गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

वाटर कप स्पर्धेमुळे माणसामाणसातील मन संधारण होईल - सरपंच विजय काळे


मंगरूळपीर दि 15 गावा गावातील माणसे रेतीप्रमाणे विखुळलेली आहे. या विखुळलेल्या माणसांना वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदानाने एकत्रित आणून माणसामाणसातील मन संधारण होऊन गाव दुष्काळमुक्त होईल या करिता गावातील प्रत्येक नागरिकांनी स्पर्धेत सहकार्य करावे असे आव्हान मागील वर्षी सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यात प्रथम आलेल्या गावचे सरपंच विजय काळे मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम इचा गावात आयोजित ग्रामसभेत गावकऱयाना मार्गदशन करताना दि 14 डिसेंबर रोजी बोलत होते.
       इचा ग्रामपंचायतच्या वतीने  पाणी फाऊंडेशन कडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेसदर्भात आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती उषाताई राऊत प्रमुख मार्गदर्शक सरपंच विजय काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील राऊत, कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शालीकराम पाटील, निळकंठ राऊत,  ग्रामसेविका सीमाताई सुर्वे, सतीश राऊत, पाणी फाऊंडेशनचे प्रफुल बाणगावकर, देवेंद्र राऊत  यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम गावकऱयाना दुष्काळाशी दोन हात ही फिल्म दाखविण्यात आली यानंतर काळे मार्गदशन करताना म्हणाले की, स्पर्धेचे प्रमुख ध्येय गाव एकत्रित करून दुष्काळ मुक्त करणे म्हणजेच गावात पडणाऱ्या पावसाचे योग्य रित्या नियोजन करणे. गावच्या शिवारात पडणाऱ्या पाण्याचा एकही थेंब वाया न जाऊ देणे म्हजेच गाव दुष्काळ होईल. याकरिता गावकर्यानी पाणी फाऊंडेशन कडून होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 5 व्यक्तीची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून 3  पुरुष व 2 महिलांची  योग्य पध्द्तीने करावी. ते प्रशिक्षित झाल्यानंतर गावकऱयाना माहिती सांगून पाण्याचे मह्त्व पटवून देऊन गावात सीसीटी, शेततळे, गाबियन बंधारा, एलबीएस, नाला खोलीकरण , शेताची बाधबधिस्ती,शोष खड्डे, जलबचत, विहीर पुनर्भरण, माती परीक्षण,जलसंधारणाची आदी कामे लोकसहभाग व शासनाच्या मदतीनें करता येईल याकरिता गावकर्याणी स्पर्धेत भाग घेऊन कामे करून गाव दुष्काळ मुक्त करावे असे आव्हान काळे यांनी केले. कार्यक्र माचे संचालन सतीश राऊत तर आभार ग्रामसेविका सीमाताई सुर्वे यांनी केले.  ग्रामसभेला गावातील महिला व पुरुष वर्गाची उपस्थिती होती.          
                    
  फुलचंद भगत
 सम्राट टाईम्स लाईव्ह 
9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा