रिसोड प्रतिनिधी
महेंद्रकुमार महाजन
२५/नोव्हेंबर
मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे.निसर्गाला जखमी करुन मानवाला कसे काय जगता येईल?निसर्गावर प्रेम करा.त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहकार्य करा.अन्यथा पृथ्वीवर माणूसच उरणार नाही.आज हे फक्त पुस्तकात किंवा वृत्तपञातच वाचायला मिळते
पण आज निसर्गाचे रक्षण मानवाच्या रक्षणासाठी अत्यावश्यक आहे.विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्व पटवुन देण्यासाठी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील वर्ग ११वी व १२ वी कला शाखेतील विद्यार्थ्याचे २५ नोव्हेंबर रोजी मोहजाबंदी वनपरिक्षेत्राला एक दिवशीय भेटीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वन क्षेत्रास जातानां प्राचार्य डि.एन.अघडते सर,पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर उपस्थित होते.तयारीसाठी श्री.कैलास शर्मा व श्री.गजानन पुरी व मुळे मामा यांनी मदत केली.
मोहजाबंदी वनपरिक्षेत्र भेटीचे आयोजन प्रा.शरदचंद्र टेमधरे,प्रा.समाधान गायकवाड,प्रा.रमेश टाक व कला शाखेचे विद्यार्थी यांनी केले.जवळपास १०ते१२ कि.मी.चा पायी प्रवास करुन निसर्गाची विविध माहीती जाणुन घेतली.निसर्गरम्य वातावरणात असलेले पंचक्रोशीतील आराध्य दैवत परमपुज्य बाळु मामा यांचे दर्शन घेऊन सहभोजनाचा आस्वाद घेतला.भोजनानंतर कु.जया गिरी,कु.रुपाली थोरात व प्रा.समाधान गायकवाड यांनी गित गायन करुन मनोरजंन केले.त्यानंतर प्रा.टेमधरे,प्रा.गायकवाड व प्रा.टाक यांनी निसर्गाविषयी माहीती देऊन निसर्ग वाचविण्यासाठी सामुहीक शपथ घेण्यात आली.
निसर्गरम्य आनंदमय वातावरणात निसर्गरम्य वातावरणातुन विद्यार्थ्याची बाहेर येण्याची इच्छा नसतानां सुध्दा परतीचा प्रवास सुखरुप झाला.शैक्षणिक क्षेत्रामधील प्रत्यक्ष भेटीचा उपक्रम अनेकदा दुर्लक्षित होतानां दिसत असतानां श्री.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मोप येथील शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी 9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा