शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

पोलिसांनीच आरोपीस पळून जाण्यास केली मदत.


मालेगाव तालुक्यातील घटना
आरोपिला पळुन जान्यास मदत करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हे दाखल

वाशिम-पोलीस कस्टडी मध्ये असलेल्या आरोपीस पळून जाण्यास मदत केल्या मुळे दोन पोलीस शिपाई व इतर एका इसमा विरुद्ध वाशिम पोलीस स्टेशन मध्ये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी टाकळी येथील 379 कलमान्वये चोरीच्या आरोपातिल गणेश सखाराम बांगर राहणार मालेगाव हा बत्तीस वर्षीय आरोपी दिनांक 23 नोव्हेंबर 2017 रोजी पोलीस कस्टडी मध्ये होता व त्याला कारागृहात नेण्याची जवाबदारी पोलीस शिपाई शिवाजी माणिक केंद्रे व विजय लक्ष्मण ढोरे यांच्यावर होती. आरोपीला कारागृहात नेत असतांना आरोपी पोलिसांच्या व गोभनी येथील दिलीप दिनकर हारकर या इसमाच्या मदतीने पळून गेला आहे. आरोपीला वेळेत कारागृहात दाखल न करता रखवालीतून पळून जाऊ दिले व त्यास पळून जाण्यास हेतु परस्पर पणे मदत करून कायदेशीर कर्तव्य टाळून आरोपीस पळून लावल्यामुळे पोलीस शिपाई शिवाजी माणिक केंद्रे, विजय लक्ष्मण ढोरे या पोलीस शिपायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपीस पळून जाण्यास स्प्लेन्डर एन एक्स जी दुचाकी क्रमांक mh 37 D 8272 क्रमांकाची गाडी पुरविल्या मुळे गोभनी येथील दिलीप दिनकर हारकर यांच्यावर वाशिम पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार बाबाराव राठोड यांच्या फिर्यादी वरून कलम 221, 222, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ची शपथ घेऊन कर्तव्य करणारे पोलीस कर्मचारी आरोपीस पळून जाण्यास मदत करू शकतात का ? या पोलिसांवर कोणाचा दबाव तर नव्हता? पळून जाण्यास मदत करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. याचा सुगावा घेणे गरजेचे आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार हे करत आहेत.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा