शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

लाचखोर कार्यक्रम अधिकारी एसीबी च्या जाळ्यात


सम्राट टाइम्स टाइम्स 
वाशिम जिल्हातील  मानोरा पंचायत समितीत  सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विद्युत सुखदेव गवळी वय 32 वर्ष  यांनारोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर असलेल्या  शेततळ्याचे अनुदान काढण्यासाठी 5000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहात पकडल्याची कार्यवाही  दि 15 डिसेंबरला केली 
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालयात तक्रार दिली की ते ग्राम रोजगार सेवक असून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत त्यांचे गावातील मंजूर असलेल्या शेततळयाचे मंजूर अनुदानापैकी उर्वरित अनुदान रक्कमेची मागणीकरिता फाईल तयार करून पंचायत समिती मानोरा येथे डिमांड दाखल केली सादर डिमांड रक्कम काढण्यासाठी  सहायक कार्यक्रम अधिकारी विद्युत गवळी यांना भेटले असता त्यांनी अनुदान काढण्यासाठी तक्रारदाराला 5000 रुपये लाचेची मागणी केली  याबाबतची  तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालयात केली सदर तक्रारीवरून एसीबी ने दि 14 डिसेंबर ला  पंचासमक्ष  पडताळणी केली असता  गवळी यांनी 5000 रुपये लाचेची मागणी केल्याचे  निष्पन्न झाले दि 15 डिसेंबरला 5000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना एसीबी ने गवळी यांना  रंगेहाथ अटक केली मानोरा पोलीस स्टेशन येथे लाचखोर गवळी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३ (२) ला.प्र. का.१९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला 

सदर कार्यवाही श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक,नाशिकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक लाप्रवी अमरावती,आर व्ही गांगुर्डे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बोर्हाड आणि त्यांच्या पथकाने केली
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा