रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

भारतीय संविधान मानव समाजाचे सुरक्षा कवच-- हाजी मो. युसूफ पुंजानी


भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व् समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यानी केले भारिप बहुजन महासंघाच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी स्थानीक डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हाजी मो. युसूफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भारतीय संविधान दिवस कार्यक्रमा दरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई अतीरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या विर भूमिपुत्रना भावपूर्ण श्रदांजलि अर्पण करण्यात आली 26 नोव्हेंबर संविधान दिवसा निम्मित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला उजाळा देण्यात आला व 26/11 च्या मुम्बई हल्यात विर मरण प्राप्त झालेल्या शहीदांचे स्मरण करण्यात आले. भारतीय संविधान दिवस कार्यक्रमा प्रसंगी आपल्या मार्गदर्शपर भाषणात युसूफ पुंजानी म्हणाले की 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  व संविधान निर्माण समिति चे अध्यक्ष डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले डा बाबासाहेब आंबेडकरांनी सतत 2 वर्ष 11 महीने 18 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिति केली डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून अमलात आले भारत सरकार ने डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्ष निमित्त 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिवस म्हणून साजरा केला परंतु आंबेडकरवादी जनता ही दशका पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आहे डाँ. बाबासाहेब यांच्या स्मृतिला उजाळा देऊन डाँ. बाबासाहेब आंबेडकर कार्याची,विचारधारेची कास धरने अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले  26 नोव्हेंबर रोजी भारिप बहुजन महासंघच्या वतीने संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिवस कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघाचे  वाशीम जिलाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी सह कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके,उपाध्यक्ष एम टी खान,नगरसेवक जुम्मा पप्पुवाले,निसार खान,सय्यद मुजाहिद एज़ाज़ शेख,जवेदोद्दीन,चन्दन गणराज,अ रशीद,सलीम गारवे, सलीम प्यारेवले,राजू इंगोले, जाकिर शेख, भारिप बमस तालुकाध्यक्ष भारत भगत, भारिप बमसं युवक तालुकाध्यक्ष सचिन खांडेकर, शहराध्यक्ष देवराव कटके,राजाभाऊ चव्हाण,राजू वानखड़े,देवानंद कांबले, बबन वानखड़े,समाधान सीरसाट, अरविन्द भगत,संजय प्रगणे, शामराव कांबले, कौसल्याबाई मोटघरे,अड़ कुंदन मेश्राम,अड़ धम्मानंद देवले, राजेश मस्के,तुलशिराम गुळदे जि.प.सदस्य मोहन महाराज,दिलीप सावजी, रशिद निन्सुरवाले, अर्चना मेश्राम. आदि सह सर्व पदाधिकारी,सदस्य,नगर परिषद पदाधिकारी,नगरसेवक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

विनोद नंदागवळी, 
(9673954516)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा