प्रवीण घुगे
अकोला -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी येथे लेंडीच्या पुलात सफरचंद फळाने भरलेला ट्रक कोसळल्याची घटना आज सकाळी 5 वाजता च्या सुमारास घडली. ट्रक चालक गंभीर जखमी तर वाहक किरकोळ जखमी झाला . जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे रूग्नालयात हलविण्यात आले आहे . काश्मीर येथून सफरचंद फळाने भरलेला ट्रक क्रमांक R J 14 G G-7699 आंध्रप्रदेशाकडे जात असताना आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास मेडशी येथील लेंडीच्या पुलात कोसळला अपघात ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर वाहक किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती पोलिसाला मिळताच जमादार तिखिले आणि पोलीस कर्मचारी विलास गायकवाड घटनास्थळी पोहचले. प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग असताना या महामार्गावर खडेच खड्डे पडले आहेत .बऱ्याच ठिकाणी पुलाला सरक्षण कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे .मेडशी येथील लेंडीच्या पुलाच्या बाजूला लोकवस्ती बआहे पुलाला कठडे नसल्याने याठिकाणी बऱ्याच अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही शासन प्रशासन कुंभाकर्णी झोपेत आहे. लेंडीच्या पुलाला त्वरित संरक्षण कठडे बसविण्याची मागणी मेडशी ग्रामस्थांनी केली आहे
प्रवीण घुगे मेडशी
9921444908
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा