शहर भाजयुमोची आढावा बैठक उत्साहात
सम्राट टाइम्स न्यूज
भाजयुमोची संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष मजबुतीसाठी युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून शहरात वार्डनिहाय शाखा स्थापन करणार असल्याची माहिती भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी शहर आढावा बैठकीतुन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना दिली.
येथील सर्कीट हाऊस येथे आज, 13 डिसेंबर रोजी भाजयुमो शहर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे हे होते. तर यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल लोथे, पं. स. सदस्य श्रीकांत कोरडे, निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, कपील सारडा, भाजयुमो शहर सरचिटणीस गणेश खंडाळकर, कैलास मुंगणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवा जोडो अभियानाबाबत अधिक माहिती देतांना पवन जोगदंड म्हणाले की, भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्र, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या निर्देशानुसार युवा जोडो अभियानाच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीमध्ये जास्तीत जास्त युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी शहरात वार्डनिहाय शाखा स्थापण्याचा आपला संकल्प आहे. केंद्रा व राज्यात भाजपाचे या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांची माहीती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना सोबत घेवून काम करणार असल्याचेही पवन जोगदंड यांनी सांगीतले.
यावेळी बोलतांना भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे म्हणाले की, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटनात्मक दृष्ट्या बांधणीसाठी प्रयत्न करावे. जास्तीत जास्त शाखा स्थापन करुन पक्ष मजबुत करावा, असेही आवाहन केले. यावेळी भाजयुमो जिल्हा संघटन सरचिटणीसपदी अमोल लोथे यांची निवड झाल्यबद्दल भाजयुमोचे शहराध्यक्ष पवन जोगदंड यांनी सत्कार केला.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी भाजयुमो शहर उपाध्यक्ष आशुतोष राऊत, रामा इंगोले, आशुतोष निरखी, रोहीत चांदवाणी, जयेश आंबटपुरे, सोशल मिडीया प्रमुख शिवा गाडेकर, चिटणीस पवन कणखर, बाबु मिर्झा, राम यादव, वसिम भवानीवाले, गणेश जगताप, सुरज शर्मा आदींनी परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा