संजय डोंगरे
स्वस्त तांदूळ सोडून चोरांनी तूरडाळीसह इतर माल चोरून नेल्याची घटना जाभरून जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत दि 22 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता उघडकीस आली
वाशिम तालुक्यातील जाभरून जहागीर जिल्हा परिषद शाळा उघडण्यासाठी
दि 22 नोव्हेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षक आले तेव्हा स्वयंपाकगृहाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकगृहात ठेवण्यात आलेले दीड क्विंटल तांदूळ सोडून चोरांनी तूरडाळ,,मुंगडाळ,मटकी चवळी,वाटाणा,मोहरी,मिरची पावडर,गरम मसाला,सोयाबीन तेल,जिर हळद आदी हजारो रुपयाच्या मालावर हात साफ केला मात्र स्वस्त तांदुळाचा एक दानाही चोरांनी न नेल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे चिमुकल्याच्या तोंडचा घास चोरणाऱ्या क्रुर चोराविषयी संताप व्यक्त केल्या जात आहे घटनेची तक्रार अनसिंग पोलीस स्टेशनला नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत
संजय डोंगरे
जांभरून जहागीर
9922649578
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा