दामोदर जोंधलेकर
वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खानापूर(बा) गावातील शेतकरी उत्तमराव तुळशीराम कडू या 55 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दुकानात गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली
खानापूर(बा) येथे मृतक शेतकरी उत्तमराव कडू यांची 2 एकर शेती आहे उदरनिर्वाह करण्यासाठी छोटेशे किराणा दुकान आहे सतत ची नापिकी दुष्काळग्रस्त परिस्थितीने कडू यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला किराणा दुकान चालत नसल्याने पत्नीसह मुलगा मोलमजुरी करून संसाराला हातभार लावायचे. आज सकाळी पत्नी व मुलगा मोलमजुरी ला गेले असताना कडू यांनी कर्जाला कंटाळून दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मृतकाच्या मुलाने दिली .घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रेताचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहेत
दामोदर जोंधलेकर कारंजा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा