शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

विद्यार्थ्यांकरीता "चमत्कारामागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.





विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा......

माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे, यांचे वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर द्वारा विद्यार्थ्यांकरीता "चमत्कारामागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.*

मंगरूळपीर: 

           येथिल यशवंतराव चव्हाण विद्यालयात आयोजित वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावरील व्याख्यानाचे कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ यांनी वरील प्रतीपादन केले.

 मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालयात विविध खेळ स्पर्धा, उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकासाकरीता अंधश्रद्धा निर्मुलन याअंतर्गत "चमत्कारांमागिल विज्ञान" या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुडके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक आगरकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशिम जिल्हाध्यक्ष नाना देवळे व अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे वक्ते निलेश रमेशराव मिसाळ, (शिक्षक, संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, मंगरूळपीर) हे होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महान विज्ञाननिष्ठ संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले.
           
अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे अभ्यासक, तथा विविध शाळा महाविद्यालये, शिबीरे व गावागावांत जाहीर व्याख्यानांचे माध्यमातुन समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य, प्रचार-प्रसार करणारे कार्यकर्ते, वक्ते नाना देवळे व नीलेश मिसाळ यांनी त्यांच्या  प्रभावी, परखड, सुस्पष्ट, भारदस्त व अभ्यासपुर्ण वक्तृत्वशैलीतून अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत "चमत्कारामागिल विज्ञान" विषयाअंतर्गत अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धांचे प्रकार, व्याप्ती, त्यांचे परीणाम, अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे काय? भुत व भुताचे मानसशास्त्र., भानामती-करणी करता येते काय? त्यामागील रहस्य, फलजोतिष्य किती खरे किती खोटे? संत चमत्कार आणि बुवाबाजी, जादुटोणा-चमत्कारांमागील विज्ञान, बुद्धिप्रामाण्यवाद व वैज्ञानिक दृष्टीकोन, संतचमत्कार, विविध चमत्कार प्रयोगांचे सादरीकरण व त्यामागिल वैज्ञानिक कारणमिमांसा सांगितली. यांत तांदूळ-गडवा, अगरबत्ती फिरणे, जळता कापूर खाणे, पाण्याची फूले करणे, मंत्राने होम पेटविणे, तांदूळ-गडवा, लिंबातून रक्त येणे, नारळातून काळा कपडा, सूया, काढणे, चुन्याचा गूलाल करणे, पाण्यावर दिवा लावणे, केळाचे काप होणे, काडी कापड कौल,इ. यांसारख्या विविध चमत्कारांचे सादरीकरण करीत त्यांमागिल विज्ञान, वैज्ञानिक कारणे सांगितली. तसेच महाराष्ट्र शासनाचा ' जादुटोणा विरोधी कायदा' या बाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना कायद्याची माहीती, भुमिका, पार्श्वभुमी, कलमे, व्याप्ती, मर्यादा, अनुसुची, यांसह कायद्याचा योग्य वापर, ई. विषयांवर सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. व कायद्याची उपयुक्तता, आवश्यकता व महत्व प्रतिपादीत केले. रामरहीम, आसाराम यांसारख्या ढोंगी बुवा-बापुंपासून जनतेने सावध रहावे. प्रामूख्याने महीलांनाच हे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत असतात व त्यांना आपली शिकार बनवतात. त्यांना समाजातील महीलांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. 

      " करणी, भानामती— मुठ, विज्ञान सांगते सारेच झुठ ". अंधश्रद्धा - समाजाला लागलेली कीड असून त्यापासून संपुर्ण समाज मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन ही काळाची गरज आहे. जनतेच्या हीताचा व शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी जादुटोणा विरोधी कायदा हा क्रांतीकारी कायदा शासनाने आणला. या कायद्याबाबत जनजागृती व प्रचार—प्रसार व्यापक व मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कायद्यामूळे जनतेचे शोषण थांबेल व बुद्धीप्रामाण्यवादी समाजाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन केले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(H) नुसार वैज्ञानिक दृष्टोकोन बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या 10 गाभाभूत घटकांमध्येही वैज्ञानिक दृष्टीकोन हा एक महत्वाचा घटक आहे.  विद्यार्थी  हा समाजाचा महत्वाचा घटक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये बूद्धीप्रामाण्यवाद रूजविणे, विद्यार्थ्याचे माध्यमातून भविष्यात बुद्धीप्रामाण्यवादी, निकोप समाज निर्माण होऊन अंधश्रद्धा मुक्त समाज घडवणे हे आपले कर्तव्य आहे. आपला समाज अंधश्रद्धेच्या खोल खाईत रुतलेला आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी संतांनी व समाजप्रबोधकांनी खूप प्रयत्न केले, अजूनही सुरू आहेत. पण, सामान्य जनतेच्या श्रद्धेचा फायदा घेवून जनतेचे शोषण करणारे ढोंगी साधू हे संत नसून जंत आहेत. त्यांचा नायनाट करणे आपली प्रमूख जबाबदारी आहे. महीलांनी स्वत: विवेकवादी होवून आपल्या मुलाबाळांनाही बुद्धीप्रामाण्यवादी बनवावे, असे मत प्रमुख वक्त्ते नाना देवळे व निलेश मिसाळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडले.यावेळी अभाअंनिसचे मंगरुळपीर तालूकाध्यक्ष फुलचंद भगत हे ऊपस्थीत होते.
प्रमूख अतिथी शाळेचे जेष्ठ शिक्षक आगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुडके यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे संचलन कु. स्नेहल आडे तर आभार प्रदर्शन कु. अंशु वाघमारे या विद्यार्थीनींनी केले.
 सदर कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता या कार्यक्रमाचे आयोजन प्रमूख शिक्षक महेंद्र हिवराळे, व इतर शिक्षक  विटकरे, इंगोले, राऊत, पोहाणे, तायडे, पाटील, फूके, ठाकरे, कटारे, कु.तलवारे, कु. रघुवंशी, कु. इंगोले, कु. देशमुख,  सोमकांत पाटील,अरूण गाढवे, नारायण शेळके, बापूराव मोटे, व शिवम ठाकरे व इतर सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. 

सम्राट टाईम्स लाईव्ह                                                  फुलचंद भगत मो.9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा