक्रस, ऋषीकेश पंडीत, मनोज अवचार, विठ्ठल उगले, अभिनंदन जाधव, दिलीप राठोड, धीरज धांडेे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा