सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम जिह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा महात्मा गांधी तंटा मुक्ती समिती च्या अध्यक्षपदासाठी गोंधळा च्या वातावरणात निवडणूक झाली निवडणुकीत 99 मते घेऊन दुसर्यांदा सुनील गोदमले विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश ठाकरे पराभूत झाले ठाकरे यांना 85 मते पडली
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा मोठी समजल्या जाणारी ग्रामपंचायत आहे येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या 15 आहे गाव पूर्वीपासून वादग्रस्त आहे येथे कधी काय घडेल याचा नेम नाही गावात तंटा मुक्त समिती अध्यक्ष बदल आणि निवडणुकीचे वारे बऱ्याच महिन्यापासून वाहने सुरू होते अध्यक्ष सुनील गोदमले यांना काही लोकांचा विरोध होता 2 व 13 ऑक्टोबर ला ग्रामसभा रद्द झाल्याने काही लोकांच्या मनसुभ्यावर पाणी फेरल्या गेले
अखेर 21 नोव्हेंबर ला महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी ग्रामसभा सरपंच सौ वेणूताई जामकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत च्या गोपिनाथ मुंडे सभागृहात आयोजित करण्यात आली तंटा मुक्त समिती अध्यक्षपदासाठी 8 उमेदवार इच्छुक असल्याने गोंधळ उडाला 8 उमेदवार तटस्थ असल्याने आवाजी मतदान घेण्याचे ठरविण्यात आले 6 सदस्यांनी माघार घेतल्याने सुनील गोदमले आणि सुरेश ठाकरे यांच्या सरळ लढत होऊन सुनील गोदमले दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाड़े यांनी काम पाहिले सभेला ग्रामपंचायत सरपंच वेणूताई जामकर ,उपसरपंच संजय डिवरे ,सदस्य, कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती तर जऊळका ठाणेदार शेख यांनी चोख पोलीस बंदोमस्त ठेवला होता.
महादेव हरणे
सम्राट टाइम्स लाईव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा