उकळीपेन :- येथील ग्रामपंचायत चे स्वच्छताग्रूह घाणेरड्या अवस्थेत पडले असून , त्याला कोणत्याही प्रकारचे कुंपण तर सोडाच अगदी वापरासाठी पाण्याची पण व्यवस्था नाही आहे.
स्वच्छताग्रूहाची पाहणी करण्यात आली असता तिथे एका संडास रूम नेहमीसाठीच कुलुप लावून शोभेची वस्तु म्हणून उभी असून..बाथरूम चा वापर हा बाथरूम मध्ये कमी आणि ग्रामपंचायत च्या भिंतीवरच जास्त होतो आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे गावच्या महत्वाच्या ठिकाणी असून तिथेच उत्तरेस सामान्य रुग्णालय उपकेंद्र आहे तर पूर्वेस जिल्हा परिषद शाळा आहे , दक्षिणेस सार्वजनिक गणेश उत्सव मंडल च ठिकाण आहे...नेहमीच गजबजून राहत असलेल्या या ठिकाणी वस्ती असून जेंव्हा लोक..बाथरूम साठी ग्रामपंचायत च्या बाथरूम चा वापर करतात तेंव्हा स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वारंवार ग्रामपंचायत कडे तक्रार करूनही काय करायच ते करा अशी दमदाटी ग्रामपंचायत प्रतिनिधि करीत असल्याचे माहिती आहे ,
तसेच सदर ग्रामपंचायतचे हे घाण पाणी जिल्हा परिषद शाळेत सोडलेले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होत असलेलं हे अक्षम्य दुर्लक्षच म्हणाव लागेल !
एकीकडे शासन हागणदारीमुक्त गाव मोहीम राबवून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता मोहीम राबवत असताना ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत आहे.
तरी सम्बन्धीत शासकीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी , व प्रतिनिधिनी लक्ष घालुन शोभेची वस्तु बनून दुर्गन्धीचे साम्राज्य पसरत असलेल्या या प्रकारास आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सम्राट टाईम्स
सुरेश इंगोले
8830966982
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा