शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणार्थी तर्फे शरद सुरसे यांचा सत्कार



मंगरूळपीर--तालुकास्तरिय  स्पोकन इंग्लिश  प्रशिक्षणार्थी तर्फे राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री शरद सुरसे यांचा सत्कार घेण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनु. जाती निवासी शाळेचे प्राचार्य श्री सुरजूसे सर विराजमान होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ,(DIECPD) वाशिम चे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ सांगोलकर साहेब, मंगरूळपीर गटशिक्षणाधिकारी सौ. मंजुषा कौशल , विषयतज्ञ श्री जगताप सर, केंद्रप्रमुख श्री रमेश भोंडने , साधनव्यक्ती श्री गजानन ठाकरे, श्री रफिक शेख तसेच विषय तज्ज्ञ श्री दीपक खाडे  उपस्थित होते. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी तर्फे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ,(DIECPD) वाशिम चे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ सांगोलकर साहेब यांचे हस्ते श्री शरद सुरसे यांचा सत्कार घेण्यात आला.  तसेच डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा त्यांना भेट म्हणून देण्यात आली.*
यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री शरद सुरसे  यांनी जि प शाळांना उभारी देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच आपल्या  भावना व्यक्त करून सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगरूळपीर पंचायत समितीचे विषयतज्ञ श्री घरडे सर यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्री ज्ञानेश्वर इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी श्री डि के गवई, ज्ञानेश्वर इंगोले, शिवाजी पजई, स्वप्नील म्हातारमारे, धीरज चव्हाण, कटारे सर, इंगोले सर, जुबेर सर, निलेश पिंपळे, कैलास राठोड, कु. मेघा ठाकरे, कु मुन्नाताई जाधव, कु सपना चौधरी, कु नीलिमा राजूरकर व सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रयत्न केले.                                                              फुलचंद भगत मो.9763007835                           सम्राट टाईम्स लाईव्ह

मुख्यमंत्र्यांना कमिशन देण्याच्या नावाखाली आमदार पाटणीने घेतले 10 लाख रुपये



महादेवराव ताटके यांची पोलीसात  तक्रार दाखल

सम्राट टाइम्स न्यूज
भारतीय जनता पक्षाचे  मुख्यमंत्र्याच्या खास मर्जीतील आमदार तथा  भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष  आमदार राजेंद्र पाटणी वय 55 वर्ष यांनी  महाराष्ट्र शासनाच्या 25/15 निधीतून 1 कोटी रुपयांचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुख्यमंत्री यांना 10 लाख रुपये कमिशन देण्याच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते महादेवराव ताटके यांची 10 लाख रुपयांनी फसवणून केली .जातीवाचक शिवीगाळ केल्याची  तक्रार महादेवराव ताटके यांनी  वाशिम शहर पोलीस स्टेशनला दाखल केली तक्रारीची सत्यता तपासण्या चे आव्हान पोलीस विभागा समोर आहे .तूर्तास सदर तक्रार चौकशीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली 
 सामाजिक कार्यकर्ते महादेवराव हरिभाऊ ताटके वय 50 वर्ष राहणार मंगरूळपीर  यांनी तक्रारीत नमूद  केले की ते समाज सेवक आहेत त्यांची आमदार राजेंद्र पाटणी रा - वाशिम  यांच्यासोबत ओळख झाली आमदार पाटणी यांनी 3 डिसेंबर  2016 ला महाराष्ट्र शासनाचे 25/15 च्या  निधीतून 1 कोटी रुपये काम देतो त्यासाठी मुखयमंत्र्याना 10 लाख रुपये कमिशन द्यावे लागणार असे सांगून 10  लाख रुपये घेतले कामाची मान्यता मिळवून देण्यासाठी   जानेवारी महिन्यात 2017 ला मुंबई येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली आमदार पाटणी गुंड प्रवृत्ती चे  असून राजकारणी आमदार आहेत शासनदरबारी त्यांचा मोठा दबदबा आहे  त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा ताटके यांनी आरोप केला आहे पोलिसांनी तक्रार चौकशीत ठेवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे  घटनेमागची सत्यता तपासण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे 
सम्राट टाइम्स न्यूज

नितीन आगे जातीय द्वेषातून झालेले हत्याकांड - मिलिंद सुर्वे




नफ च्या वतीने जिल्हाभरात एकदिवशीय धरणे आंदोलन
नितीन आगे जातीय द्वेषातून झालेले हत्याकांड - मिलिंद सुर्वे
वाशीम - राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) च्या वतीने जिल्हयातील वाशीम, कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव  या तालूक्यातील आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्यात अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जातीवर होणार्‍या अन्याय अत्याचार आणि असंविधानिक शोषणाविरुद्ध 15 डिसेंबर रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
     निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्रात मागील काही वर्षात नि. जाती/ नऊ.जमाती, भटक्या विमुक्त जमाती यांच्यावर तसेच यांच्यातील सरकारी कर्मचारी तसेच महिला यांच्यावर सतत अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देशात दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये 2011 ते 2 सप्टेंबर 2017 या सहा वर्षात 14971 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. यापैकी 60 टक्के घटनांच्या तक्रारीची नोंदही होत नसल्याचे दिसून येते. यामध्ये मनोज कसाब जालना, माणिक उदागे पुणे, प्रियांका भोतमांगे खैरलांजी, सागर शेजवळ शिर्डी अशा एकूण 11 गंभीर घटना नमूद केल्या आहेत.
     जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान बोलतांना नफचे जिल्हाध्यक्ष मिलींद सूर्वे म्हणाले की, नितीन आगे हत्याकांड हे जातीय द्वेषातून झालेले आहे. 28 एप्रिल 2014 रोजी नितिन आगे यांना कॉलेजमधून बाहेर काढून कॉलेजच्या आवारात समाज कंटकाकडून जिवघेणी मारहाण करण्यात आली. त्याच्या मारहाणीचे साक्षीदार असंख्य विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे अन्य कर्मचारी होते. 23 नोव्हेंबर 2017 रोजी या निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा मनाला चिड आणणारा निकाल लागला. या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटलेच कसे ? असा सवाल निवेदनाव्दारे सरकारला विचारण्यात आला आहे.
    जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या एकदिवशीय धरणे आंदोलनात नफ जिल्हाध्यक्ष मिलिंद सुर्वे, तालुका अध्यक्ष रवी तायडे, रिसोड तालूका अध्यक्ष गौतम वाकुडे, मालेगाव तालुका अध्यक्ष नारायण पडघन, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष आनंद इंगोले, कारंजा तालुका अध्यक्ष दिनकर ठोके, मानोरा तालुका अध्यक्ष धर्मा सावळे, डॉ. रवी जाधव, भालेराव पाटील, प्रेमानंद आरखराव, धनंजय कांबळे, अजय सावळे, रवी अवताडे, निलेश तायडे, विशवनाथ इंगोले, दत्तराव वानखडे, भारत कांबळे, रमेश अंभोरे, लक्ष्मीबाई शेताणें, कायबाई पारस्कर, गीताबाई डोंगरे, प्रवीण पट्टेबहादूर, गणेश घुगे, विकास कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सम्राट टाईम्स

राणी लक्ष्मीबाई शाळेत खरी कमाई सप्ताह उत्साहात संपन्न


सम्राट टाइम्स न्यूज
 आपणही दैनंदिन आवश्यक वस्तुंची निर्मीती करुन त्या विकुन चार पैसे कमावु शकतो , व आर्थिक स्वयंपुर्ण होउ शकतो, हे व्यावहारीक ज्ञान मिळावे म्हणुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत स्काऊट गाईडच्या वतीने खरी कमाईचे आयोजन करण्यात आले होते. दि. ११ ते १६ डीसेंबर  पर्यंत वर्ग ९  व  १० च्या विद्यार्थीनींनी आपली व्यावसायीक कला वृद्धिंगत केली.

यानिमीत्ताने व्यवहाराची जाणीव होणे ,वृद्धांची सेवा , परीसर स्वच्छता , वृक्ष संगोपन अशा कामांची जाणीव करुन देण्यात आली. विवीध घरगुती खाद्य पदार्थांची मधल्या सुट्टीत ७  ते  १० च्या विद्यार्थीनींना  विक्री करण्यात आली .

  सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी यांनी केले . याप्रसंगी उपमुख्याध्यापक सुरेश खरावन , पर्यवेक्षिका शिला वजीरे उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आयोजन गाईड विभाग प्रमुख शिक्षीका मंजुषा ठाकुर , सुनीता कुळकर्णी , योगीनी काळु , गीता यादव यांच्या मार्गदर्शनात झाले. या सप्ताहात सर्व शिक्षक , शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी पुरेपुर आनंद घेतला .
सम्राट टाइम्स न्यूज

खा. सातव यांच्यावरील हल्ल्याचा अ.भा. माळी महासंघाने केला निषेध


वाशीम - महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते व हिंगोलीचे कॉग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरात मधील मोर्चामध्ये पोलीसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा शाखेच्या वतीन तिव्र निषेध करण्यात आला असून या हल्ल्याच्या चौकशीची मागणी संघटनेचे केली आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे यांच्या नेतृत्वात 16 डिसेंबर रोजी यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
    हिंगोली लोकसभेचे आमदार राजीव सातव यांच्यावर 3 डिसेंबर रोजी गुजरात येथील राजकोटमध्ये पोलीसांनी अमानुषरित्या केलेला हल्ला हा संसदेच्या लोकप्रतिनिधीवर झालेला हल्ला आहे. हा लोकशाहीचा अपमान असून शासनाच्या या दहशतवादी धोरणाचा निवेदनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला आहे. तसेच या घटनेची चौकशीसाठी समिती गठीत करुन याची सखोल चौकशी करण्याची मागणीही महासंघाने केली आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, नागेश काळे, सौ. किरण गिर्‍हे, डॉ. रवी जाधव,  शंकर वानखेडे, अशोक पखाले, अरविंद उल्हामाले, अतुल इंगोले, कुंडलीक इंगोले, सौ. शर्मिला वानखेडे, मेघा इंगळे, सुनिल जाधव, गोपाल जाधव, देविदास वानखडे, मिरा ढगे, गजानन ठेंगडे, कृष्णा इंगळे, नितीन जाधव, प्रविण जाधव, दिपक मोरे, डॉ. विजय कानडे, चेतन इंगोले, अमोल इंगोले,  पांडुरंग वाठ, सुरेश गाभणे, विशाल भांदुर्गे, सुनिता जाधव, रामप्रभु सोनोने, गोविंद इंगोले, नारायण ठेंगडे, दिपक ठेंगडे, दिलीप जाधव, वैभव कडवे, ज्ञानेश्वर जाधव, मंगेश भालेराव, शैलेश सारसकर, अक्षय सुरुशे, रुपेश भोसले, उमेश भांदुर्गे, प्रशांत भडके, गोपाल जाधव, नितीन जाधव, अमर जाधव, देविदास वानखेडे, अमोल सुरुशे, सुनिल जाधव, महादेव सातव, गजानन पावडे, सतिश खंडारे, शुभम कंकाळ, अमोल इंगोलकर, ईश्वर ढगे, बालाजी कदम, कैलास इंगोले, सतीष वानखडे, देवा वानखेडे, बाळु जाधव, मयुर नंदनकर, गजानन भांदुर्गे, गजानन हिरे, रवी वानखेडे, भाग्यवंत वानखेडे, किशोर इंगोले, शुभम काळमुंदळे, शेख नासीर, गणेश धुळे, विजय चोपडे, पंकज गोटे, रामकिसन जाधव, दिपक भांदुर्गे, विशाल गाभणे, उमेश मोहळे, महादेव हरकळ, अमोल सारसकर, विठ्ठल इंगोले, गजानन इंगोले, भागवत वानखडे, सै. शेख, जुबेरभाई, अलीमभाई, अजय रणखांब, दिपक खोटे, महादेव सरनाईक, दिपक राऊत, वैभव सरनाईक आदींच्या सह्या आहेत.
--------------------------------------------
सम्राट टाईम्स 

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे संकट गंभीर :प्रशासन सरकारची दिशाभुल आहे -किशोर तिवारी



सम्राट टाइम्स न्यूज
राज्यात विदर्भ मराठवाड्यातील कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून ऑक्टोबर नंतर सर्वच  ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे सत्य आहे त्यामुळे आता डिसेंबरनंतर कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर करीत कापसाला पाणी दिले त्यासर्वच शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला असुन जुलै ऑगस्ट मध्ये आलेली बोंड तेही बहुतेक कोरडवाहू क्षेत्रात ऑक्टोबर नोव्हेंबर फुटली व सर्वच शेतकऱ्यांचे पहिला व दुसरा वेचा चांगला आला ,त्या कापसाची आवक पाहुन बोंडअळीचे संकट कृषिविभाग कमी आखत असुन सरकारची दिशाभुल करीत असल्याचा गंभीर आरोप कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे . 

यावर्षी महाराष्टात व लगतच्या तेलंगणामध्ये सप्टेंबर -ऑक्टोबर  महिन्यात बोंडअळी संकट आले व आज राज्यात जेमतेम ९८ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे मात्र आपण संपुर्ण विदर्भ मराठवाड्याचा दौरा केल्यांनतर शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असा प्राथमिक अंदाज दिला होता त्यानुसार सर्वच भागांतून कापसाची आवक डिसेंबरमध्ये घटली असुन बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट करून गहु हरभऱ्याची पेरणी केली आहे मात्र कृषी विभागाचे अधिकारी फक्त कार्यालयात बसल्याबसल्या पिकांचे पंचनामे करीत असल्याच्या प्रचंड तक्रारी आपणास मिळाल्या असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली . 

या खरीप हंगामात  सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र गुलाबी बोंडअळीने हे कापसाचे उत्पादन १८० ते २२० लाख क्विंटलच्या घरात आणले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु दहा हजार कोटीचे नुकसान झाले आहे मात्र कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर  कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली कारण सध्या ५ लाखावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी दिल्या आहेत तर सुमारे ५ लाखावर आदीवासी दलीत मागासवर्गीय भूमिहीन शेतकरी बियाणाची पावती व  बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट असल्यामुळे तसेच हजारो शेतकऱ्यांनी बोगस तण नाशक निरोधक बी जि ३ कापसाचे बियाणे व राज्यात बंदी घातलेले राशी ६९५ लगतच्या राज्यातुन विकत आणुन पेरल्यामुळे तक्रारी करण्यापासुन वंचित असल्याचे सत्य विदर्भ मराठवाड्यात आपल्याला दौऱ्यात दिसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .एकीकडे  सरकार  कुठलीही बियाणे कंपनी असो, गुन्हे दाखल होतील असा दावा करीत आहे  दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकारी बियाणे कंपन्यांचे हित जोपासत असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी केला आहे . 

यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीला गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेले संकट आता   संपुर्ण विदर्भ व  मराठवाड्यात ,मध्यप्रदेश ,गुजरात राज्यात पसरले आहे यात महाराष्ट्राच्या कापुस उत्पादक क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले असुन मात्र कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांनी ह्या अभुतपुर्व संकटावर पुरेसे लक्ष न दिल्यामुळे  विदर्भ व  मराठवाड्यातील सुमारे ७० लाखावर कापुस उत्पादक शेतकरी  दशकातील सर्वात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्यामुळे


कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनने गुलाबी  बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात लावून धरला असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ,गुलाबी  बोंडअळीच्या संकटातुन कायम सुटका यासाठी सर्व स्तरावर पाठपुरावा सुरु केला असुन या बोंडअळीच्या प्रकोप टाळण्यासाठी कालबद्ध पंचसूत्री तोडगा शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे . 

आपल्या पंचसूत्री बोंडअळी समस्या निवारण कार्यक्रमात किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्याना सादर केलेल्या अहवालात कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या गुलाबी  बोंडअळीच्या संकटाला सुरवातीला सरकारने भारतातील देशी कापसाचे बियाणाच्या जागी  आणलेले अमेरीकेचे  संकरीत कापसाचे बियाणेच मूळ कारण असुन व  आता बी टी कापसाचे "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळी मारण्यास  यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने पूर्णपणे खल्लास झाले आहे . 

आपल्या पंचसुत्रीमध्ये सादर   केलेल्या प्रस्तावात किशोर तिवारी यांनी सरकारला शेतकऱ्यांचे गुलाबी  अळी यांचा संकटाचा सामना करण्याकरितां प्रबोधनाची मोहीम सुरु करण्याचा व या संकटाचे मूळ कारण आता निवारण करण्याकरीता उपाययोजना ,नुकसान भरपाईसाठी कारवाईची संपुर्ण माहीती त्यासाठी कृषी ,ग्रामविकास व महसुल विभागाचा सहभाग ,कापसाचे गुलाबी अळीग्रस्त पीकामध्ये उभे पीक  गाई म्हशी बैलांना वा बकऱ्याना चारणे त्यामुळे अळीचा सरसकट नाश  होईल ,उरलेले कापसाचे पीक नष्ट करणे ,जमिनीमधील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे ,कापसाचे पीक डिसेंबर नंतर फरतड न घेता काढून फेकणे ,मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे ,कापसाचे पीक यावर्षी  गुलाबी अळीग्रस्त झाले असल्यास पुढच्या वर्षी  डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे,बियाणे कंपन्या विरुद्धचा सामुहिक नुकसान भरपाईचा दावा सादर करावयाचा असल्यामुळे तक्रारी  दाखल करणे गरजेचे असुन त्यासाठी शेतकऱ्यांना संपुर्ण माहिती देणे ,अमेरीकेचे कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी भारतीय सरळ वाणाच्या कापसाचा पेरा करणे एकमेव उपाय कापुस उत्पादक शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ यांना कामावर लावणे गरजेचे असुन विदेशी बियाणे कीटकनाशक कंपन्याचे कृषि क्षेत्रातील साम्राज्य संपण्याचा निर्वाणीचा सल्ला  किशोर तिवारी यांनी दिला आहे .
सम्राट टाइम्स न्यूज

कारंजा येथे धरणे आंदोलन

              कारंजा-" राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ति ( नफ ) " या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संघटनेच्या वतीने ,संपूर्ण महाराष्ट्रराज्यात एक दिवसीय धरने आंदोलन .कारंजा दि १५ डिसेम्बर २०१७ रोज शुक्रवार वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत  कारंजा तहसील कार्यालयाच्या आवारात  , अमोल पाढेन सर , संजय दुमने सर यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये नगर जिल्ह्यातील ता जामखेड़ मौजे खेरडा येथील नितिन आगे या शालेय हुशार विद्यार्थ्यांची निर्घ्रुण हत्या करण्यात आली. या खून खटल्याचा निकाल दि २३ नोहेम्बर २०१७ रोजी लागला . त्यातील सर्व आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली . हे महाराष्ट्र सरकारचे  , प्रशासन यन्त्रनेचे व न्याय वेवस्थेचे अपयश आहे. भरदिवसा नितिन आगेचा खून झाला तरी सर्व आरोपी निर्दोष कसे सूटले ? याचा निषेध म्हणून , तहसील कार्यालयाच्या आवारात संध्याकाळी ०५.०० या वेळात एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले .व मोठ्या संखेने  उपस्तिथ असलेल्या कार्यकर्त्यांनी मा. सचिन पाटिल , तहसीलदार कारंजा यांना झालेल्या घटनेचे निषेध म्हणून निवेदन देण्यात आले

दामोधर जोंधळे,कारंजा,सम्राट टाईम्स लाईव्ह

लाचखोर कार्यक्रम अधिकारी एसीबी च्या जाळ्यात


सम्राट टाइम्स टाइम्स 
वाशिम जिल्हातील  मानोरा पंचायत समितीत  सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विद्युत सुखदेव गवळी वय 32 वर्ष  यांनारोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर असलेल्या  शेततळ्याचे अनुदान काढण्यासाठी 5000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहात पकडल्याची कार्यवाही  दि 15 डिसेंबरला केली 
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालयात तक्रार दिली की ते ग्राम रोजगार सेवक असून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत त्यांचे गावातील मंजूर असलेल्या शेततळयाचे मंजूर अनुदानापैकी उर्वरित अनुदान रक्कमेची मागणीकरिता फाईल तयार करून पंचायत समिती मानोरा येथे डिमांड दाखल केली सादर डिमांड रक्कम काढण्यासाठी  सहायक कार्यक्रम अधिकारी विद्युत गवळी यांना भेटले असता त्यांनी अनुदान काढण्यासाठी तक्रारदाराला 5000 रुपये लाचेची मागणी केली  याबाबतची  तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालयात केली सदर तक्रारीवरून एसीबी ने दि 14 डिसेंबर ला  पंचासमक्ष  पडताळणी केली असता  गवळी यांनी 5000 रुपये लाचेची मागणी केल्याचे  निष्पन्न झाले दि 15 डिसेंबरला 5000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना एसीबी ने गवळी यांना  रंगेहाथ अटक केली मानोरा पोलीस स्टेशन येथे लाचखोर गवळी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३ (२) ला.प्र. का.१९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला 

सदर कार्यवाही श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक,नाशिकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक लाप्रवी अमरावती,आर व्ही गांगुर्डे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बोर्हाड आणि त्यांच्या पथकाने केली
सम्राट टाइम्स न्यूज

विद्यार्थ्यांकरीता "चमत्कारामागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.





विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा......

माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे, यांचे वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर द्वारा विद्यार्थ्यांकरीता "चमत्कारामागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.*

मंगरूळपीर: 

           येथिल यशवंतराव चव्हाण विद्यालयात आयोजित वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावरील व्याख्यानाचे कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ यांनी वरील प्रतीपादन केले.

 मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालयात विविध खेळ स्पर्धा, उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकासाकरीता अंधश्रद्धा निर्मुलन याअंतर्गत "चमत्कारांमागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुडके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक आगरकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशिम जिल्हाध्यक्ष नाना देवळे व अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ, (शिक्षक, संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, मंगरूळपीर) हे होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महान विज्ञाननिष्ठ संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले.
           
अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे अभ्यासक, तथा विविध शाळा महाविद्यालये, शिबीरे व गावागावांत जाहीर व्याख्यानांचे माध्यमातुन समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य, प्रचार-प्रसार करणारे कार्यकर्ते, वक्ते नाना देवळे व नीलेश मिसाळ यांनी त्यांच्या  प्रभावी, परखड, सुस्पष्ट, भारदस्त व अभ्यासपुर्ण वक्तृत्वशैलीतून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत "चमत्कारामागिल विज्ञान" विषयाअंतर्गत अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धांचे प्रकार, व्याप्ती, त्यांचे परीणाम, अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे काय? भुत व भुताचे मानसशास्त्र., भानामती-करणी करता येते काय? त्यामागील रहस्य, फलजोतिष्य किती खरे किती खोटे? संत चमत्कार आणि बुवाबाजी, जादुटोणा-चमत्कारांमागील विज्ञान, बुद्धिप्रामाण्यवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन, संतचमत्कार, विविध चमत्कार प्रयोगांचे सादरीकरण व त्यामागिल वैज्ञानिक कारणमिमांसा सांगितली. यांत तांदूळ-गडवा, अगरबत्ती फिरणे, जळता कापूर खाणे, पाण्याची फूले करणे, मंत्राने होम पेटविणे, तांदूळ-गडवा, लिंबातून रक्त येणे, नारळातून काळा कपडा, सूया, काढणे, चुन्याचा गूलाल करणे, पाण्यावर दिवा लावणे, केळाचे काप होणे, काडी कापड कौल,इ. यांसारख्या विविध चमत्कारांचे सादरीकरण करीत त्यांमागिल विज्ञान, वैज्ञानिक कारणे सांगितली. तसेच महाराष्ट्र शासनाचा ' जादुटोणा विरोधी कायदा' या बाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना कायद्याची माहीती, भुमिका, पार्श्वभुमी, कलमे, व्याप्ती, मर्यादा, अनुसुची, यांसह कायद्याचा योग्य वापर, ई. विषयांवर सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. व कायद्याची उपयुक्तता, आवश्यकता व महत्व प्रतिपादीत केले. रामरहीम, आसाराम यांसारख्या ढोंगी बुवा-बापुंपासून जनतेने सावध रहावे. प्रामूख्याने महीलांनाच हे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत असतात व त्यांना आपली शिकार बनवतात. त्यांना समाजातील महीलांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. 

      " करणी, भानामती— मुठ, विज्ञान सांगते सारेच झुठ ". अंधश्रद्धा - समाजाला लागलेली कीड असून त्यापासून संपुर्ण समाज मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन ही काळाची गरज आहे. जनतेच्या हीताचा व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा हा क्रांतीकारी कायदा शासनाने आणला. या कायद्याबाबत जनजागृती व प्रचार—प्रसार व्यापक व मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कायद्यामूळे जनतेचे शोषण थांबेल व बुद्धीप्रामाण्यवादी समाजाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन केले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(H) नुसार वैज्ञानिक दृष्टोकोन बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या 10 गाभाभूत घटकांमध्येही वैज्ञानिक दृष्टीकोन हा एक महत्वाचा घटक आहे.  विद्यार्थी  हा समाजाचा महत्वाचा घटक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये बूद्धीप्रामाण्यवाद रूजविणे, विद्यार्थ्याचे माध्यमातून भविष्यात बुद्धीप्रामाण्यवादी, निकोप समाज निर्माण होऊन अंधश्रद्धा मुक्त समाज घडवणे हे आपले कर्तव्य आहे. आपला समाज अंधश्रद्धेच्या खोल खाईत रुतलेला आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी संतांनी व समाजप्रबोधकांनी खूप प्रयत्न केले, अजूनही सुरू आहेत. पण, सामान्य जनतेच्या श्रद्धेचा फायदा घेवून जनतेचे शोषण करणारे ढोंगी साधू हे संत नसून जंत आहेत. त्यांचा नायनाट करणे आपली प्रमूख जबाबदारी आहे. महीलांनी स्वत: विवेकवादी होवून आपल्या मुलाबाळांनाही बुद्धीप्रामाण्यवादी बनवावे, असे मत प्रमुख वक्त्ते नाना देवळे व निलेश मिसाळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले.यावेळी अभाअंनिसचे मंगरुळपीर तालूकाध्यक्ष फुलचंद भगत हे ऊपस्थीत होते.
प्रमूख अतिथी शाळेचे जेष्ठ शिक्षक आगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुडके यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे संचलन कु. स्नेहल आडे तर आभार प्रदर्शन कु. अंशु वाघमारे या विद्यार्थीनींनी केले.
 सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता या कार्यक्रमाचे आयोजन प्रमूख शिक्षक महेंद्र हिवराळे, व इतर शिक्षक  विटकरे, इंगोले, राऊत, पोहाणे, तायडे, पाटील, फूके, ठाकरे, कटारे, कु.तलवारे, कु. रघुवंशी, कु. इंगोले, कु. देशमुख,  सोमकांत पाटील,अरूण गाढवे, नारायण शेळके, बापूराव मोटे, व शिवम ठाकरे व इतर सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. 

सम्राट टाईम्स लाईव्ह                                                  फुलचंद भगत मो.9763007835

मुस्लीम गवळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांना निवेदन



प्रतिनिधी | कारंजा (लाड)

महाराष्ट्र मुस्लीम गवळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता नागपूर विधानभवन येथे अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे समन्वयक जुम्मा प्यारेवाले व संघटनेच्या पदाधिकार्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दि.१५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. 

         निवेदनात नमूद केले आहे कि, महाराष्ट्रात मुस्लीम गवळी समाज वंशपरंपरेने गायी पालन, दुग्ध व्यवसाय करणारा असुन राज्यातील विविध भागात भटकंती करत वसलेला आहे. सदर समाज राज्यात भटक्या जमातीत समावेश असुन शैक्षणीक, सामाजीक व आर्थिक द्रुष्ट्या अतिशय मागासलेला असुन या घटकाला समाजातील मुख्य प्रवाहात शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक द्रुष्ट्या आणण्यासाठी खालील बाबींची पुर्तता होणे आवश्यक आहे. राज्य मागसवर्ग आयोगाने शासनाकडे सादर केलेल्या राज्य मागासवर्ग आयोग अहवाल क्र. 49 बाबत मुस्लिम गवळी वंशपरंपरेने व्यवसाय करणारा असल्यामुळे मुस्लिम गवळी समाजाची नाॅन क्रिमीलेअर ची जाचक अट रद्द करावी. राष्ट्रीय स्तरावर स्थापन झालेल्या ओबीसी विभाजन आयोगाला राज्य शासनाकडुन मुस्लिम गवळी या भटक्या जमातीला अतिमागास प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस करावी.मुस्लिम गवळी समाज भटका असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात शासनाच्या विविध जागेवर गेल्या कित्येक वर्षापासुन वास्तव्य करित असुन त्यांना शासनाच्या धोरणानुसार महसुली जागेचा मालकी हक्क देण्याबाबत कार्यवाही करावी. मुस्लिम गवळी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आधुनिक वाचनालय निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. सदर समाज क्रिडाप्रेमी असुन परंपरागत कुस्ती व इतर खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आधुनिक व जागतीक स्तराचे व्यायामशाळा या समाजातील वास्तव्य असलेल्या भागामध्ये निर्माण करावे. मुस्लिम गवळी समाजासाठी पोलीस भर्ती पुर्व प्रशिक्षण आयोजित करावे. सदर समाजाच्या युवकासाठी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी तयारीसाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे प्रशिक्षण आयोजित करावे.
सदर समाजाचा एक प्रतिनिधी विमुक्त व भटक्या जाती आर्थिक विकास महामंडळावर घेण्यात यावा. वरील विविध मागण्याबाबत सहानुभुतीपुर्वक विचार करून या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी वरील मागण्या मान्य करावी  अशी विनंती करण्यात आली.तसेच सदर नेवेदन मृद,जलसंधारण,राजशिष्टाचार,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांना  हि  देण्यात आल्याची माहिती वाशिम जिल्हाध्यक्ष ताज पप्पुवाले यांनी दिली आहे.  

सम्राट टाईम्स 

सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे नागरिकांची दमछाक


कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम  कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. दि. १४ डिसेंबर रोजी धोत्रा देशमुख येथील ग्रामस्थ काही कामास्तव बांधकाम विभाग कार्यालय कारंजा येथे गेले असता तेथे अधिकारी हजार नव्हते त्यामुळे त्याना आल्या पावली परत येणे भाग पडले. लाडेगाव ते धोत्रा देशमुख ह्या रस्त्याची तक्रार घेऊन देशमुख, मेश्राम व हुमणे हे ग्रामस्थ भारिप बहुजन महासंगचे  जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यालयीन वेळेत गेले असता तेथे कोणताही अधिकारी हजर नव्हते . त्यामुळे संबाधीत कामानिमित्त गेले असता त्या संबधी कोणाकडे बोलणी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. असेच अनेक वेळा ग्रामस्थांना परत येण्याची पाळी येते. शासकीय अधिकाऱ्यांना त्याच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहण्यापेक्षा त्यांचे वयक्तिक कामे जास्त महत्वाची वाटतात असे ग्रामस्थ बोलत होते. तसेच कामरगाव ते बेंबळा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागाने त्यावरील गड्यावर चुन्याने खुणा मारून ठेवल्या पण ते खड्डे  बुजवण्याचे काम अद्याप सुरु झाले नाही. याचा अर्थ असा कि, शासकीय कर्मचाऱ्यांना आपले काम करण्यास काहीच रुची वाटत नाही असे निष्पन्न होते.  
विनोद नंदागवळी 
. ९६७३९५४५१६

कामरगाव येथे अवैध वाहतुकीचा धुमाकूळ ठाणेदाराचे दुर्लक्ष


कारंजा तालुक्यातील नामांकित गाव म्हणून कामरगाव आहे. परंतु कामरगाव येथे अवैधरित्या वाहतूक चालू आहे. त्यामध्ये ऑटो रिक्षा , मोटार गाड्या , ट्रॅव्हल्स, या वाहनांची अवैध वाहतूक चालू आहे. बुधवार येथील आठवडी  बाजाराचा दिवस आहे. त्या दिवशी लोक खेड्यावरून ऑटो ने बाजाराला येतात. पण ते त्या ऑटोमध्ये लटकून येतात. यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. ऑटोचालक आपल्या फायद्यासाठी जनतेच्या जीविताशी खेळत आहेत. परंतु याकडे ठाणेदार साहेब जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी बस स्टॅण्डवर ट्राफिक पोलीस  हजर असताना सुद्धा ऑटोचालक भरगच्च ऑटो भरून लोक  नेत असतात तरी सुद्धा पोलीस काहीच बोलत नाहीत याचे नेमके कारण काय याचे उत्तर कुणाकडेच भेटत नाहीये . यावर शासनाचे व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पण हि बाब जनतेच्या जीवावर बेतणारी आहे. याचे भान ठेवायला हवे. 
विनोद नंदागवळी कामरगाव
 मो. ९६७३९५४५१६

मंत्री होणे सोपे असतं पण गोपीनाथ मुंडें सारखे लोकनेता होणे कठीण - ना. महादेव जानकर


वाशिम - महाराष्ट्रात जे सरकार आले ते बहुजन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आले हे कोणीही विसरु नये. मंत्री होणे सोपे असते मात्र लोकनेत होणे खुप कठीण असते. गोपीनाथ मुंडे हे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते आहेत असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले.
    लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरण समितीच्या वतीने मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्यावेळी. ना. जानकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांनी केले. व्यासपीठावर जि.प. सभापती विश्वनाथ सानप, उपविभागीय अधिकारी अभिजीत देशमुख, समाजकल्याण उपायुक्त सुनिल वारे, डॉ. सुभाष मुसळे, मालेगावचे तहसिलदार राजेश वझीरे, डॉ. जयश्री गुट्टे, डॉ. चंद्रकांत घुगे, देविदास गिते, डॉ. ज्ञानेश्वर नागरे, समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे, जि.प. सदस्या सौ. रत्नप्रभा घुगे, जि.प. सदस्य जगदीश घुगे, पं.स. सदस्य वसंतराव मुसळे, देविदास गिते, पं.स. सदस्य नंदु घुगे, माणिकराव गंगावणे, आसाराम जायभाये आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिप प्रज्वलन व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनपर कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या किर्तनातून त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, वृक्ष लावा वृक्ष जगवा, व्यसनमुक्ती, पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, स्वच्छता, शौचालय आदी विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्यपाल महाराजांनी लहान मुलांना संस्कारीक पुस्तके व संत गाडगे बाबांची पुस्तके वितरीत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिलीप जोशी यांनी केले. आपल्या भाषणातून बोलतांना महादेव जानकर म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर.आर. पाटील यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची अपरिमीत हानी झाली  असून देशाचे सुध्दा नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केल्याची माहिती ना. जानकर यांनी दिली. स्व. मुंडे यांचे कार्य सदोदीत पुढे सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही ना. जानकर यांनी दिली. प्रबोधन कार्यक्रमाला जिल्हाभरातून बहूजन समाजातील नागरीक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

सम्राट टाइम्स न्यूज

पिंप्रीमध्ये अडाण नदीवर बलून बंधारा करण्याची मागणी



पिंप्री,खरबी,मसोला,पिंपळखूटा धोत्रा वासीयांची मागणी

मंगरूळपीर, दि. १५ 
                    यामुळे १२०० ते १५०० हेक्टर शेतजमिन बारामाही ओलीताखाली येवून ४-५ गावे दुष्काळ मुक्त करण्याकरिता मौजे पिंप्री शेत शिवारात अडाण नदीवर "बलून बंधारा" उभारावा. अशा आशयाचे निवेदन ग्राम पिंप्री, खरबी, मसोला, पिंपळखूटा, धोत्रा ग्रामवासियांनी आज दि. १५ रोजी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ यांना दिले. 
               निवेदनात नमुद केल्या प्रमाणे, मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पिंपळखूटा, मसोला, खरबी, पिंप्री धोत्रा, गणेशपुर या गावातीलशेत शिवारातून वाहते. या गावात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी अडाण नदीवर अवलंबून राहावे. लागते. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाते. तसेच शेतात पाणी शिरून शेतजमिनीचे व पिकाचे अतोनात नुकसान होते. जानेवारी महिण्यापासून या गावात पाणी टंचाईच्या झळा पोहचतात. म्हणून पिंप्री शेत शिवारात अडाण नदीवर नव्याने निर्माण होणाऱ्या "बलून बंधारा" उभारण्यात आल्यास अंदाजे १२०० ते १५०० हेक्टर शेतजमीन बारामाही सिंचनाखाली येवू शकते. तसेच ही गावे कायम स्वरूपी दुष्काळमुक्त होवू शकतात. यामुळे चार हजार नागरीकांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघून दिलासा मिळू शकतो. 
                     निवेदनावर जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, पिंप्री- खरबी सरपंच पुरूषोत्तम ठाकरे, मसोला बु. सरपंच अनिल मुळे, पिंपळखूटा सरपंचा चंदाताई धोटे धोत्रा- गणेशपुर सरपंच राजेंद्र राऊत तसेच पिंप्री-खरबी येथील श्रीराम ठाकरे, देवीदास कांबळे, मुरलीधर ठाकरे, गौतम सोनोने, समाधान ठाकरे मसोला बु. येथील मधुकर मुळे, प्रकाश मुळे, राजेश खाडे, बाबाराव मुळे, भास्कर मुळे, रामेश्वर मुळे, रमेश मुळे पिंपळखूटा येथील भास्कर धोटे, मनोहर परंडे, प्रकाश परंडे धोत्रा येथील किशोर राऊत भगवान भगत, शंकर घाटे ह्यांच्या स्वाक्षऱ्या असून ते उपस्थित होते.  
निवेदनाच्या प्रतिलीपी केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, आ. लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना पाठविण्यात आल्या. 

______________________________

"बलून बंधारा" या जागी उत्तमरित्या यशस्वी होईल   
-- कुळकर्णी

अडाण नदीवर या ठिकाणी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र शासनाने पूर्वीच निर्गमीत केले आहे. त्यामुळे या ठिकाणी तांत्रीकदृष्ट्या "बलून बंधारा" पूर्णपणे यशस्वी होवू ही गावे "पाणीदार" होवू शकतात. तसेच सिंचनाचा अनुशेष दूर होण्यास मदत होईल. असे मत जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी व्यक्त केले.                                                                                       फुलचंद भगत मो.9763007835
__सम्राट टाईम्स लाईव्ह____________________________

मुसळे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल नोंदवावेत अन्यथा आंदोलन-बसपाचा इशारा

                                   मंगरूळपीर येथील शासकिय वस्तीगृहातील 'विद्यार्थी ऊपाशी' प्रकरण                                                                   पालकमंञ्यांनी लक्ष देन्याची गरज                                                                            मंगरुळपीर-येथील समाजकल्याण विभागाअंतर्गतच्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील मुलांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी येवुनसुध्दा दोन दिवस विद्यार्थ्यांना दोन वेळा ऊपाशी ठेवले त्यामुळे हा प्रकार जातीय भावनेतुन केला असल्याने समाजकल्यानचे सहाय्यक आयुक्त ए.व्हि.मूसळे यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचेवर अनू.जाती जमाती प्रतिबंधक कायदा,मानवाधिकाराचे हनन व दप्तर दिरंगाईनुसार गुन्हे दाखल करावेत अन्यथा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करन्याचा इशारा बहूजन समाज पार्टीच्या वतीने लेखी निवेदनाव्दारे देन्यात आला आहे.                                                                                          मंगरुळपीर शहरालगतच्याच तुळजापुर येथील मागासवर्गीय मूलांच्या शासकिय वस्तीगृहातील मुलांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी येवुन तसेच सदर वस्तीगृहात वाशिमचे आमदार लखन मलिक यांचेसह मंगरुळपीर न.प.चे शिक्षण सभापती अनिल गावंडे,भारिपचे मंगरुळपीर तालुकाध्यक्ष शंकरदादा तायडे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब मूसळे यांच्या लक्षात आणून देवूनसुध्दा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त ए.व्हि.मुसळे यांचे जातीय भावनेतुन दि.१०नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१७ या कालावधित या शासकिय वस्तीगृहातील  विद्यार्थ्यांना दोनवेळा ऊपाशी राहावे लागले ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असुन मानवाधिकाराचे ऊल्लंघन आहे याकरिता मुसळे हेच अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार्‍या मूसळे यांना तात्काळ निलंबित करुन अनू.जाती जमाती प्रतिबंधक कायदा,मानवाधिकाराचे हनन व दप्तर दिरंगाई नुसार गुन्हे दाखल करावेत अन्यथा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करन्याचा इशारा बसपाच्या वतीने लेखी निवेदनाव्दारे देन्यात आला आहे.सदर निवेदनावर बसपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश वानखडे,जिल्हा ऊपाध्यक्ष राहूलदेव मनवर,देवानंद मोरे,मोहन खिराडे,संजय गायकवाड,भारत सावळे,कैलास कांबळे,विजय पाटोळे,समाधान पाटोळे,संतोष सावके,विष्णू सरकटे,अनिल सरकटे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.                      सम्राट टाईम्स लाईव्ह

राज्यातील OBC, SC, VJNT, SBC व Mainority विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी...





*राज्यातील OBC, SC, VJNT, SBC व Mainority  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी...* - वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद,महाराष्ट्र राज्य.

वाशीम :  समाजातील शेवटच्या सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून माध्यमिक, उच्च माध्यमिक मागास प्रवर्गातील (OBC, SC, VJNT, SBC व Mainority) च्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु *सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या तीन वर्षातील शिष्यवृत्ती तसेच फ्रि-शीप ची रक्कम विद्यार्थ्यांना आजतागायत मिळालेली नाही.* हे अतिशय दुर्दैवी  आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकारची सध्याची धोरणं पाहता हा प्रकार अत्यंत भयानक व लाजीरवाणा आहे. यामुळे बहुजन समाजाची मुले शिक्षणापासून दुर ठेवण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला जात आहे.
      *मा. मुख्यमंत्री व राज्य सरकारने* या घटनेची गंभीर दखल घेऊन सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या तीन वर्षातील राज्यातील शिष्यवृत्ती तसेच फ्रि-शीप ची संपुर्ण *OBC, SC, VJNT, SBC व Mainority च्या विद्यार्थ्यांना तात्काळ द्यावी...* अशी सरकारकडे मागणी करण्यात आली. आज मागणी'चे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले. जर तात्काळ निर्णय घेतला नाही तर... वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद २७ डिसेंबर पासून तिव्र आंदोलन करणार आहे. तरी सरकारने या विषयाची गंभीर दखल घ्यावी. 
        यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी,तालुका सचिव रवि मोपकर, आकाश शिंदे, अजय वानखेडे,भागवत शिंदे, नितेश मोपकर, अमोल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सम्राट टाईम्स 

वाशीम जिल्हातील खेळाडुंना आॅलम्पिक स्पर्धेत धावण्याची सुवर्ण संधी.


नॅशनल युवा को आपरेटीव्ह सोसायटी अंतर्गत आगामी २०२० मध्ये जपान मधील टोकियो शहरामध्ये होणार्‍या आॅलम्पिक खेळात काॅर्पोरेट सोशियल रिस्पाँसिबिलीटी (सी. एस. आर ) च्या अंतर्गत गेल इंडिया व अॅग्लियन मेडल हन्ट कंपनी यांच्या सहकार्याने क्रीडा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल इंडीया स्पीड स्टार (spot ,screen,select, nurture ) या अंतर्गत आंतराष्र्टीय व राष्र्टीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करु शकणारी ११ ते १७ वयोगटातील मूले व मुलींची जिल्हा,राज्य् ,राष्र्टीय स्तरावर निवड करण्यात येणार आहे . खेळाडुंच्या क्रीडा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत  करुन , आंरराष्र्टीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास सहकार्य करण्यात येणार आहे. याकरीता क्रीडा प्रकारातील १०० , २००, ४०० मीटर धावणे या प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सदर योजनेचे तृतिय वर्ष आहे. महाराष्र्टातील ८ जिल्हांमध्ये जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.यामध्ये शालेय अथवा शाळाबाह्य विद्यार्थि  मुंबई , सांगली,कोल्हापुर, सोलापुर नाशिक,बीड ,अकोला व नागपुर यापैकी कोणत्याही ठीकाणी नाव नोंदवु शकतात. विदर्भातील विभाग स्तर स्पर्धा अकोला येथे मंगळवार १९/१२/२०१७ रोजी वसंत देसाई स्टेडीयम रेल्वे स्टेशन रोड  येथे  सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडुंची निवड चाचणी २५ डिसेंबर २०१७ ते १५ जानेवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार. त्याकरीता वाशीम जिल्ह्यातील बहुतांश खेळाडुंनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वयक राजेश आढाव ,एन वाय सी एस जिल्हा समन्वयक विष्णु इढोळे राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशीम, महेश महल्ले नाना मुंदडा विद्यालय मालेगाव , चेतन शेंडे टेक्निकल यांनी केले आहे. 

शारीरिक पात्रताः- ११ ते १४ वयोगट मुले मुले ( जन्म तारीख १/१/२००४ ते ३१/१२/२००६ )

१५ ते १७ वयोगट मुले मुली ( ज. ता. १/१/२००१ ते ३१/१२/२००३) 

आवश्यक कागदपत्रे  —मुळ जन्माचा दाखला/बोनाफाईड , आधार कार्ड व दोन फोटो ची आवश्यक असल्याची माहिती अमोल काटेकर यांनी दिली

कामरगावात आज भव्य, दिव्य कबड्डी सामन्याचे उदघाटन.




कामरगाव -  न्यू आझाद क्रीडा मंडळ कामरगाव यांचे वतीने,  दणद्नीत कबड्डी चे खुले सामने आयोजित केले आहे. के.के .मॉल कामरगाव या ठिकाणी  सामन्याचे उद्घाटन 15/12/2017 रोजी दुपारी 4वाजता 
गावातिल पदाधीकार्याच्या हस्ते होणार आहे.तरी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति मनुन, आमदार राजेंद्र पाटणी राहणार आहे. तरी गावातील नागरीकांनी उपस्थित राहून आयोजित सामान्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती न्यू आझाद क्रीडा मंडळ कामरगाव यांचे वतीने, करण्यात आली आहे .
    विशाल ठाकरे.
    8975734338.

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

वाटर कप स्पर्धेमुळे माणसामाणसातील मन संधारण होईल - सरपंच विजय काळे


मंगरूळपीर दि 15 गावा गावातील माणसे रेतीप्रमाणे विखुळलेली आहे. या विखुळलेल्या माणसांना वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदानाने एकत्रित आणून माणसामाणसातील मन संधारण होऊन गाव दुष्काळमुक्त होईल या करिता गावातील प्रत्येक नागरिकांनी स्पर्धेत सहकार्य करावे असे आव्हान मागील वर्षी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यात प्रथम आलेल्या गावचे सरपंच विजय काळे मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम इचा गावात आयोजित ग्रामसभेत गावकऱयाना मार्गदशन करताना दि 14 डिसेंबर रोजी बोलत होते.
       इचा ग्रामपंचायतच्या वतीने  पाणी फाऊंडेशन कडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेसदर्भात आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती उषाताई राऊत प्रमुख मार्गदर्शक सरपंच विजय काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील राऊत, कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शालीकराम पाटील, निळकंठ राऊत,  ग्रामसेविका सीमाताई सुर्वे, सतीश राऊत, पाणी फाऊंडेशनचे प्रफुल बाणगावकर, देवेंद्र राऊत  यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम गावकऱयाना दुष्काळाशी दोन हात ही फिल्म दाखविण्यात आली यानंतर काळे मार्गदशन करताना म्हणाले की, स्पर्धेचे प्रमुख ध्येय गाव एकत्रित करून दुष्काळ मुक्त करणे म्हणजेच गावात पडणाऱ्या पावसाचे योग्य रित्या नियोजन करणे. गावच्या शिवारात पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया न जाऊ देणे म्हजेच गाव दुष्काळ होईल. याकरिता गावकर्यानी पाणी फाऊंडेशन कडून होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 5 व्यक्तीची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून 3  पुरुष व 2 महिलांची  योग्य पध्द्तीने करावी. ते प्रशिक्षित झाल्यानंतर गावकऱयाना माहिती सांगून पाण्याचे मह्त्व पटवून देऊन गावात सीसीटी, शेततळे, गाबियन बंधारा, एलबीएस, नाला खोलीकरण , शेताची बाधबधिस्ती,शोष खड्डे, जलबचत, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण,जलसंधारणाची आदी कामे लोकसहभाग व शासनाच्या मदतीनें करता येईल याकरिता गावकर्याणी स्पर्धेत भाग घेऊन कामे करून गाव दुष्काळ मुक्त करावे असे आव्हान काळे यांनी केले. कार्यक्र माचे संचालन सतीश राऊत तर आभार ग्रामसेविका सीमाताई सुर्वे यांनी केले.  ग्रामसभेला गावातील महिला व पुरुष वर्गाची उपस्थिती होती.          
                    
  फुलचंद भगत
 सम्राट टाईम्स लाईव्ह 
9763007835

विनाअनुदानित शिक्षकांचे राज्यस्तरीय एकदिवसीय धरने आंदोलन

         नागपुर:दि.13 डिसेंबर रोज बुधवारला वेळ सकाळी 10:00 वाजता पासून ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत यशवंत स्टेडियम नागपुरला. नैसर्गिक विनाअनुदानित वर्ग/तुकडी शिक्षक कृती समिति महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच पदवीधर मतदार संघ नागपुर विभागचे आमदार श्री.ना.गो.गानार साहेब आणि शिक्षण संघर्ष संघटना,महा.राज्य. अध्यक्षा सौ.संगीता ताई शिंदे(बोंडे) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रतिल सर्व विभागातील विनाअनुदानित शिक्षकांचे राज्यस्तरीय एकदिवसीय धरने आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या,सन 2012-13 या शैक्षणिक वर्षात अनुदानित शाळा मधील नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित वर्ग/तुकड़यांना शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2016-17 ला 20 टक्के व शैक्षणिक वर्ष 2017-18 ला 40 टक्के अनुदान मिळावे,प्राथमिक/माध्यमिक अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव विनाअनुदानित वर्ग/तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे अस्या होत्या.यावेळी विधान भवनामध्ये प्रत्यक्ष जाउन माननीय शिक्षण मंत्री यांच्या सोबत चर्चा करुण शासनातर्फे मान्यता देण्यात आलेल्या नैसर्गिक विनाअनुदानित वर्ग/तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळने बाबत निवेदन देण्यात आले.याप्रसंगी आमदार ना.गो.गानार साहेब यांनी भाषण केले.ते आपल्या भषणात म्हणाले,अनुदानित शाळेतील 2012-13 वरील नैसर्गिक वर्ग/तुकडीचे मूल्यांकन करण्याची गरज कसाला पाहिजे.
शासनाला?मूल्यांकन नकरता त्वरित शासन निर्णयानुसार 5 व्या वर्षी 20 टक्के व 6 व्या वर्षी 40 टक्के अनुदान शासनाने आम्हाला दयाला पाहिजे तस्या पद्धतीने आपन 100 टक्के म.रा.शि.परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.याविषयी शिक्षण मंत्रीमहोदय विनोद तावडे यांच्यासी याविषयी चर्चा करुण विनाअनुदानीतचा प्रश्न मार्गी लावनार आहोत.तसेच माननीय तावडे साहेब मला म्हणाले की तुम्ही गणित शिक्षक आहात 12 अधिक 5 बरोबर 17 होतात हेच माहित आहे तुम्हाला शिक्षण विभागाचे काहीही माहित नाही त्यामुळे त्यांना दाखुन दयाचे की 12+5=17कसे होतात.त्यानंतर शि.संघर्ष संघटना महा.राज्य अध्यक्षा संगीता ताई शिंदे यांनी सुद्धा आपल्या भाषनामध्ये म्हटले विना अनुदानित विषयीचे प्रस्न शासनाने त्वरित मार्गे लावावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेड़ू असा इशारा दिला.या कार्यक्रमामधे माजी आमदार भगवान साळुकेँ,आमदार कपिल पाटिल,शिक्षक आमदार श्रीकांत देसपांडे यांनी सुद्धा विनाअनुदानीताचा प्रश्नं मार्गी लवकरच लावला जाईल असे आव्हान देतो असे सांगितले तसेच महाराष्ट्रातले विभागातील आमदार या कार्यक्रमाला प्रत्यक्ष भेट देत मार्गदर्शन केले. काही विना अनुदानित शिक्षक बंधु भगिनेने आपल्या व्यथा मांडून 16/08/2012च्या शाशन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक/अतिरिक्त तुकडी 5973 दिलेल्या आहेत त्यापैकी 1 जुलै 2016 शाशन निर्णयामध्ये 2012-13च्या नैसर्गिक/अतिरिक्त तुकडी 21 शाळां तसेच 2 जुलै 2016 शाशननिर्णयात 38 शाळांना 20 टक्के अनुदान यादीत नावे आहेत हे आमदार ना.गो.गानार साहेबांच्या निदर्शनात आणून दिले,याप्रसंगी नै.विनाअनुदानित वर्ग/तुकडी शिक्षक कृती समिती महा.राज्य अध्यक्ष श्रध्देय कुलकर्णी,कार्याअध्यक्ष नविन नेमाडे,उपाअध्यक्ष सतीश चव्हाण,सल्लागार सचिन पाटिल पारे,तसेच अमरावती विभाग अध्यक्ष राहुल चन्द्रे,नाशिक विभाग अध्यक्ष रोशन शेख,औरंगाबाद विभाग सतीश चव्हाण,पुणे विभाग जिनेश पुरवंत,कोकण विभाग अध्यक्ष बावा विनोद,नागपुर विभाग आलोक खोकले,प्रसिद्धी प्रमुख किशोर घुले,सिद्धार्थ भालेराव,मनोज नालिन्दे,विलास गांवढे,पुरषोत्तम नव्हाळे,महेश महल्ले,सचिन देवळे,रमाकांत घुगे,हर्षवर्धन अढागळे तसेच महाराष्ट्रातील सर्व विभागातले विना अनुदानित शिक्षक शिक्षका मोठया संख्येने उपस्तित होते.                           
सम्राट टाईम्स

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर येथे क्लुझर आणी विस्टाच्या भिषण अपघातात दोनजन ठार एक गंभिर

                                                                  मंगरुळपीर-येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ राञी बाराच्या सुमारास क्लुझर आणी विस्टा यांच्यात झालेल्या भिषण अपघातात दोनजन ठार आणी एकजन गंभीर असल्याचे समजते.राञी बारावाजेदरम्यान येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ विस्टा व क्लुझरमधे जोरदार धडक होवुन भिषण अपघात झाला हा अपघात एवढा भिषण होता की जागेवरच दोनजन ठार झाले असुन एक जन गंभीर आहे.जखमींना अकोला येथे हलवन्यात आले आहे.एक गाडी मंगरुळपीरचीच तर दुसरी दापुरा येथील असल्याचे बोलल्या जात आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.                 सम्राट टाईम्स लाईव्ह

*रमाई आवास योजनेतील लाभार्थीनी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये--गविअ भारसाखळे*



:-शासनाच्या अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. योजनेचा लाभ मिळविण्याकरिता विहित पद्धती असते परंतु काही महाभाग लाभार्थीना आमिष देऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याचा दावा करतात.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची फसवणूक केली जाते व नाहकच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते हे टाळण्यासाठी पंचयात समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी  कोणालाही एकही रुपया चुकीच्या मार्गाने न देण्याचे आवाहन केले आहे. वर्ष २०१७-१८ करिता रमाई आवास योजने करिता लाभार्थी कडून दि १५ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज पंचायत समिती ला मागविन्यात येत आहेत. सदर अर्जा साठी कोणतीही फी नाही. फक्त लाभार्थी यांनी झेरोक्स केंद्रवर मिळणाऱ्या अर्जा सोबत जातीचा दाखला, उतपन्नाचा दाखला, जागेचा नमूना८, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुक ची झेरोक्स, जॉब कार्ड झेरोक्स, अपंग दाखला( असल्यास) हे कागदपत्र जोडावे.योग्य लाभार्थीला योजनेचा लाभ दिला जाणार असल्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार होणे चुकीचे आहे. 

महेंद्रकुमार महाजन
 रिसोड प्रतिनिधी 
9960292121

जगनभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

ईरऴा येथे  दिनांक :13 डिसेंबर  रोजी जगन ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसाचे   निमित्ताने भर गच्च कार्यक्रम ठेवण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . तसेच ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे रुग्णाला फळ वाटप करण्यात आले', जी.प.शाळा ईरळा विद्याथाना वह्या व पेन वाटप केले.आज सदर कार्यक्रमाला जगन्नाथ ठाकरे (नाना ),गोपाल ठाकरे , केशव ठाकरे', अनिल ठाकरे , अतुल ठाकरे ,  ग्रामपंचायत सदस्य दीपकभाऊ , गजानन ठाकरे , केशव सूरूसे , पप्पू कुटे , गणेश    देवकर , किशोर शिंदे , रमेश जाधव (मामा )व श्री गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते,गजाननभाऊ देवळे मित्र मंडळ ईरळा/डही . तसेच गावकरी हजर होते.                  
    
 सम्राट टाइम्स                         
    रंजित वानखेडे (ईरळा)

पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत वाशिम जिल्हा राज्यामध्ये अगेसर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


वाशिम दि 13 पाणी फाऊंडेशन कडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा 3 करिता मंगरूळपीर तालुक्याची नव्याने तर कारंजा तालुक्याची पुन्हा निवड करण्यात आली. त्यामुळे मागील वर्षी कारंजा तालुक्यातील वाटर कप स्पर्धेचा अनुभव पाहता यावर्षी होणाऱ्या दोन तालुक्यात होणाऱ्या  स्पर्धेसोबत प्रशासन ताकतीनिशी सोबत राहून वाशिम जिल्हा पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत राज्यामध्ये अगेसर राहण्यासाठी प्रयत्न करू असे मत वाशिम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या बैठकीत केले. 
       जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पाणी प्रमुख मार्गदर्शक ड्रा अविनाश पोळ यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यपालन अधिकारी गणेश पाटील, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा कुषी अधिकारी दत्तात्रय गावसाने  उपविभागीय अधिकारी ड्रा शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, मंगरूळपीर तहसीलदार बी व्ही वाहूरवाघ, तालुका कुषी अधिकारी कारंजा समाधान धुळधुळे, मंगरूळपीर सचिन कांबळे , पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समनव्यक चिन्मय फुटाणे, पाणी फाऊंडेशचे टेक्निकल टेनर पवनभाऊ मिश्रा, तालुका समनव्यक श्याम सवाई, रवी लोखंडे, देवेंद्र राऊत व अन्य विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. अन्य वीभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. मंगरूळपीर व कारंजा येथील अधिकारी व पाणी फाऊंडेशन टीम सोबत बैठक उत्साहात पार पडली. यावेळी पाणी फाउडेशनचे ड्रा अविनाश पोळ सर,  विदर्भ समनव्यक चिन्मय फुटाणे, प्रफुल कोल्हे याची उपस्थिती होती. तसेच उपविभागीय अधिकारी ड्रा शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, तहसीलदार बी व्ही वाहूरवाघ, तालुका कुषी अधिकारी कारंजा समाधान धुळधुळे, मंगरूळपीर सचिन कांबळे व तालुका समनव्यक श्याम सवाई, प्रफुल बाणगावकर, रवी लोखंडे, देवेंद्र राऊत व टेक्निकल टेनर पवन मिश्रा, जयपूर चे सरपंच विजय काळे यांची उपस्थिती होती. यावेळी जयपूर सरपंच विजय काळे यांनी वाटर कप स्पर्धेचा अनुभव कथन केला.यावेळी बैठकीत रोजगार हमी योजने अंतर्गत सहभागी गावांनी  शोष खड्डे, विहीर पूर्णर्भरण, माती परीक्षण, जलबचतीची कामे ठिबक आदी कामे स्पर्धेच्या आगोदर सुरू व्हावीत या बाबत माहिती दिली तर ड्रा पोळ यांनी वाटर कप स्पर्धेचे नियम सांगितले या प्रसंगी बैठकीचे संचालन जिल्हाकुषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने यांनी केले .
बाक्स
ड्रा अविनाश पोळ, पाणी फाऊंडेशन प्रमुख मार्गदर्शक 
      वाटर कप स्पर्धेत मागिल वर्षी कारंजा तालुक्याने चागले काम केले. याकरितात्यामुळे यावर्षी नव्याने मंगरूळपीर तालुका निवडला आहे. गावकरी व प्रशासनाच्या सहकार्याने कारंजा तालुक्याने विदर्भात श्रमदान व मशीनच्या कामात दुसरे स्थान प्राप्त केले. त्यामुळे यावर्षी वाशिम जिल्ह्रा राज्यात भरीव योगदान देईल हा आशावाद आहे.                                                                                                            फुलचंद भगत-
सम्राट टाईम्स लाईव्ह  
  मो.9763007835

भारिप बमसं चे उपोषण*


          
👉 विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा

  

भारिप बहुजन महासंघ रिसोड शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व उपाध्यक्ष आक्रमखान यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधील समाजमंदिराचे काम त्वरित करण्यात यावे.समाजमंदिर ते पंचशील चौक पर्यंत रस्त्याचे काम सुरू करावे, कामानीचे काम करावे या मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे
 दि१३पासून सुरू झालेल्या उपोषणाला भीम टायगर सेना, खाटीक समाज संघटना,
रयत क्रांती सेना इत्यादी सामाजिक संघटनानी उपोषणाला पाठींबा दिला आहे. नगर परिषद समोर सुरू असलेल्या उपोषणाची  दखल प्रशासनाने घ्यावी व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा करिता उपोषण कर्त्यांना अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी भेटी दिल्या.बाबुरावजी जुमडे, प्रमिला ताई शेवाळे,गिरीधर शेजुळ, ऍड दशरथ मोरे,ऍड तुरूकमाने,ऍड शरद मोरे,भारिप ता अध्यक्ष केशवराव सभादिंडे,माजी नगरसेवक शेख ख्वाजा, मन्नु ठेकेदार,
 संध्याताई पंडित,भारत कांबळे मूनवर खत्री भाई, जहुर भाई इत्यादी सह अनेकांनी भेटी देऊन उपोषणाला पाठींबा दिला

महेंद्रकुमार महाजन 
रिसोड प्रतिनिधी 
9960292121

· मध्यवर्ती संग्रहालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव · सीसीटीव्ही यंत्रणा, सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन



सार्धशती कौमुदी या सुवर्ण महोत्सव

ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
सम्राट टाइम्स न्यूज
नागपूर :  मध्यवर्ती संग्रहालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संग्रहालयाविषयी विशेष तयार करण्यात आलेल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ‘सार्धशती कौमुदी’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात आयोजित विशेष समारंभात करण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव  नितीन गद्रे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य  विभागाचे उपसचिव संजय भोकरे, पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभीरक्षक डॉ. विराग सोनटक्के,महाऊर्जाचे सारंग महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाला 150वर्षे पूर्ण झाल्याने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमांतर्गत संग्रहालयाविषयीची ‘सार्धशती कौमुदी’ हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. सुवर्ण महोत्सवी उपक्रमांतर्गत संग्रहालय शास्त्रविषयी या ग्रंथात तज्ज्ञ व्यक्तींचे संशोधनपर लेख असून हा  ग्रंथ शासकीय मुद्रणालय नागपूर येथे तयार करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीसह विविध विकास कामांचा शुभारंभ

मध्यवर्ती संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून विविध विकास योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

शासकीय वस्तू संग्रहालयाच्या बळकटीकरणांतर्गत संग्रहालयामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा तसेच डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, मेटल हँड डिटेक्टर, बॅगेज स्कॅनर व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेंतर्गत संग्रहालयाच्या सुरक्षेकरिता विविध दालनात तसेच परिसरात110 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

संग्रहालयात विजेची बचत करण्याच्या अनुषंगाने मध्यवर्ती संग्रहालयात सौर ऊर्जेची सयंत्र बसविण्यात आली. यामध्ये 25किलोवॅटची वीज निर्मिती करण्यात आली आहे. मध्यवर्ती संग्रहालयात सौर ऊर्जा सयंत्र बसविण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेट मॅनेजमेंट सर्व्हिस, नागपूर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मध्यवर्ती संग्रहालयाला 25 किलो वॅट ऊर्जेची आवश्यकता सोलर रुफटॉप या प्रकल्पासून पूर्ण होणार आहे. 320 वॅट क्षमेतेची 69 सोलर पॅनल बसविण्यात आले असून संग्रहालयात दररोज शंभर युनिट वीज उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी 13लाख 62 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. सोलर ऊर्जेमुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. यावेळी महाऊर्जाचे पुरुषोत्तम जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे विनायक निट्टरकर, विवेक कुळकर्णी, किशोर बोरकर, सुरेंद्र मनपे,ललिता नांदेकर, पंढरी मुरस्कर उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज
युवा जोडो अभियानातुन संघटन वाढविणार ः पवन जोगदंड

शहर भाजयुमोची आढावा बैठक उत्साहात

सम्राट टाइम्स न्यूज

भाजयुमोची संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष मजबुतीसाठी युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून शहरात वार्डनिहाय शाखा स्थापन करणार असल्याची माहिती भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी शहर आढावा बैठकीतुन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना दिली.

येथील सर्कीट हाऊस येथे आज, 13 डिसेंबर रोजी भाजयुमो शहर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे हे होते. तर यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल लोथे, पं. स. सदस्य श्रीकांत कोरडे, निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, कपील सारडा, भाजयुमो शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, कैलास मुंगणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

युवा जोडो अभियानाबाबत अधिक माहिती देतांना पवन जोगदंड म्हणाले की, भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्र, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या निर्देशानुसार  युवा जोडो अभियानाच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीमध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी शहरात वार्डनिहाय शाखा स्थापण्याचा आपला संकल्प आहे. केंद्रा व राज्यात भाजपाचे या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांची माहीती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना सोबत घेवून काम करणार असल्याचेही पवन जोगदंड यांनी सांगीतले.

यावेळी बोलतांना भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे म्हणाले की, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटनात्मक दृष्ट्या बांधणीसाठी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त शाखा स्थापन करुन पक्ष मजबुत करावा, असेही आवाहन केले. यावेळी भाजयुमो जिल्हा संघटन सरचिटणीसपदी अमोल लोथे यांची निवड झाल्यबद्दल  भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी सत्कार केला.

बैठकीच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो शहर उपाध्यक्ष आशुतोष राऊत, रामा इंगोले, आशुतोष निरखी, रोहीत चांदवाणी, जयेश आंबटपुरे, सोशल मिडीया प्रमुख शिवा गाडेकर, चिटणीस पवन कणखर, बाबु मिर्झा, राम यादव, वसिम भवानीवाले, गणेश जगताप, सुरज शर्मा आदींनी परिश्रम घेतले. 
सम्राट टाइम्स न्यूज

मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु -सामाजिक न्याय मंत्री


सम्राट टाइम्स न्यूज

       राज्यातील मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असून, मागील आणि यावर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

            या संदर्भात सदस्य  सर्वश्री सुधाकर कोहळे, ॲङ गौतम चाबुकस्वार, श्रीमती संगीता ठोंबरे यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला लेखी उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री यांनी म्हटले आहे की, डिबीटी पोर्टल वर्कमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे या पोर्टल ऐवजी पहिल्या सत्राचा शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थांच्या आधार संलग्न बँक खात्यावर देण्यात येत आहे. मागील आणि या वर्षाची शिष्यवृत्तीदेखील बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.  

सम्राट टाइम्स न्यूज

कर्जत तालुक्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे दोन ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरु -आदिवासी विकास मंत्री


सम्राट टाइम्स न्यूज
        रायगड जिह्यातील कर्जत तालुक्यात कशीळे व पाथरज येथे आदिवासी महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

            या संदर्भात सदस्य सर्वश्री प्रशांत ठाकूर, समीर कुणावार, ॲङ आशिष शेलार, अतुल भातखळकर, श्रीमती मनिषा चौधरी, अमित साटम यांनी रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे भात खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्रश्न विचारला होता त्याला लेखी उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुका आदिवासी उपयोजना क्षेत्रात येतो, या तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी संस्था कशेळे व खांडस यांच्यामार्फत खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. 28 नोव्हेंबर, 2017 पासून कर्जत तालुक्यात ही केंद्र सुरु करण्यात आली आहे

सम्राट टाइम्स न्यूज

अमरावती जिल्ह्यातील 38 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीन अनुदानाची रक्कम जमा -पणन मंत्री सुभाष देशमुख


सम्राट टाइम्स न्यूज
            अमरावती जिल्ह्यातील 38,791 लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानापोटी 12 कोटी 16 लाख 97 हजार 520 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

            सदस्य सर्वश्री विरेंद्र जगताप व ॲड श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन अनुदानाची रक्कम थकीत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्र्यांनी म्हटले आहे की, हंगाम 2016-17 मध्ये अनुकुल हवामान व समाधानकारक पावसामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली होती. बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले होते. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी 200 रु. प्र.क्विंटल व कमाल 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अमरावतीतील जिल्ह्यातील 38,791 पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

मतिमंद मुलांच्या वसतिगृहात प्रती विद्यार्थी 2 हजार रुपयांचे परिपोषण अनुदान देण्यास मान्यता -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले



      सम्राट टाइम्स न्यूज       राज्यातील मतिमंद मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये दराने परिपोषण अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

            मतिमंद मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाच्या अनुदानाची रक्कम वाढविण्याबाबत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, किसन कथोरे, संदीप नाईक आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री यांनी म्हटले आहे की, महिला व बालविकास विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरीत झालेल्या अनुदानित मतिमंद बालगृहे सलग्न शाळा या 14 संस्थांमधील प्रवेशितांना परिपोषण अनुदान सुधारित करण्याबाबत समिती कठीत करण्यात आली आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत एप्रिल 2017 पासून प्रतिमाह, प्रति प्रवेशित 2 हजार रुपये दराने परिपोषण अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

युवा जोडो अभियानातुन संघटन वाढविणार ः पवन जोगदंड



शहर भाजयुमोची आढावा बैठक उत्साहात

सम्राट टाइम्स न्यूज

भाजयुमोची संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष मजबुतीसाठी युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून शहरात वार्डनिहाय शाखा स्थापन करणार असल्याची माहिती भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी शहर आढावा बैठकीतुन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना दिली.

येथील सर्कीट हाऊस येथे आज, 13 डिसेंबर रोजी भाजयुमो शहर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे हे होते. तर यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल लोथे, पं. स. सदस्य श्रीकांत कोरडे, निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, कपील सारडा, भाजयुमो शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, कैलास मुंगणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

युवा जोडो अभियानाबाबत अधिक माहिती देतांना पवन जोगदंड म्हणाले की, भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्र, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या निर्देशानुसार  युवा जोडो अभियानाच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीमध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी शहरात वार्डनिहाय शाखा स्थापण्याचा आपला संकल्प आहे. केंद्रा व राज्यात भाजपाचे या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांची माहीती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना सोबत घेवून काम करणार असल्याचेही पवन जोगदंड यांनी सांगीतले.

यावेळी बोलतांना भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे म्हणाले की, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटनात्मक दृष्ट्या बांधणीसाठी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त शाखा स्थापन करुन पक्ष मजबुत करावा, असेही आवाहन केले. यावेळी भाजयुमो जिल्हा संघटन सरचिटणीसपदी अमोल लोथे यांची निवड झाल्यबद्दल  भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी सत्कार केला.

बैठकीच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो शहर उपाध्यक्ष आशुतोष राऊत, रामा इंगोले, आशुतोष निरखी, रोहीत चांदवाणी, जयेश आंबटपुरे, सोशल मिडीया प्रमुख शिवा गाडेकर, चिटणीस पवन कणखर, बाबु मिर्झा, राम यादव, वसिम भवानीवाले, गणेश जगताप, सुरज शर्मा आदींनी परिश्रम घेतले. 
सम्राट टाइम्स न्यूज

राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानातील 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान -कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर



राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियानातील 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान

      -कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर

            राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान योजनेतील 111 प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली असून त्यापैकी 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित 47 प्रस्तावांचे अंशत अनुदान प्रलंबित असून त्यांना नवीन योजनेनुसार अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील उद्योगाला चालना मिळणार असल्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी सांगितले.

            राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान पंचवार्षिक योजना बंद केल्याने मराठवाड्यातील उद्योजकांचे नुकसान झाल्याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य कुणाल पाटील, डी.पी.सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना कृषी मंत्री यांनी म्हटले आहे की, या योजनेच्या निकषांन्वये 111 प्रस्तावांना पूर्व संमती देण्यात आली, पैकी 64 प्रस्तावांना पूर्ण अनुदान देण्यात आले. उर्वरित 47 प्रस्तावांचे अंशत अनुदान प्रलंबित असून नवीन योजनेनुसार त्यांना अनुदान देण्यात येत आहे

सम्राट टाइम्स न्यूज

औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करू - मुख्यमंत्री



विधानसभा लक्षवेधी :

औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी

जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करू      - मुख्यमंत्री

            नागपूर, दि. 13 : औरंगाबाद छावणी परिसरातील जलवाहिनी जुनी असून या भागातील जलवाहिनीवरील गळतीच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले आहेत. या परिसरात नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणी जाणिवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            या प्रश्नी सदस्य सर्वश्री सरदार तारासिंह, इम्तियाज जलील, दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद छावणी परिसरातील भूमीगत जलवाहिनी 40 वर्षे जुनी असून या भागात गळती आहे हे लक्षात आल्यानंतर तेथे नवीन पाईप टाकून 22 नोव्हेंबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. विविध विभागाच्या माध्यमातून या परिसरात उद्‌भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी छावणी मंडळाकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

सम्राट टाइम्स न्यूज